#😭भयंकर: 42 भारतीयांचा जिवंत जाळून मृत्यू 😱 सौदी अरेबियात मोठा अपघात झाला आहे. या अपघातात कमीत कमी ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. हे सर्व भारतीय उमराह करण्यासाठी सौदीला गेले होते. रात्री १.३० वाजता बसमधून प्रवास करत ते मक्काहून मदीनाला चालले होते. त्यावेळी अचानक ही बस डिझेल टँकरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यामुळे मोठी आग भडकली. त्यात ४० हून अधिक भारतीय मृत्युमुखी पडले.