#✍️भक्ती संदेश #🌻आध्यात्म 🙏 #💐संत महंत🙏 *औदुंबर वृक्ष महात्म्य*
दत्त प्रभूंना औदुंबर वृक्षाप्रती मोठे प्रेम आहे. औदुंबरतळी त्यांचा निवास असल्याचे सर्वश्रूत आहे अनेक पुण्यवृक्ष त्यजून ।काय प्रीती औदुंबरी ?असा प्रश्न विचारल्यावरून एकोणविसाव्या अध्यायात श्री गुरूंनी औदुंबर वृक्षाची महती सांगितली आहे. श्री नृसिंह सरस्वतींनी औदुंबराचा संबंध श्रीनृसिंहाशी असलेला स्पष्ट केला आहे. हिरण्यकशिपूचा श्री र्नसिंहानी वध केल्यानंतर भगवंताच्या हाताची अतिशय आग होत राहीली. त्यावेळी लक्ष्मीने एक औदुंबराचे फळ आणले आणि
तये वेळी शीतलार्थ । नखे रोविली औदुंबरात । विषाग्नि झाला शांत । उग्र नरसिंह शांत झाला ।
अशा औदुंबरास दत्तपंथीयात कल्पवृक्षाचे स्थान प्राप्त झाले. या वृक्षाचे माहात्म वर्णन करतांना श्री गुरूचरित्रकारांनी म्हटले आहे,
तया समयिं औदुंबरासी देती वर हृषीकेशी । "सदा फळित तूं होसी । 'कल्पवृक्ष' तुझे नाम ॥१७॥
जे जन भजती भक्तीसीं । काम्यं होय त्वरितसीं । तुज देखतांचि परियेसीं । उग्र विष शांत होय ॥१८॥
जे सेवितील मनुष्यलोक । अखिलकाम्य पावोनि एक । फळ प्राप्त होय निके ।
पापावेगळा होय नर ॥१९॥
वांझ नारी सेवा करितां । पुत्र होतील तिसी त्वरिता । जे नर असतील दैन्यपीडिता । सेवितं होतील श्रियायुक्त ॥२०॥
तुझी छायीं बैसोन । जे जन करिती जपानुष्ठान । अनंत फळ होय ज्ञान । कल्पिलें फळ होय त्यांसी ॥२१॥
तुझे छायीं जळांत । स्नान करितां पुण्य बहुत । भागीरथीस्नान करीत । तितुकें पुण्य परियेसा ॥२२॥
तुज सेविती त्या नरासी । व्याधि नव्हती कवणे दिवसीं । ब्रह्महत्यादि महादोषी । परिहार होती परियेसा ॥२३॥
जें जें कल्पूनि मानसी । तुज सेविती भावेसीं । कल्पना पुरती भरंवसी । कलियुगी कल्पवृक्ष तूंचि ॥२४॥
सदा वसों तुजपाशीं । लक्ष्मीसहित शांतीसी" । म्हणोनि वर देती हर्षी । नरसिंहमूर्ति तये वेळी ॥२५॥
ऐसा वृक्ष औदुंबर । कलियुगीं तोचि कल्पतरु ।
।।श्री गुरूदेव दत्त ।।
#🙏श्री महालक्ष्मी मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवी ची आजची अलंकार पुजा
2/12/25
#🌺गणपती 🍁 *श्री सिध्दिविनायक प्रसन्न!!*🍁
*श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास*
🛕 🙏 *आजचे शुभ दर्शन* 🛕 🙏
*मंगळवार दिनांक ०२ डिसेंबर २०२५*
*🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏*
*वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |*
*निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ||*
🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🌹
🍁 *ॐ गं गणपतये नमः* 🍁 🛕 *बाप्पा सर्वाना सुख, समृद्धी,निरोगी व भरभराटी देऊन आनंदात ठेवा*🛕 🚩🚩🚩 *जय गणेश*🚩🚩🚩
🏮🏮🏮🛕🏮🏮🏮
*🌺शुभ सकाळ*🌺
#🙏श्री महालक्ष्मी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवी ची आजची अलंकार पुजा
1/12/25
#🌺गणपती 🍁 *श्री सिध्दिविनायक प्रसन्न!!*🍁
*श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास*
🛕 🙏 *आजचे शुभ दर्शन* 🛕 🙏
*सोमवार दिनांक ०१ डिसेंबर २०२५*
*🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏*
*वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |*
*निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ||*
🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🌹
🍁 *ॐ गं गणपतये नमः* 🍁 🛕 *बाप्पा सर्वाना सुख, समृद्धी,निरोगी व भरभराटी देऊन आनंदात ठेवा*🛕 🚩🚩🚩 *जय गणेश*🚩🚩🚩
🏮🏮🏮🛕🏮🏮🏮
*🌺शुभ सकाळ*🌺













