आदिवासी हक्क, स्त्री स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठेसाठी अखंड लढा देणारे जननायक भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांच्या जुलमी अत्याचारांविरुद्ध प्रखर संघर्ष उभारला. जमिनीचे मूळ मालक असलेल्या आदिवासींना सावकारी आणि जमीनदारीच्या माध्यमातून भूमिहीन व वेठबिगार बनविणाऱ्या इंग्रजांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी आदिवासी तरुणांना संघटित केले. सशस्त्र लढा उभारून आणि स्वराज्याची #💐शुभेच्छा क्रियेटर🙏 #💐शुभेच्छा क्रियेटर🙏 #✨शनिवार स्पेशल स्टेटस😍 #✨शनिवार स्पेशल स्टेटस😍 घोषणा करून त्यांनी जुलमी इंग्रज शासनापुढे एक सशक्त आव्हान उभे केले. स्वातंत्र्याच्या उदात्त मूल्यांसाठी जीवनाच्या अखेरपर्यंत संघर्ष करणाऱ्या भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.💐💐🙏🏻🙏🏻