#😭पिंजरा फेम अभिनेत्रीचे दु:खद निधन🙏 ‘पिंजरा’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपला ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना संध्या शांताराम यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं. विठाबाईच्या भूमिकेतून त्यांनी ग्रामीण स्त्रीचं भावविश्वं, तिचं दु:ख, संघर्ष आणि निरागसता पडद्यावर इतक्या ताकदीने साकारली की त्या व्यक्तिरेखेची छबी आजही प्रेक्षक विसरू शकत नाहीत. संध्या शांताराम यांनी केवळ मराठी नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्यामुळे एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ अशा चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.