12 गावच्या 12 बातम्या
ShareChat
click to see wallet page
@12batmya
12batmya
12 गावच्या 12 बातम्या
@12batmya
आपल्या आजूबाजूच्या चालू घडामोडींसाठी आम्हाला Follow करा
. #🙏राजमाता जिजाऊ पुण्यतिथी (तिथीनुसार)💐
🙏राजमाता जिजाऊ पुण्यतिथी (तिथीनुसार)💐 - राजमाता जिजाऊ - ShareChat
कोरोना व्हायरसचा XBB15 चा एक नवा व्हेरिएंट अमेरिकेत सापडला आहे. जो अन्य व्हायरच्या व्हेरिएंटच्या तुलनेत खूप धोकादायक आहे. चीनी वंशाचे अमेरिकन आरोग्य तज्ज्ञ एरिक फीगेल डिंग यांचे म्हणणे आहे की, हा व्हेरिएंट पूर्वीच्या BQ1 प्रकारापेक्षा 120 पट वेगाने संसर्ग पसरवतो. पूर्वीच्या सर्व व्हेरिएंटपेक्षा मानवी रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देण्यात तो अधिक पटाईत आहे. XBB15 हा व्हेरिएंट हा कोरोनाचा सुपर प्रकार असल्याने डिंग यांचे मत आहे. त्यामुळे कोरोनाशी संबंधित रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आरोग्यतज्ज्ञ डिंग यांनी म्हटले की, येथील एका शास्त्रज्ञाने न्यूयॉर्कमध्ये पसरलेल्या या व्हेरिएंटचा अभ्यास केला आहे. त्यांनी सलग 17 ट्विट करित आरोप केला की, चीनप्रमाणे अमेरिकाही कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा डेटा लपवत आहे. तर या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आता भारतातील गुजरातमध्येही आढळून आला आहे. अभ्यासात नवीन प्रकारातील तीन खास गोष्टी समोर आल्या XBB15 हे कोरोनाचे 'सुपर व्हेरिएंट' आहे. XBB15 17 दिवसात जितक्या लोकांना संक्रमित करत आहे तितका BQ1 26 दिवसात संक्रमित होत आहे. त्याचे R मूल्य म्हणजेच पुनरुत्पादन मूल्य BQ1 पेक्षा जास्त आहे. आर व्हॅल्यू हे दाखवते की, कोरोनाची लागण झालेल्या एका व्यक्तीकडून किती लोकांना संसर्ग होत आहे किंवा होऊ शकतो. XBB15 ख्रिसमसच्या आधी BQ1 पेक्षा 108% वेगाने पसरत होता. ख्रिसमसनंतर हा वेग वाढून 120% झाला आहे. न्यूयॉर्कसह अनेक US शहरांमध्ये XBB.1.5 वेगाने पसरतय अनेक यूएस शहरांमध्ये, XBB.1.5 प्रकाराने इतर प्रकारांवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आहे. न्यू इंग्लंड, यूएसए, कनेक्टिकट शहरातही त्याच्या प्रकरणांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. तेथेही यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. #🦠भारतातील कोरोना परिस्थिती😰
🦠भारतातील कोरोना परिस्थिती😰 - ShareChat
Rewa Road Accident: सोहागी डोंगरावर 3 वाहनांची धडक, 14 कामगार ठार, 40 जखमी #💐बस दुर्घटनेत 14 जण ठार
केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेसाठी विविध योजना राबवल्या जातात. केंद्र सरकारच्या अशाच एका योजनेबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या योजनेचं नाव प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना असं आहे. भारत सरकारनं या योजनेची सुरुवात 2017 मध्ये केली होती. देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरोदर महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेंतर्गत गरोदर महिलेला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या माध्यमातून आरोग्य संदर्भातील सुविधा, चांगला आहार देण्याचा हेतू आहे. चला जाणून घेऊयात मातृत्व वंदना योजनेचा लाभ कसा घ्यावा. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गत, सरकार गरोदर महिलांना तीन टप्प्यांत 6,000 रुपयांची आर्थिक मदत देते. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात 1 हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2 हजार, तिसऱ्या टप्प्यात 2 हजार आणि बाळाच्या जन्माच्या वेळी 1 हजार रुपये दिले जातात. यासाठी https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana आयडीवर क्लिक करून अर्ज करू शकता. याशिवाय, तुम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत ऑफलाइन देखील अर्ज करू शकता.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड, मुलाचे जन्म प्रमाणपत्र, पालकांचे आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असेल. या योजनेत फक्त त्या महिला अर्ज करू शकतात, ज्यांचे वय 19 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेता येत नाही. #🤰गरोदर महिलांसाठी 6 हजार रुपये💰
🤰गरोदर महिलांसाठी 6 हजार रुपये💰 - ShareChat
Gold Price Today: सोने खरेदीसाठी बाजारात गर्दी ! सोने 9000 रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट - Search #👑आजचा सोन्याचा भाव👉