@111378388
@111378388

🚩🙏जय जिजाऊ🙏🚩

मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌

#

💭माझे विचार

बघा तुम्हाला उत्तरं सापडली तर..😇😇😇😇 १] मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्लिश पेपर पेक्षा कमी का?😏 २] एशियाड मधील प्रवासी एसटीतल्या प्रवाशांकडे कुत्सित नजरेने का बघतात?😏 ३] पिवळा सिग्नल असतानाही आपल्या मागचा वाहनचालक होर्न का वाजवतो?😏 ४] लहान बाळांशी मोठी लोकं बोबडे का बोलतात?😏 ५] मोठया हॉटेलमध्ये कांदा भजी का मिळत नाही?😏 ६] बशीत ओतून चहा पिणाऱ्या माणसाला वेडा असल्यासारखे का पाहतात?😏 ७] 'मीच म्हणून तुमच्याशी संसार केला' असे प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला का म्हणते?😏 ८] आपण हॉटेलात बसल्यावर तिथला पोरगा नेमकी आपल्या बाकाखालची फरशी पुसायला का येतो?😏 ९] हॉटेलात इडली सांबारातली शेवग्याची शेंग चमच्याने कशी खायची?😏 १०] अज्ञानात सुख असते असे म्हणतात मग माणूस ज्ञान मिळवण्यासाठी का धडपडतो?😏 ११] कॉम्पुटर बंद करण्यासाठी स्टार्ट बटन का क्लिक करावे लागते?😏 १२] दोन शेजारणी खूप काम पडलंय अस म्हणत दारात उभा राहून अर्धा अर्धा तास का बोलत असतात?😏 १३] जाहिरातीत दाढी केल्यानंतर गालावर हात फिरायला बाईचं का लागते?😏 १४] अनुभवी डॉक्टर सुद्धा practice का करतात?😏 १५] आपला जन्म इतरांसाठी झाला असेल तर इतर लोक कशासाठी जन्मले आहेत?😏 16) कुंभ मधे स्नान केल्याने जर पाप धुतली जातात तर ह्या साधू महाराजांनी काय पाप केलय 😟 बघा तुम्हाला उत्तर सुचतात का. 🙏धन्यवाद🙏
462 जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
#

😹फनी जोक्स

एकदा मी माझ्या काही टेस्ट करण्यासाठी दवाखान्यात गेलेलो. टेस्ट रिपोर्ट येईपर्यंत मी समोर चहाच्या टपरीवर जाऊन चहा व बिस्किटे घेत असताना समोरच एक लहान मुलगा एकटक माझ्याकडे बघत होता. मी त्याला बिस्कीट घेतो का म्हणून विचारले तेव्हा त्याने मान हलवित होकार दर्शविला. मी त्याला बिस्कीटाचा पुडा घेऊन दिला. पुडा हातात पडताच मुलगा भराभर बिस्किट खाऊ लागला काय माहीत बिचारा किती दिवसांपासून उपाशी होता. तो बिस्किटे खात असताना मला खूपच समाधान वाटले. 😌😌😌 त्याचे शेवटचे दोन बिस्कीटे शिल्लक असताना तेथे त्या मुलाची आई आली की जी केव्हापासून रांगेत ऊभी राहून केसपेपर काढत होती. आईने आल्या आल्या मुलाच्या थोबाडीत मारली मी हैरान झालो. 🤔🤔🤔 मुलाची आई म्हणाली, "तुला कोणत्या फुकणीच्यानं बिस्किटं दिली रं. मी तुला इथं पन्नास रुपड खर्च करुन रिक्षानं घेऊन आले रिकाम्या पोटी टेस्ट करायला. 😱😱 मुडदा बश्शिवला त्या बिस्किटटं खाऊ घालण्याऱ्याचा" 😡😡 मी हळूच तिकडून पसार झालो.👶👶👶 खऱ्याची दुनियाच नाही राव 😅😅😂😂
351 जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..