Girish Mahajan: महाजनांच्या 'निळ्या शर्ट'च्या विधानाने आगीत तेल ओतले! '40 वर्षात कधी...' म्हणत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न, पण वाद आणखी पेटला
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या भाषणात संविधान, लोकशाही आणि राष्ट्रीय मूल्यांवर भाष्य करण्यात आले, मात्र बाबासाहेबांचे नाव न आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मुद्द्यावरून सामाजिक व राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, मंत्री महाजनांवर टीकेची झोड उठत आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi