*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१० डिसेंबर इ.स.१६५९*
छत्रपती शिवरायांचे सरदार दौलोजीने कोकणातील "दाभोळ" किनारा जिंकला.
*१० डिसेंबर इ.स.१६५९*
"हेन्री रेव्हींग्टन" या इंग्रज अधिकाऱ्यानेे राजापूरहून लंडनला एक पत्र पाठवले. यात अफजलखान वधाबाबत व छत्रपती शिवरायांनी आदीलशाहीस धडा शिकविण्याबाबत उघडलेल्या मोहीमेबाबत उल्लेख केला.
छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेहून १७०० ची फौज घेऊन काही दिवसात येतील व इथले सर्व राज्य जे काही इंग्रजी हुकुमतीखाली आहे, ते बुडवतील असा उल्लेख करुन पाठवीले.
*१० डिसेंबर इ.स.१६६१*
"सरसेनापती नेताजी पालकर" हे सुपे ते परिंडा या मुघल परगण्यात भयानक धुमाकुळ घालत असल्याची खबर शाहीस्तेखानाला पुण्यातील लाल महालात समजली. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*९ डिसेंबर इ.स.१६६६*
पुरंदर तहानंतर मोंगल-मराठा फौजा विजापूरवर निघाल्या. त्यावेळी छत्रपती शिवरायांचा सेनापती नेताजी पालकर यांने फलटणचा किल्ला मोंगलांना घेऊन दिला.
*९ डिसेंबर इ.स.१६७३*
छत्रपती शिवराय कर्नाटकातील कारवार येथे दाखल झाले.
*९ डिसेंबर इ.स.१६८१*
मराठ्यांचा छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली अभेद्य अशा सागरी जलदुर्ग "किल्ले जंजिरा" वर हल्ला. पण इकडे मुघल सैन्य पनवेल पर्यंत येऊन धडकलं होतं आणि राजधानी "किल्ले रायगड" वर हल्ल्याचा त्यांचा डाव होता.
छत्रपती संभाजीराजांना ही खबर मिळताच मराठ्यांना पुन्हा एकदा जंजिऱ्याच्या या मोहीमेतून माघार घ्यावी लागली.
कारण त्यावेळी जंजिरा जिंकण्यापेक्षा राजधानी "किल्ले रायगड" वाचविणे महत्वाचे होते. #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*८ डिसेंबर इ.स.१६६५*
नेतोजी पालकरांनी विजापूरकरांकडून ताथवडा उर्फ संतोषगड जिंकला
*०८ डिसेंबर इ.स.१६९९*
औरंगजेब बादशाह अजिंक्यतारा घेण्यासाठी सरसावला तेव्हा अजिंक्यताराचे किल्लेदार होते प्रयागजी प्रभू.गड घेण्यासाठी बादशाहचे प्रयत्न सुरु झालेगडाच्या वाटेवर मोगल गस्त घालू लागले.
मराठ्यांचे गडावर येणे जाणे कठीण होउन बसले.
गडावर तोफांचा मारा सुरु झाला, औरंगजेबास जास्तीत जास्त आठवडाभरात गड ताब्यात येइल असे वाटत होते पण महीने गेले तरी सुद्धा गडावरचे मराठे काही दाद देई नात.
एकदा तर बादशाही सैन्याने गडावर सुलतानढावा सुद्धा केला पण मराठ्यांच्या तिखट प्रतिकारा समोर मोगली सैन्याला माघार घ्यावी लागली
*८ डिसेंबर इ.स.१७४०*
रेवदंडयाचा किल्ला मराठ्यान्नी अखेर दिडवर्षाच्या लढाईनंतर पोर्तुगिझांकडून जिंकला.
'मानाजी आंग्रे' आणि 'खंडोजी मानकर' यांच्या नेतृत्वाखाली लढाई देत मराठी फौजांनी आणि आरमाराने विजय प्रस्थापित केला... #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*७ डिसेंबर इ.स.१६६५*
सर सेनापती नेताजी पालकरांनी
विजापूरकरांकडून फलटण जिंकले.
*७ डिसेंबर इ.स.१६७२*
बारदेशातील मिठावर जास्त जकात बसवण्यासाठी महाराजांनी नरहरी आनंदराव यांना लिहलेले पत्र -
प्रति- नरहरी आनंदराव, सरसुभेदार, ता कुडाळ. ७ डिसेंबर १६७२। साहेबी प्रभावळी पासून कल्याण भिवंडी पावेतो जबर निरखाचा तह दिल्हा आहे. बरदेशात मीठ बंदरे आहेती. तेथून मीठ खरेदी करून उदमी नेत आहेत. हल्ली आपणाकडे मिठाचा पाड जबर झाला. हे गोष्टी ऐकोन उदमी सर्व बारदेशाकडे जातील. तरी तुम्ही घाटी जकाती जबर बैसवणे. संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडेल ऐसा जकातीचा तह देणे. #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*६ डिसेंबर इ.स.१६६३*
*सुरतेवर स्वारी करण्यासाठी छत्रपती शिवरायांचे राजगडावरून प्रस्थान*
मोगल सरदार शाहिस्तेखान ३ वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून होता. त्यादरम्यान मराठा साम्राज्याला मिळणारा महसूल कमी होऊन राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. त्याला पुण्यातून हुसकावून लावल्यावर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने हालचाल केली नसनी तर राज्याचे दिवाळे निघण्याची पाळी आली असती.
राजगडापासून ३२५ किमी उत्तरेस असलेल्या दक्षिण गुजरातमधील सुरत शहर.
सुरत त्यावेळी मोगलांचे आर्थिक केंद्र आणि प्रमुख व्यापारी बंदर होते. युरोप, आफ्रिका तसेच मध्यपूर्वेशी येथून मोठ्या प्रमाणात व्यापार होई. या व्यापारावरील करातून मोगलांना दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळे. सुरतेचे शहर मोगलांच्या साम्राज्य सीमेपासून शेकडो किलोमीटर दूर असूनसुद्धा सुरतेला बलाढ्य तटबंदी करण्यात आलेली होती. या किल्ल्यावर व आसपास ५,००० सैनिकांची तरतूद होती.
सुरतेतील आर्थिक व भोवतीच्या सैनिकी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी आपला मुख्य हेर बहिर्जी नाईक याची नेमणूक केली. सुरतेची बित्तंबातमी काढून बहिर्जीने छत्रपती शिवरायांची भेट घेतली व सुरतेवर हल्ला केला असता मोठा खजिना हातात येईल असे सांगितले. यावर मसलत करून महाराजांनी सुरतेवर चाल करून जाण्याचा बेत रचला.
*६ डिसेंबर इ.स.१७०१*
मल्कापुरास मुक्काम करून विशालगडा नजीक
अंबा येथे औरंगजेब ६ डिसेंबर १७०१ रोजी दाखल झाला. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
५ डिसेंबर इ.स.१६७३
शिवरायांनी सर्जाखानाचा पराभव करून त्यास ठार मारले.
सन इ.स.१६७३ पावसाळा थांबला आणि राजांचे विजयी अश्व पुन्हा दौडू लागले मोहीम फत्तेच्या इशारती उडवू लागले, याच सुमारास कर्नाटकात यादवी निर्माण होऊन मृत राज्याच्या विधवा पत्नीने महाराजांची मदत मागितल्यावरून राजांनी रायगड सोडला.
राजे हुबळी, काद्रा, कारवार, बंकापूर या भागात स्वारीवर गेले. या भागात मराठ्यांना रोखण्यासाठी बहलोलखानने सर्जाखानाची रवानगी केली. त्याने मराठ्यांना चांदगड परिसरात गाठले.
झालेल्या झुंजीमध्ये मराठ्यांच्या बाजूचे विठोजी शिंदे नामक एक नामांकित सरदार ठार झाले. पण मराठ्यांनी सर्जाखानला मागे रेटलाच व ते बंकापूरच्या दिशेने पुढे सरकले तर बंकापूर ला बहलोलखान हा अडथळा म्हणून समोर आला. चिडलेले मराठे यानंतर पन्हाळ्याच्या रोखाने मागे फिरले. पन्हाळ्याजवळ बेहलोलच्या सैन्याशी मराठ्यांचे घनघोर युद्ध झाले. या युद्धात विठोजी शिंदे यांच्या हत्येचा सूड सर्जाखानला मारून उगवला.
५ डिसेंबर इ.स.१६८२
छत्रपती शंभुराजेंच्या सरदार नारो त्रिमल आणि मुघल सरदार माणकोजी यांच्यात चकमक झाली. #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
४ डिसेंबर इ.स.१६७३
छत्रपती शिवाजी महाराजांनी कारवार जिंकले.
४ डिसेंबर इ.स. १६६४
छत्रपती शिवराय गोव्यातील फोंडा किल्ल्यावर मुक्कामास आले.
४ डिसेंबर इ.स.१६७९
शंभूराजे अखेर पन्हाळ्याला परतले
औरंगजेबाने दिलेरखानाला गुप्तपणे निरोप पाठविला की , " संभाजीला कैद करुन दिल्लीला पाठवा !"अन् ही बातमी खुद्द संभाजीराजांना समजली !
संभाजीराजांनी ठरवलं इथून निसटायचं ... अखेर येसूबाईसाहेबांनी पुरुषाचा पोषाख केला आणि रात्रीच्या अंधारांतून शंभूराजे सहकुटुंब पळाले ( दि. २० नोव्हेँबर १६७९). त्यांनी तडख विजापूर गाठले . तिथून पुढे महाराजांकडून न्यायला आलेल्या मंडळींस येऊन सामील झाले ( दि. ३० नोव्हेंबर १६७९). तेथून तडक लांबच्या दौडी मारत दि. ४ डिसेंबर १६७९ ला शंभूराजे अखेर पन्हाळ्याला येऊन दाखल झाले .
संभाजीराजे परत आलेले ऐकून महाराजांस अत्यंत आनंद झाला . ते युवराजांना भेटायला पन्हाळगडास निघाले . #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*३ डिसेंबर इ.स.१६७८*
छत्रपती संभाजीराजे रोजी मुघलांकडे गेले.
बा. सी. बेंद्रे यांनी त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकात अॅबे करेने लिहलेला अवहाल मांडतात" .....हा अॅबे करे आपल्या अवहालात लिहतो की," छत्रपती शिवाजी महाराज या मुलाला मुघली प्रांतात ठेवण्याचा मुख्य हेतु म्हणजे त्यांनी औरंगजेबाच्या मुलाबरोबर म्हणजे शहजाद्याबरोबर गुप्त कट घडवुन आणावा. शहजाद्याची आणि छत्रपती संभाजीराजेंची चांगलीच मैत्री जमली होती. एकमेकांच्या राजकारणांत एकमेकांशी विश्वासाने खलबत करू लागले. ही गट्टी इतकी जमली की त्यांचेकडुन गुप्त असे काहीच राहात नसे. तो छत्रपती संभाजी राजेंना अधिकाधिक प्रेमाने वागवित असे. कारण की , शहजाद्याला छत्रपती संभाजीराजेंकरवी छत्रपती शिवाजी महाराजांची मदत हवी होती.
करे पुढे सांगतो की " शहा आलमने त्याच्या बापाकडुन त्याच्याविरूद्ध अविश्वासाचे उदगार एकायला मिळतात; कारण औरंगजेबाच्या दरबारातील लोक आपला द्वेष करतात त्यामुळे आपल्याला दरबार सोडुन दक्षिणेच्या सुभेवर पाठवलंय. येथे बापाचे पुष्कळ सैन्य आहे त्या सैन्यावरील अधिकारी आपले बाजूचे असून ते केव्हाही आपण सांगू तेव्हा पादशहाविरूद्ध बंड करतील. आणि छत्रपती संभाजी हे सर्व घटना छत्रपती शिवाजीला वारंवार कळवीत असे. आपल्या आकांक्षा सुफलित करून घेण्यास नवीन राजकारण हाती आल्यामुळे छत्रपती शिवाजींना फार आनंद झाला. अशा तऱ्हने छत्रपती शिवाजींनी आपल्या मुलाला युद्धशास्त्र शिकवताना राजनितीचीही अनुभवसिद्ध शिकवण देण्याचा प्रयत्न केला."
अॅबे करेचा हा अहवाल खुप महत्वाचा आहे. कारण या अहवालाच्या सहाय्याने पुढील अपरिचित गुप्त राजकारणाचे रहस्य दडले आहे.
ज्यावेळी छत्रपती संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले त्यावेळेस शहजादा शहाआलम पुन्हा दक्षिणेच्या सुभेदारीवर आलेला होता. आपल्या आधिच्या मैत्रपुर्ण संबंधातुन अर्धवट राहिलेली राजकारण छत्रपती संभाजीराजेंना सिद्धिस न्यायचे होते अशी दाट शंका येते कारण शहजादा औरंगबादेस येईपर्यंत छत्रपती संभाजीराजे मुघलांकडे गेलेच नाहीत. नोव्हेंबर १६७८ अखेर शाहा आलम औरंगाबादेस येऊन पोहचेल अशी बातमी होती आणि छत्रपती संभाजीराजे ३ डिसेंबर १६७८ रोजी मुघलांकडे गेले.
फितुर झालेल्या बर्याच जणांचे हात पाय तोडण्याची शिक्षा करणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजांना मोगलांच्या छावणीतुन हरप्रकारे प्रयत्नकरुन का सोडवले असतील... हंबीरराव मोहिते फौजेसह मोगल छावणीच्या परिसरात फिरत होते व योग्य वेळी छत्रपती शंभुराजांना मोगली छावणीतुन बाहेर काढले. महाराजांना स्वराज्यावर येणार्या पुढील संकटाची(औरंगजेबची स्वारी) कल्पना होती. त्यांनी त्या द्रुष्टीने तयारी म्हणून मुद्दाम छत्रपती संभाजी राजांना दिलेरखानाकडे पाठवले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्याविषयी असलेल्या गढूळ वातावरणामुळे त्यांच्यावर मुघल लोकांची मर्जी बसेल आणि बरीच माहिती गोळा करता येईल असा हेतू असावा. नंतर या गोष्टीचा छत्रपीसंभाजी राजांना जेव्हा ते औरंगजेबाशी झुंजत होते तेव्हा फायदा झाला . कदाचित मुघल छावणीत राहून छत्रपती संभाजी राजांनी काही माणसे हेरली असावीत ज्यांनी नंतर छत्रपती संभाजी राज्यांना मदत केली.
*३ डिसेंबर इ.स.१६७९*
छत्रपती शिवराय पट्टागडास विश्रांतीसाठी मुक्कामी. #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२ डिसेंबर इ.स.१६६७*
छत्रपती शिवराय व पोर्तुगीज यांच्यात सहसंमतीने दोन्ही बाजुने तहास मान्यता या झालेल्या तहामध्ये पोर्तुगीजांना 2 प्रमुख गोष्टी मान्य कराव्या लागणार होत्या. सिध्दीना मदत करायची नाही व छत्रपती शिवाजी महाराजांच्या लहान नौकांना समुद्र संचारास कोणताही अडथळा येणार नाही.
सागरी सामर्थ्यावर वर्चस्व असणाऱ्या पोर्तुगीजांनासुद्धा या गोष्टी मान्य कराव्या लागल्या
*२ डिसेंबर इ.स.१६६९*
छत्रपती संभाजीराजे सरसेनापती प्रतापराव गुजर, निराजी रावजी यांना त्यांच्या २५०० फौजेसह अटक करा, अशी खबर औरंगजेबने शहजादा मुअज्जमकडे पत्राद्वारे पोचवली. पण हे पत्र पोचण्याआधीच मुअज्जमला ही खबर कळाली, मग त्याने शंभूराजे आणि मराठी सैन्याला निघून जायचा सल्ला दिला. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*#शिवरायांचे_अपरिचित_मावळे_*
*#मावळे_स्वराज्याचे_वैभव_महाराष्ट्राचे_*
*चला इतिहास वाचूया*
*मावळ्याचे नाव :- शूरवीर बाजी सर्जेराव जेधे*
*‘ह्यो हात न्हवं... दुस्मनाचं रगात पिनारा दुधारी पट्टा हाय...राजांकडं नुसती नजर जरी वाकडी क्येली तरी मुंडकं उतरवून ठिवंन... गनिमाला फाडणारी शिवरायांची दुधारी तलवार सरदार बाजी सर्जेराव जेधे’...*
स्वराज्याचे निशाण – स्वराज्य उभारणीचा शहाजीराजांचा मनसुबा फसला आणि ते विजापूरच्या आदिलशाहची चाकरी करू लागले. बंगळुर हे शहाजीराजांचे जहागिरीचे ठिकाण. जिजाबाईसाहेब आणि शहाजीराजांनी बंगळुरात काही मसलत करून बालशिवबाला महाराष्ट्रात पुणे मुक्कामी पाठविण्याचे योजिले. शहाजीराजांनी बालशिवबाला आपले काही निष्ठावान सरदार, हत्ती, घोडे खजिना व ‘भगवा झेंडा’ दिला. बालशिवबा जिजाबाईसाहेबांसमवेत बंगळुरहून पुण्याकडे निघाला.
पुण्याच्या कसबा गणपतीला वंदन करून आई तुळजाभवानीला साक्ष ठेवून बालशिवबाने मावळच्या दर्याखोर्यात स्वराज्याचा यज्ञ पेटविला! मुरुंबदेवाचा डोंगर (राजगड), तोरणा, कोंढाणा इ. समिधा यज्ञात पडल्या… आणि अलिआदिलशहाची झोप उडाली! प्रथम त्याने कपटाने शहाजीराजांना जिंजीजवळ पकडून अटकेत टाकले आणि आपल्या फत्तेखान नावाच्या सरदाराला प्रचंड फौजेनिशी स्वराज्यावर सोडले. सुभानमंगळ ताब्यात घेऊन फत्तेखान सासवडजवळील खळद-बेलसर या गावाजवळ तळ देऊन बसला. नुकतेच मिसरूड फुटलेले शिवाजीराजे पुरंदर किल्ल्यावरून युद्धाचे डावपेच आखू लागले. महाराजांच्या हुकमावरून मावळ्यांची एक तुकडी सुभानमंगळावर तुटून पडली. सुभानमंगळ फत्ते झाला. फत्तेखानाच्या सरदारांचा दारुण पराभव झाला. सुभानमंगळवर भगवा झेंडा फडकला! स्वराज्यासाठी लढती गेलेली ही पहिली लढाई! (8 ऑगस्ट 1648)
आत्ता पाळी होती फत्तेखानाची! पुरंदरावर जमलेल्या जिवलगांना महाराजांनी अपुला मनसुबा सांगितला. फत्तेखानाला गनिमी काव्याचा इंगा दाखवायचा. सगळ्यांनी आनंदानी माना डोलवल्या. पुरंदराहून फत्तेखानाच्या छावणीच्या दिशेने बिनीच्या तुकडीने कूच केले. तिच्यामागोमाग इतरही मावळे निघाले. सगळ्यात शेवटी निघाली भगव्या झेंड्याची तुकडी. या तुकडीत एका जवान मावळ्याच्या हाती भगवा झेंडा होता. या तुकडीत तगडे पन्नास-पंचावन्न आडदांड मावळे सामील झाले होते. पुरंदराहून हे वादळ फत्तेखानाच्या छावणीच्या रोखाने खळद-बेलसरकडे घोंघावत निघाले. भगवा झेंडा वार्यावर फडफडत होता!
मराठ्यांच्या तुकड्या बेलसरच्या परिसरात घुसल्या आणि इशारत होताच फत्तेखानाच्या छावणीवर तुटून पडल्या! खानाचे लष्कर लढाईस सज्ज झाले. भयंकर हाणामारी सुरू झाली. आपलं बळ कमी पडतंय हे जाणून मराठ्यांची बिनीची तुकडी हळूहळू काढता पाय घेऊ लागली. झेंड्याची तुकडी मात्र माघारी फिरली नव्हती. उलट त्या मर्दांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढविला. खानाच्या सैन्याने झेंड्याच्या तुकडीला घेरले. गनिमांनी अगदी झेंड्यावरच गर्दी केली. झेंडा हेलकावू लागला. झेंडा पडला तर अब्रूच गेली. प्रत्येकजण झेंडा वाचविण्यासाठी शर्थ करू लागला. झेंडा धरलेल्या जवानाला गनिमांपैकी कोणाचा तरी इतक्या जोरात घाव बसला की तो स्वार घोड्यावरून खाली कोसळलाच. त्याच्या हातातला झेंडा निसटला. आता झेंडा जमिनीवर पडणार इतक्यात… एका तलवारबहाद्दराने झेंडा वरच्यावर पकडला. जखमीस्वाराला तशाच जलदगतीने दुसर्या एका घोड्यावर घेऊन झेंडा आपल्या हाती ठेवला आणि तुकडीला माघार घेण्याचा हुकूम केला. झेंडा हातात तोलीत त्या समशेरबहाद्दराने झेंड्याच्या तुकडीसह पुरंदराकडे कूच केले. झेंड्याभोवतीच्या गनिमांना कापून जमिनीवर पडणारा झेंडा हवेत वरचेवर झेलून मराठ्यांची अब्रू वाचवणार्या त्या समशेरबहाद्दराचे नाव होते बाजी जेधे! कान्होजी जेध्यांचा लेक!
बाजी झेंड्याच्या तुकडी सोबत हर हर महादेव च्या गर्जना देत पुरंदराकडे निघाला. प्रणाहून प्रिय असलेल्या मराठ्यांच्या ह्या भगव्या झेंड्याची रक्षा या समशेर बहाद्दराने केली होती.
प्रतापगड युद्धात मर्दुमकी गाजवणार्या कान्होजी जेंध्याचा पुत्र बाजी जेथे यास महाराजांनी त्याच्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘सर्जेराव’ ही पदवी बहाल केली. बाजी जेध्यांचा झाला ‘बाजी सर्जेराव जेधे’! #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩













