@27804188
@27804188

🌼 Bhushan Garud 🌼

✍ पत्रकार - पोलीस नामा ✍ 8459642630

#

🗞लोकसभा निवडणूक 2019

पुण्यातील लोकसभेच्या बहुचर्चित जागेवर मंत्री गिरीश बापट भूषण गरूड भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सहा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पुण्यातील लोकसभेच्या बहुचर्चित जागेवर मंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  पुण्याच्या लोकसभेच्या जागेसाठी खासदार अनिल शिरोळे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, आता त्यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्या ऐवजी पुण्यातून पालकमंत्री गिरीश बापट यांना तिकीट दिले आहे. लोकसभा निवडणूक लढण्यास बापट उत्सुक होते. त्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले. विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र, गिरीश बापट यांचे राजकीय वजन पाहून शिरोळे यांना तिकीट देण्यात आले नसल्याचे समजते. भाजपने पहिल्या उमेदवारी यादीत लातूरचे खासदार सुनील गायकवाड आणि दक्षिण अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांचेही तिकीट कापले आहे.   दरम्यान, बारामतीतून कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जळगावमधून स्मिता वाघ, नांदेड येथून प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरी येथून डॉ. भारती पवार आणि सोलापूर येथून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ईशान्य मुंबईतील उमेदवार भाजपने अद्यापही घोषित केलेला नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम वाढला आहे.
1.8k जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
#

🗞ब्रेकिंग न्यूज

मलिंगा आयपीएलच्या 12 व्या हंगामात 6 सामन्याना मूकणार भूषण गरूड आयपीएलच्या १२ व्या हंगामाला आज, (दि.२३) पासून सुरुवात होत आहे. ‘आयपीएल’च्या हंगामातील पहिला सामना गतविजेता चेन्‍नई सुपर किंग्जविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघामध्ये रात्री 8 वाजता सुरू होईल. भारतीय संघाच्या आजी आणि माजी कर्णधारातील होणार आजच्या या सामन्याकडे संपूर्ण क्रीडाप्रेमीचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या या सामन्यात कोणता संघ विजयी सलामी देणार यांची उत्सुकता लागून राहिली आहे. आयपीएलच्या या सामन्यात आजचा पहिला सामना चेन्‍नई सुपर किंग्जविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत असला तरी लाखो चाहत्याचे मुंबई इंडियन्सच्या संघाकडे लक्ष लागून राहिले आहे. २४ मार्च रोजी मुंबईची पहिली लढत डेक्‍कन चार्जर्स सोबत होणार आहे.  मात्र या सामन्यात वेगवान गोलदांज लसिथ मलिंगाची जादू पहायला मिळणार नाही. मलिंगाने वर्ल्डकप संघात आपले स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.  यावर मलिंगा म्हणाला, श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडे आपण टी20 लीग खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. मात्र श्रीलंकन बोर्डाने ज्या खेळाडूना वर्ल्डकपमध्ये खेळायचे असेल त्यांना देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धेत खेळावे लागणार असल्याचे सांगितले. तर या स्पर्धेसाठी खेळाडूना परत यावे लागणार असल्याचेही सांगितले. यावर मलिंगाने या स्पर्धेत आपण खेळणार असल्याचे सांगितले. यावर मलिंगाने श्रीलंकन बोर्डाला त्यांनी मुंबई संघास याची कल्पना द्यावी, कारण हा निर्णय बोर्डाचा असल्याचे सांगितले. आपण टी २० लीगमधील कमाईच्या नुकसानीसाठी तयार असल्याचेही मलिंगा म्हणाला. हा निर्णय मी देशासाठी घेत असल्याचेही मलिंगाने यावेळी सांगितले. त्यामुळे या हंगामात मलिंगाची जादू पाहता येणार नाही. मुंबई इंडियन्स संघ 2013, 2015, 2017 मध्ये विजेता तर 2010 मध्ये उपविजेता ठरला होता. मलिंगा या हंगामातील पहिले सहा सामने खेळणार नसल्याने मुंबईचे संघाच्या कामगिरीकडे लक्ष लागून राहणार आहे. तर आयपीएल स्पर्धेनंतर केवळ अडीच आठवड्यातच विश्‍वचषक स्पर्धेला प्रारंभ होईल. त्यामुळे खेळाडूंना या स्पर्धेत परफॉर्मन्स दाखवण्याबरोबरच स्वत:ला फ्रेश ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
1.6k जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
#

🗞ब्रेकिंग न्यूज

आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी 30 मार्च पर्यत मुदतवाढ भूषण गरूड राज्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणार्‍या २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता ३० मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी यापूर्वी २२ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र, आता ३० मार्च पर्यंत पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली.  आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली आहे. आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास ५ मार्च ते २२ मार्च अशी मुदत देण्यात आली होती. आतापर्यंत सुमारे २ लाख १३ हजार अर्ज राज्यभरातून आरटीई प्रवेशासाठी प्राप्त झाले आहेत. दरम्यान, अद्याप अनेक पालक आरटीई प्रवेशासाठी अर्ज करु शकले नव्हते. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी विविध संघटना, तसेच पालकांनी केली होती.  त्यानुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे परिपत्रक काढत आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास ३० मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे अद्याप अर्ज करु न शकलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे.  पुण्यातून सर्वाधिक ४८ हजार अर्ज प्राप्त  पुणे जिल्ह्यातून आरटीई प्रवेशासाठी आतापर्यंत राज्यातून सर्वाधिक सुमारे ४८ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील ९६३ शाळांंमध्ये १६ हजार ६१९ जागा उपलब्ध आहेत. अर्ज करण्यास ३० मार्च पर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे जिल्ह्यातील अर्जांची संख्या आणखी वाढणार आहे.
1.1k जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..