तुमची भाषा बदला
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
*स्वामींची पहारेदारी ..............(प्रहर)* "स्वामींची पहारेदारी" शब्द वाचून धक्का बसला का ? तुम्हाला वाटत असेल साक्षात "स्वामीं महाराजांची" पहारेदारी......ती देखील एक सामान्य माणूस कसा करणार...? पण खरच आपण साक्षात स्वामींची "पहारेदारी" करणार आहोत...... **प.पू.गुरुमाऊलीं* * मुळे ही सुवर्णसंधी आपल्याला मिळणार आहे.....आणि ही "पहारेदारी" कुठे करणार ?.... तर आपल्या नजीकच्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये ...दिनांक ०५ डिसेंबर २०१९ ते १२ डिसेंबर २०१९.. सर्व दिंडोरी प्रणीत श्री स्वामी सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार सेवा केंद्रांमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज व प. पू. गुरुमाऊलींच्या आशिर्वादाने श्री दत्तजयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह होत आहे , तरी सर्वांनी या अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सोहळ्यात सहभागी होऊन महाराजांच्या चरणी आपली सेवा रुजू करावी. *श्रीदत्तजयंती अखंड नाम जप यज्ञ* सप्ताहाच्या निमित्ताने........ ही एक अशी सेवा आहे जी फक्त वर्षातून दोनच वेळा करण्याची संधी मिळते ती सेवा म्हणजे "प्रहर सेवा"...... आपण बाकीच्या सर्व सेवा म्हणजे पारायण...जप...यज्ञ..वर्षभरात केव्हाही करू शकतो पण प्रहर ही सेवा आपल्याला नेहमी करता येत नाही...त्यामुळे ही सेवा अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही व्यक्तीचे गंभीर प्रश्न या सप्ताहात केलेल्या सेवेमुळे लवकर सुटण्यास मदत झाली आहे.... ज्यांना दिवसभर आपल्या जॉब, कॉलेज,व्यवसाय किंवा इतर कारणामुळे "सेवेला वेळ" मिळत नाही अशांनी रात्रीच्या "प्रहर सेवेची" संधी चुकवू नये.......जमेल तेवढा वेळ अर्धा तास, एक तास, दोन तास .....जेवढा वेळ मिळेल तेवढी तरी सेवा रुजू करावी...... कित्येक सेवेकर्यांना या प्रहराच्या काळात स्वामींचे दर्शन घडले आहे.....स्वामी महाराज आपल्यासाठी संपूर्ण वर्षभर दिवस रात्र*( २४ x ७)* आपल्यासाठी हजर असतात मग आपण प्रहर सेवेसाठी थोडा वेळ काढायला नको ?..... ही प्रहर सेवा करायला मिळणे म्हणजे भाग्यंच ......स्वामी महाराज ३६५ दिवस "आपली" पहारेदारी करतात पण आपल्याला त्यांची परतफेड करण्यासाठी कदाचित हेच "सात दिवस" देत असतील ....... जो परब्रम्ह आहे...जो सर्वांचा निर्माणकर्ता आहे....जो या युगाचा चालक...मालक ..आणि पालक आहे अशा "स्वामी महाराजांची पहारेदारी" आपल्या सारख्या सामान्य माणसाला करायला मिळते ........ हे खरं आपलं भाग्यंच होय..... तर मग चला येणाऱ्या सप्ताहातील ७ दिवस ''परब्रम्हाची पहारेदारी " ( *प्रहर सेवा* )करूया....... आणि स्वामी महाराज , ब्र.प.पु.मोरेदादा. प.पु.गुरुमाऊली यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली , त्यांचे चरणी नतमस्तक होवुया.......... * परमपुज्य गुरुमाऊली व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ही सेवा रुजू करावी आणि आपले जीवन मंगलमय, आनंददायी आणि स्वामीमय करून घ्यावे. * तसेच आपल्या जवळच्या केंद्रात व परिचित व्यक्तींपर्यंत हा संदेश पोहचवावा ही नम्र विनंती... *॥ श्री स्वामी समर्थ ॥* ... 🌹स्वामीगुरूमाऊली🌹 🙏🏻🙏🏻 #🙏स्वामी समर्थ
#

🙏स्वामी समर्थ

🙏स्वामी समर्थ - ShareChat
2.6k जणांनी पाहिले
23 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post