अरावली पर्वताने आपला जीव वाचवण्यासाठी काय करावे!
.
तो बिचारा भाजपातही जाऊ शकत नाही.
.
पर्यावरणात निवडून येण्याची गुणवत्ता नसते. नाशिकची तपोवनातली झाडे कधी निवडणूक निधी थोडीच देणार आहेत. आरेचे जंगल , तिथली वनसृष्टी यांना मत देण्याचाही अधिकार नव्हता!
.
अजूनही कुठच्या झाडावर बसलेली एक चिमणी आई, चिमणा बाबा ! त्यांनी काडीकाडीने बांधलेल्या घरट्यात, उडू न शकणारे पिलू!
.
स्वतःला सुरक्षित समजणारे. आईच्या चोचीने खाणारे!
.
पडणार आहे ते पिल्लू!
.
ते कोसळून, डोके आपटून मरणार ! माणसांचा विकास होण्यासाठी , हायवेज होण्यासाठी ते मेले पाहीजेच! तेच नव्हे वारूळमुंग्या , सर्प , किटक, पशू-पक्षी कोणीकोणी म्हणून दिसू नयेत. पर्वत दिसू नयेत, नद्यादेखील राजकारण्यांनी बुजवून टाकाव्यात. मासेदेखील मेले पाहीजेत. माणसांचा विकास सुरू आहे.
.
या देशाच्या कानाकोप-यात, इंचाइंचात माणसेच माणसे दिसू द्या, हायवेज बॅकवेट हॉल्स होऊ द्या, प्रकल्प होऊ द्या महाकायचे महाकाय!
.
सृष्टी जगवून मंत्री काय करणार? झाडे, गायराने , तलाव , वने, उनवारापाऊस काय करायचाय!
.
पुढची तर नाही पण त्यापुढच्या पिढीतला कोणीतरी हा लेख वाचेल. अन , मी या पिढीतच जन्म घेतलेला असूनही मला माफ करील.
.
माझ्या, अजूनही भूतलावर न आलेल्या वंशजांनो, आमची पिढी तुमच्यासाठी एक इंचही पर्यावरण राहू न देण्याची शपथ खाऊन आली आहे. मी लिहून ठेवतोय. मी देखील याच पिढीतला आहे. पण, माणसांनी हैवान होऊन, जंगलांची, नदीची, पर्वताचीही जागा बळकावून "विकास" उर्फ बांधकामे करावीत, या मताचा नाही.
.
अन, माझ्या या मतांना काडीइतकीही किंमत कधी मिळणार नाही!
.
देव माणूस नावाच्या जमीनलोभी ,हडपू जनावराला सद्बुद्धी देवो! #फडणवीस #🏛️राजकारण #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎