💐पाळणा(स्त्री जन्माचा)💐
कन्या जन्मली आपल्या घरी
लक्ष्मी प्रगटली आपल्या दारी
मिठाईवाटा साऱ्यांच्या घरी
जो बाळा जो जो रे जो 🌷
रेशमी दोरी हातात धरा
पाळणा हलवून देऊया वारा
सुंदर नावाने बारसं करा
जो बाळा जो जो रे जो🌼
चुडू दुडू तू धावत येशील
साऱ्यांचं मन वेढून घेशील
कौतुक सारे तुझे करतील
जो बाळा जो जो रे जो 🌸
शाळेत जेव्हा तू पहिल्यांदा जाशील
आजी आजोबा सोडायला येतील
तुझ्या येण्याची वाट ते पाहतील
जो बाळा जो जो रे जो 🌹
कॉलेजात जेव्हा पहिलं पाऊल
तुझ्या स्वप्नांची घेतील चाहूल
स्वप्न पूर्ण करण्यास सर्व धावतील
जो बाळा जो जो रे जो 🌺
लग्न करून सासरी जाशील
पाठवणीने नयन ओले होतील
तुझ्या सुखासाठी आनंदी राहतील
जो बाळा जो जो रे जो 🦚
दोन्ही घरची तू लक्ष्मी होऊन
मानसन्मान दोन्हींचा करशील
नावलौकिक सर्वांचा वाढवशील
जो बाळा जो जो रे जो🦋
रमाई,जिजाऊ, सावित्री सारखे
गुण तुझ्यात सदैव राहतील
स्त्री जन्माचा उद्धार करशील
जो बाळा जो जो रे जो 🦚🦋
सौ.एस.आर.कामत #📝कविता / शायरी/ चारोळी