Rewa Road Accident: सोहागी डोंगरावर 3 वाहनांची धडक, 14 कामगार ठार, 40 जखमी
Rewa Road Accident: एमपी-यूपी सीमेला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 30 वर एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 40 हून अधिक जण जखमी झाले. माहिती मिळताच सोहागी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बचाव मोहीम राबवून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या घटनेतील जखमींना टुंथर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्रीची असल्याचे सांगण्यात येत आहे. बस जबलपूरहून रेवामार्गे प्रयागराजला जात होती. REWA BUS AND TRUCK COLLIDE