🙏तुमचंच गाव बोलतंय..🙏
निवडणूका संपल्या की,
जमवून घेता मेळ..
मिळून मिसळून चाले मग,
लुबाडणूकीचा खेळ..
मर्जीतला सरपंच आणू,
चालतील आपली दुकानं..
गाव होईना का भकास,
जगू आपण सुखानं..
निवडणूक झाली की,
गोंधळ संपून जातो..
पाच वर्षे मग कसा
गाव शांत होतो..
सरकारी योजना देतांना,
मग गुपचूप घेता नाव..
गोरगरीबांना विसरून जाता,
हे बरं नाही राव..
मोजकेच होतात पात्र,
योजनेत इतर बसत नाही..
स्वयंघोषित समाजसेवकांना,
हे का बरं दिसत नाही..
कोण किती लबाड,
अन् खोटंखोटं वागतो..
लपूनछपून खातांना,
सारा गाव पाहतो..
विरोध कोणी करू जाता,
खिशात घालता नोट..
शांत बसा ना भाऊ,
ठेवा तोंडावरती बोट..
माझे चार,तुझे चार,
बेतला सारा गाव..
स्वतःचं पोट भरलं की,
जेवला सारा गाव..
चुकीचं घडतं तरी,
सारेच गप्प बसतात..
स्वार्थ साधला की मग,
बिळात जाऊन बसतात..
स्वार्थाचं राजकारण,
मनात माझ्या सलतंय..
परकं नका समजू मला,
तुमचंच गाव बोलतंय. #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎