@244812640
@244812640

जय जय रघुवीर समथॆ

I love ShareChat

#

💔जख्मी दिल

62 जणांनी पाहिले
20 दिवसांपूर्वी
#

💗प्रेम / मैत्री स्टेट्स

38 जणांनी पाहिले
20 दिवसांपूर्वी
#

🎭Whatsapp status

28 जणांनी पाहिले
20 दिवसांपूर्वी
#

🌹प्रेमरंग

22 जणांनी पाहिले
20 दिवसांपूर्वी
#

🙏स्वामी समर्थ

💞Durga💞
#🙏स्वामी समर्थ #मी_एक_दानशुर..!! अनुभवास आलेली गोष्ट... आज सकाळी दत्त मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. मंदिरात प्रवेश करणार तोच नेहमी मंदिराच्या कोपऱ्यावर भीक मागणारी अंध म्हातारी दिसली. सुरकूतल्या चेहऱ्याने व कृश हाताने ती मंदिराचा दरवाजा चाचपडत होती. भीक मागत ही म्हातारी आज थेट इथपर्यंत आली हा विचार करून मी माझा पाऊच तिला भीक देण्यासाठी उघडला.. मुद्दामच नोटांच्या कप्प्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून चिल्लरच्या कप्प्याकडे हात घातला. त्यातही हाताशी आलेल्या १० व ५ रू च्या नाण्याला सोडून सगळ्यात छोटं एक रुपयाचे नाणं काढलं आणि स्वतःला दानशूर माणूस समजून देवाच्या अगदी समोरच तिच्या हातावर ( ज्यात अगोदरच काही नाणे होते) ते नाणं टेकवल. म्हातारीने त्या नाण्याचा स्पर्श होताच "सुखी रहाचा" भरभरून आशीर्वाद दिला.. एक रुपयाच्या बदल्यात देवाच्या साक्षीने सकाळी सकाळी "सुखी रहाचा" आशीर्वादाने मिळाल्याने मनोमन खुश होत मी दत्त दर्शनासाठी पुढं सरसावलो... बघतो तर ती म्हातारीही पुढं होत होती. मी म्हटले, दिले की आजीबाई पैसे अजून काय पाहिजे? म्हातारी म्हणाली, देवाला भेटायला निघाले बाळा. मी हसत बोललो, का गं, देवाकडे अजून पैसे मागायचेयत का ! म्हातारी म्हणाली, नाही रे तोच् तर रोज देत असतो तुमच्या सारख्यांच्या हातून. मी तिच्या उत्तराने थबकलो व माझा पूर्वीचा चेष्टेचा सूर बदलून तिला विचारले, मग काय आजी तुला दर्शन घ्यायचे आहे का !! म्हातारी हसत हसत बोलली, मला कुठे काही दिसत रे बाबा की आत जाऊन त्याच वेगळं दर्शन घ्यावं ! तिच्या या उत्तराने आता मी पुरता भांबावलो, दरवाज्याकडे परत वळलो व काहीतरी बोलायचं म्हणून बोललो, चल आज्जी तुला हात धरून देवापाशी घेऊन चालतो. म्हातारी म्हणाली तू चाललाय ना आत? मी: हो, का ग! म्हातारी म्हणाली, मग माझं येक काम करशील पोरा! मी: ( सांशक होत) बोल काय काम.. *म्हातारीने तिचा हात पुढे केला आणी बोलली येवढ देवाला देशील! *आणि तिने हाताची मुठ हळुवार उघडली, त्यात १०, ५, २, १ रू चे नाणे होते. *मी: हे देवाला द्यायचेत ?? *( तिची परिस्थिती बघून मी बोललो) *म्हातारी: हो. *मी: देवाला काय करायचे तुझे पैसे! *म्हातारी: अरे तोच तर मला देतो, मग मी नको त्याला काही द्यायला? *मी: अग पण देवाला नाई लागत पैसे , तो काय करेल याचं, उलटे हे तुझ्याच कामात येतील की. *म्हातारी: माझ्या पुरते तर तो रोज देतोच की, हे त्याच्या साठीचे आहे, त्याच्या पैश्याचं काय करायचं हे त्याचं तो जाणे, तू टाक हे पेटीत जा... *एवढं बोलून ती अंध म्हातारी तिच्या रोजच्या जागेकडे परत निघाली देखील, निष्काम पणे देवाकडे काहीही न मागता, देवाची झोळी भरून... *मी म्हातारीच्या खऱ्या औदर्याने भारावलेल्या अवस्थेत न कळत दत्त पादुकांपुढे पुढे उभा ठाकलो. *म्हातारीने हातात टेकवले सर्व नाणे दानपेटीत रीते केले आणि रीत्या मनाने व रीकाम्या हाताने मंदिराला प्रदक्षणा मारून दत्त संगमाकडे परत निघालो... *परततांना पुढे मंदिराच्या कोपऱ्यावर तीच् अंध म्हातारी तिच्या नेहमीच्या जागेवर बसलेली दिसली. अगदी प्रसन्न... *स्वतः शी हसत, काही तरी बडबडतांना... *ती हातात नुकत्याच कुणीतरी दिलेल्या ५०रू च्या नोटेला चाचपड, हसत काहीतरी पुटपुटत होती.. *कुतूहलापोटी मी ती काय पुटपुटतेय हे ऐकण्याचा प्रयत्न केला... *म्हातारी म्हणत होती, देवा तुला बी जरा दम नाही बाबा, लगेच पैसे परत पाठवले ते ही दस पट, मला काय करायचे रोज येवडे... *थोड्यावेळापूर्वी एक रूपयाचं नाणं टेकवणारा व्यवहारी मी परत एकदा निशब्द झालो, एकदम हरवलेला.... कधी त्या म्हातारीकडे बघत होतो तर कधी दूर गाभाऱ्यात बसलेल्या, न दिसणाऱ्या त्या दत्ताकडे... *कळतच नव्हत कोण मोठं? *रोज न चुकता या दीन दुबळ्यांची काळजी वाहणारा तो श्री दत्त परमपिता परमेश्वर मोठा की श्रद्धा व विश्वासाने त्या देवाचीही झोळी भरणारी ती अंध म्हातारी.. वाह रे भगवंता अन् वाह रे त्याचे भक्त..!! 🌹 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 🌹 #🙏स्वामी समर्थ
217 जणांनी पाहिले
21 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..