तुमची भाषा बदला
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
#

👨‍👩‍👧‍👦आई-बाबा

#👨‍👩‍👧‍👦आई-बाबा पोटचा गोळा " लेकी कडून दुःख मला कधीच नाही मिळालं चिमणी कधी मोठी झाली काहीच नाही कळालं.......... पोरगी जाणार म्हणलं की पोटात उठतो गोळा अंथरुणावर पडतो पण लागत नाही डोळा.. ......... खरंच माझी लेक आता मला सोडून जाईल अंगण , वसरी , गोठा सारं सूनसून होईल............ दारी सजतो मांडव पण उरात भरते धडकी आता मला सोडून जाणार माझी चिमणी लाड़की........... सूर सनई चे पडता कानी डोळा येते पाणी आठवत राहातात छकुलीची बोबडी बोबडी गाणी........... भरलेल्या मांडवात बाबा कहाणी सांगत असतात कल्याण झालं म्हणत-म्हणत सारखे डोळे पुसतात......... पुन्हा पुन्हा लेकी कडे बाबा पहातात चोरून कितीही समजूत घातली तरी डोळे येतात भरून........... हुंदके म्हणजे काय असतात पहिल्यांदाच कळतं कौलारूच्या छपरावनी बापाचं मन गळतं............. सरी मागून सरी येऊन डोळे वाहात राहतात चिऊ काऊच्या गोष्टी ऐकत चिमण्या उडून जातात............ लेकीचा सांभाळ करा म्हणून बाप हात जोडीत राहतो डोळ्या मधे पाणी आणून केविलवाणे पहात रहातो.......... लेक लावतो वाटी पण बाप जातो तुटून हुंदका जरी दाबला तरी काळीज जातं फुटून............ पोटचा गोळा दिल्या नंतर पापणी काही मिटत नाही कितीही डोळे पुसले तरी पाणी काही आटत नाही.......😢😢 .
29.6k जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post