#💐संत महंत🙏 #✍️भक्ती संदेश #🌻आध्यात्म 🙏 ❗२७ डिसेंबर ❗
‼जय हरि विठ्ठल‼
🌷प्रवचनाचा विषय🌷
🟪🟥🟪भगवंताचे प्रेम कसे उत्पन्न होईल ते पाहावे.🟪🟥🟪
🔸️चमत्कार करता आले म्हणजे ब्रह्मज्ञान झाले असे म्हणता येणार नाही. संतांचे दर्शन झाले, पण त्याच्या आजूबाजूचे लोक पाहिले तर वाईट दिसतात. आपण दवाखाना पहायला गेलो तर निरोगी लोक आपल्याला तिथे कसे दिसतील❓🔸️
⭕आमची प्रपंचाची नड संताने दूर करावी, हे म्हणणे चुकीचे नाही का ❓ती दूर करण्याकरिता प्रापंचिकाकडे जावे, संताकडे नव्हे. आता, दुखणे बरे व्हावे म्हणून जरी 'राम राम' म्हटले, तरीसुद्धा ते वाया जात नाही.⭕
♦️सत्पुरुषांचे अत्यंत उपकार असतील तर रोगाचे निदान काय आहे ते त्यांनी शोधून काढले. आपल्याला हवेपणाचा रोग झाला आहे❗ हवेनकोपण जिथे आहे, तिथे समाधान नाही हे खास. आपल्या भजन-पूजनाचा हेतू कोणता असेल तो समजून भजन-पूजन करा म्हणजे झाले❗♦️
☀️आज भगवंत हवा असे म्हणणारे लोक थोडेच आहेत; आणि ज्यांना भगवंत हवा असतो तो भगवंतासाठी नको असतो, तो त्यांच्या प्रपंचासाठी हवा असतो.☀️
♦️ज्याला भगवंता करताच भगवंत हवा, त्याला समाधान खास मिळेल. त्याला कशाचीही अट नाही. त्याला वयाची मर्यादा नाही. विद्येची नाही, बुद्धीची नाही, पैशाची नाही, कशाचीही नाही; तळमळीची मर्यादा आहे.♦️
🔹️खरोखर परमार्थ हा अनुमानाचा नाही. 🔹️
🏵आपण नुसते बोलतो, कृति काहीच करीत नाही, म्हणून तो आपल्या आवाक्याबाहेर आहे असे आपल्याला वाटते. न करायला सबबी पुष्कळ सांगता येतात.🏵
⭕अर्जुनाला भगवंतांनी युद्धाला उभा राहा म्हणून सांगितले. अर्जुन सबबी सांगू लागला. देवास फार वाईट वाटले. देहबुद्धीमुळे, अभिमानामुळे, भगवंताच्या आज्ञेला सबबी येतात. व्यवहारात सबबी सांगण्याची आम्हाला फार सवय झाली आहे.⭕
🪞प्रयागला मुलगी आजारी पडली तर मनुष्य लगेच तिकडे जातो, आणि काशीस जायचे तर, योग येत नाही असे म्हणतो ❗आज्ञेला सबब सांगणे हे मोठे पाप आहे.🪞
💮एखाद्या सावकाराला सांगितले की तुझ्या जवळचे सर्व काही देऊन टाक, तर तो कदाचित् देईलही; पण 'मी' दिले, ही आठवण नाही जाणार त्याची. जो द्यायला सांगतो तोच दाता असतो, हे तो विसरतो💮
❄व्यापार्याला स्वप्न व्यापाराचेच पडते, त्याप्रमाणे आपण ज्याचा सहवास करावा त्याचे प्रेम येते. भगवंताविषयी प्रेम कसे उत्पन्न होईल ते पाहावे. सहवासाने, निश्चयाने, किंवा आपलेपणा विसरल्याने, परमेश्वराचे प्रेम येते.❄
🌀पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी नाही का आपल्याला प्रेम येत❓🌀
💢मुंबईत राहणार्याला मुंबई आवडते, याचे कारण सहवास.💢
❄गांजा प्रथम ओढताना जरी ओकारी आली, तरी सवयीने त्याचे प्रेम येऊ शकते.❄
🌸नापसंत नवर्याशी जरी लग्न झाले, तरी मुलगी निश्चयाने त्याच्यावर प्रेम करायला शिकते; म्हणजेच प्रेम निश्चयाने येऊ शकते.🌸
💠राम आपल्या हृदयात आहे ही भावना ठेवू या. 'रामाहून मी वेगळा नाही, आणि तो माझ्या हृदयात आहे.' असा दृढ निश्चय करून ही भावना वाढविली पाहिजे.💠
🍁#बोधवचन :आपले प्रेम प्रपंची लावले आहे, ते रामनामी लावायला पाहिजे.🍁
🌹#प्रवचने :श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌹
🚩🚩श्री राम जय राम जय जय राम🚩🚩
#🙏श्री महालक्ष्मी पौष शुद्ध षष्ठी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवी ची आजची अलंकार पुजा
26/12/25
#💐संत महंत🙏 #🌻आध्यात्म 🙏 #✍️भक्ती संदेश सद्गुरु कसा असावा ?
जे जे काही उत्तम गुण । ते ते सद्गुरूचे लक्षण । तथापि सांगो ओळखण । होए जेणे। । ५ -२ -६५ । ।
समर्थ गुरुलक्षण सांगताना सद्गुरु कसे ओळखावे ते सांगतात .चौदा विद्या ,चौसष्ट कला शिकवणारे गुरु सद्गुरु नाहीत असे सांगतात ,कारण ह्या सर्व कला पोटार्थी आहेत .त्या कोणत्याही कलेतून आत्मज्ञान प्राप्त होणार नाही ,त्यामुळे त्या कला शिकवणारे गुरु सद्गुरु नाहीत .आपले आई वडील सुद्धा आपले गुरु असतात ,पण सद्गुरु नसतात ,कारण ते आत्मज्ञान देत नाहीत .
मग सद्गुरु कोणाला म्हणायच ?त्यांची लक्षणे कोणती ?
बिघडले देव आणि भक्त । जीवशिवपणे द्वैत । तया देव भक्ता येकांत। करी तो सद्गुरु । । ५ -२ -१० । ।
प्रत्येक जीव स्वत :ला देह समजतो ,त्यामुळे देव आणि जीव ,देव आणि भक्त यात द्वैत निर्माण होते .ते द्वैत नाहीसे करण्याचे काम सद्गुरु करतात .देव आणि भक्त यांची गाठ घालून देतो .
प्राणी मायाजाळी पाडिले। संसार दु:खे दु:खवले । ऐसे जेणे मुक्त केले । तो सद्गुरु जाणावा । । ५ -२ -१२ ।
जीव मायाजाळी पडतो ,याचा अर्थ प्राणी स्वत :ला देह समजतो ,मी ,माझे ,माझी बायको ,माझी मुले ,माझा व्यवसाय सर्व माझ समजतो .त्यामुळे दु :खी होतो .मी कर्ता समजतो .यश मिळाल तर आनंदी होतो ,अपयश मिळाल तर दु :खी होतो . सद्गुरु आत्मज्ञान देवून देह्बुध्दी नाहिशी करतो ,आत्मबुध्दी निर्माण करतो . सुखदु :खातून प्राण्याची सुटका करतो .
वासनानदी माहांपुरी । प्राणी बुडता ग्लांती करी । तेथे उडी घालून तारी । तो सद्गुरु जाणावा । ।५-२-१३ । वासना म्हणजे एखादी वस्तू हवीच असे वाटणे .एक वस्तू मिळाली की दूसरी वस्तू हवी वाटते.त्यामुळे वासना नदी म्हटले आहे .हव नको कधी संपत नाही म्हणून वासनानदी चा महापूर म्हटले आहे .त्यामुळे प्राणी वासनेच्या महापुरात बुडून जातो ,तेथे सद्गुरु जीवाला हात देऊन वाचवतो ।
गर्भवास अति सांकडी । इच्छा बंधनाची बेडी। ज्ञान देऊन सीघ्रसोडी । तो सद्गुरु स्वामी । । ५ -२ -१४ । ।
इच्छा अनेक असल्यामुळे माणूस बंधनात पडतो .त्यामुळे बध्द होतो .जन्म मृत्यु च्या फे-यात अडकतो . सद्गुरु आत्मज्ञान देऊन बंधनाची बेडी तोडतो .प्राण्याची पुन्हा पुन्हा होणा-या गर्भावासातून सुटका करतो ,तो सद्गुरु असतो .
बाणे तिहींची खूण। तोचि गुरु सुलक्षण । तेथेचि रिघावे सुलक्षण । अत्यादरे मुमुक्षे। । ५ -२ -३० । ।
शास्त्रप्राचिती ,गुरुप्राचिती आणि आत्मप्रचिति ,यांचा मनोहर संगम गुरूच्या ठिकाणी असतो .श्रुती मध्ये व संताच्या ग्रंथामध्ये वर्णिलेला स्वरूपानुभाव ,सद्गुरुचा स्वानुभव ,आणि स्वत :चा अनुभव [गुरुचा ] अनुभव एकच असतो.त्याच गुरुलाच शरण जावे असे समर्थ म्हणतात .
मुख्य सद्गुरूचे लक्षण । आधी पाहिजे विमळ ज्ञान । निश्चयाचे समाधान । स्वरूपस्थिती । । ५ -२ -४५ ।
सद्गुरूचे मुख्य लक्षण आहे शुध्द ज्ञान .शुध्द ज्ञानामुळे त्याला मिळालेले समाधान कधीही भंग पावत नाही .आत्मज्ञानाने त्याचे संशय नाहीसे होतात .आत्मस्वरूपाशी सतत अनुसंधान राखले जाते .तो समाधानरूपच असतो .तो स्वस्वरूपापासून कधीही ढळत नाही.
म्हणोनि नवविधा भजन । जेथे प्रतिष्ठ्ले साधन । हे सद्गुरूचे लक्षण । श्रोती वोळखावे। । ५ -२ -४९ । ।
जो गुरु नवविधा भक्ती साधकांना करायला शिकवतो ,जो साधन मार्गास प्रतिष्ठा देतो तो सद्गुरु असतो.सद्गुरु शुध्द ज्ञानाने युक्त असल्याने त्याच्या जवळ साधकांना विश्रांती मिळते .ज्ञान वैराग्य ,भजन ,स्वधर्मकर्म , साधन ,कथा निरूपण ,श्रवण ,मनन ,नीति ,न्याय ,मर्यादा या सर्व गोष्टींचे पालन केले जाते तो सद्गुरु असतो .
जे जे काही उत्तम गुण । ते ते सद्गुरूचे लक्षण । तथापि सांगो ओळखण । होए जेणे। । ५ -२ -६५ । ।
सद्गुरु मध्ये सर्व प्रकाराचे उत्तम गुण असतात .आत्मज्ञाना मुळे जे सहज गुण येतात ते सद्गुरुत
असतातच ,याशिवाय अज्ञानी जीवांबद्दल अतिशय दया त्यांच्या अंगी असते .म्हणून समर्थ म्हणतात ,
नाना सद्विद्येचे गुण । याहिवरी कृपाळूपण । हे सद्गुरूचे लक्षण । जाणिजे श्रोती । । ५ -२ -७३ । ।
#🙏श्री महालक्ष्मी पौष शुद्ध पंचमी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवी ची आजची अलंकार पुजा
25/12/25






![💐संत महंत🙏 - ओलें मूळ भेदी खडकाचें अंग 0 आभ्यासासीसांग कार्यसिद्धी 0१ संत तुकाराम महाराज झाडाचे ओले मूळ लवचिक असते , पण 9٤ ते खडकालादेखील आत शिरत जाते॰ त्याप्रमाणे आपण जर चांगल्या प्रकारे कार्यसुद्धा अभ्यास केला तरकोणतेही कठीण व्यवस्थित पार पाडू शकते॰ నాశ] గెన ओलें मूळ भेदी खडकाचें अंग 0 आभ्यासासीसांग कार्यसिद्धी 0१ संत तुकाराम महाराज झाडाचे ओले मूळ लवचिक असते , पण 9٤ ते खडकालादेखील आत शिरत जाते॰ त्याप्रमाणे आपण जर चांगल्या प्रकारे कार्यसुद्धा अभ्यास केला तरकोणतेही कठीण व्यवस्थित पार पाडू शकते॰ నాశ] గెన - ShareChat 💐संत महंत🙏 - ओलें मूळ भेदी खडकाचें अंग 0 आभ्यासासीसांग कार्यसिद्धी 0१ संत तुकाराम महाराज झाडाचे ओले मूळ लवचिक असते , पण 9٤ ते खडकालादेखील आत शिरत जाते॰ त्याप्रमाणे आपण जर चांगल्या प्रकारे कार्यसुद्धा अभ्यास केला तरकोणतेही कठीण व्यवस्थित पार पाडू शकते॰ నాశ] గెన ओलें मूळ भेदी खडकाचें अंग 0 आभ्यासासीसांग कार्यसिद्धी 0१ संत तुकाराम महाराज झाडाचे ओले मूळ लवचिक असते , पण 9٤ ते खडकालादेखील आत शिरत जाते॰ त्याप्रमाणे आपण जर चांगल्या प्रकारे कार्यसुद्धा अभ्यास केला तरकोणतेही कठीण व्यवस्थित पार पाडू शकते॰ నాశ] గెన - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_989915_2bb400e2_1766722988643_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=643_sc.jpg)






