School Closed: पुन्हा वाढल्या 5वी पर्यंतच्या सुट्ट्या, थेट 'या' तारखेला सुरु होणार शाळा; 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील मोठी अपडेट!
School Closed: शाळांतील सुट्टी हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा क्षण असतो. देशभरात अनेक ठिकाणी थंडीची लाट असल्याने विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. उत्तर प्रदेशात सध्या कडक थंडीचे वातावरण आहे. पहाडांवरून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमान खूप कमी झाले आहे. गाजियाबाद जिल्ह्यात रविवारी किमान तापमान 4.8 डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले. जे राज्यातील चौथ्या क्रमांकाचे थंड जिल्हा ठरले. धुक्यामुळे सकाळी आणि रात्री लोकांना खूप त्रास होतोय. यामुळे हवामान विभागाने गाजियाबादसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. ज्यात दाट धुक्याची शक्यता वर्तवली आहे. येत्या काही दिवसांत तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे दैनंदिन जीवन प्रभावित होत आहे.