#🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #🙏महामानव डॉ. आंबेडकर "तुम्ही शुरवीरांची संतान आहात.ही गोष्ट काल्पनिक नव्हे! भिमा कोरेगाव ला जावून बघा, तुमच्या पुर्वजांची नावे तेथील विजय स्तंभावर कोरलेली आहेत...!
तो पुरावा आहे की, तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात..."
*-विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर*
भीमा नदीच्या काठावर झालेली भीमा कोरेगावची लढाई एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी 1818 रोजी झाली होती.भीमा कोरेगाव विजयस्तंभ पेशवाईवरील विजयाचे शौर्याचे प्रतीक होय. समतेची न्यायाची लढाई म्हणून भीमा कोरेगावचे युद्ध इतिहासात अजरामर आहे. शूरवीरांच्या त्यागपूर्ण धाडस, अविचलधैर्य, शौर्यपूर्ण कृतीला क्रांतिकारी मानवंदना..!
जयभीम!!!