@143bhkti
@143bhkti
स्त्रीवर केलेले सुंदर लिखाण....कोणी लिहिले माहिती नाही पण अफलातून वर्णन..... लेखक माहीत नाही. कुणाला तरी एका प्रवासात एकाने दिलेल्या मासिकातील पद्य बाई शिकली म्हणून शहाणी झाली नाही. ती शहाणीच होती... आधीपासून. आजही आहे. उंबरठ्याच्या आत गुलाम असली तरी सलामाची मानकरी होती ती, आजही आहे. ओझी वाढलीत तिच्या पाठीवरची. तरीही वाकली नव्हती ती. आजही नाही. ती माऊली होती, सावली होती. आजही आहे. पण बाहुली कधीच नव्हती. आजही नाही. ती होती कणा. नसून 'मी' पणा. ती होती जिद्द. सांभाळून हद्द. आजही आहे. ती नुसती अय्या - बय्या नव्हे, छय्या - पिय्या नव्हे, नुसती शय्या तर नव्हेच नव्हे. ती मनाचा हिय्या. होती आणि आहे. ती पणती, तीच तेल, वात, ज्योत. तीच तेज, प्रकाश. जळणारी आणि उजळणारी. तेव्हा आणि आताही. मार्ग खडतर. आयुष्य दुस्तर. मात्र ती कणखर. सुख कणभर, दु:ख मणभर. तरी ती घरभर. आभाळ जशी. आता ती उत्क्रांत. नाना क्षेत्रे पादाक्रांत. खांद्याला खांदा. पावलासोबत पाऊल. उज्वल उद्याची चाहूल.. मी खरच नतमस्तक🙏........ cp..... #👧Girls status #🌹नवरात्री coming soon
#

👧Girls status

👧Girls status - ShareChat
241 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
#

👌🏻हटके व्हीडियो

352 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..