#😮प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अथर्व सुदामे अडचणीत ➡️ अर्थव सुदामे रीलमुळे पुन्हा अडचणीत | Atharv Sudame Viral Reel
बातमी पुण्यातून..
रील स्टार अथर्व सुदामे पुन्हा एकदा वादग्रस्त रीलमुळे अडचणीत आलाय. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमध्ये परवानगीशिवाय महिलांचा अपमान करणारे चित्रीकरण केल्याप्रकरणी अथर्व सुदामेला PMPML ने नोटीस बजावलीये. तसेच सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करून समाजमाध्यमावरून संबंधित चित्रीकरण तात्काळ हटवावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशाराही दिलाय..