
⛳छ.शिवरायांचे निष्ठावंत मावळे⛳
@400213329
शिवकालीन इतिहासासाठी follow करा
#📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
#📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
#📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩
*२२ ऑक्टोबर १६७९*
*मराठ्यांना खांदेरीला रसद पुरवण्याचा मार्ग मोकळा होता. २२ ऑक्टोबर रोजी राजापूरहून आलेली मराठ्यांची आणखी ३७ गलबते नागावच्या दलात सामील झाली. मराठे सैन्य वाढवीत होते त्या अर्थी ते लवकरच निकाली लढाई करतील असे केग्विनला वाटत होते. पुढील दहा दिवस मात्र मराठ्यांचा एक वेगळाच बेत चालला होता. इंग्रज रिव्हेंज आणि फोर्च्युन घेवून मराठ्यांच्या भीतीने खांदेरीच्या आसमंतापासून दूर रहात होते. याचा फायदा घेवून मराठे आपल्या लहान नौकांच्या आधारे रोज खांदेरीला रसद पुरवीत होते. केग्विनला रोज ५-७ नौका खांदेरीला जाताना अथवा येताना दिसत, मग इंग्रज सैन्य आपले मचवे त्यांच्या पाठीमागे पाठवत असत, पण त्या होड्या त्यांना चकवत व नागावच्या *युवा राजे मित्र मंडळ तलमोड ता.उमरगा जि.धाराशिव, महाराष्ट्र* खाडीत पळून जात असत. इंग्रज खाडीत शिरत नव्हते कारण तो संपूर्ण प्रदेश मराठ्यांचा होता व खाडीत शिरल्यानंतर जर खाडीच्या मुखावर मराठ्यांनी हल्ला करून मार्ग बंद केला असता, तर इंग्रजी आरमार आयतेच अलगद मराठ्यांच्या हाती लागले असते. मराठ्यांचा खांदेरीला पुरवठा, इंग्रजांचा त्यांचा पाठलाग आणि मराठ्यांनी त्यांना चुकवणे किंबहुना बऱ्याचदा तर इंग्रजांना पिच्छा करायला लावून आपल्या जाळात अडकवणे आणि दूर नेवून एखादा मचवा पकडणे हा मराठ्यांचा व्यवसाय अगदी व्यवस्थित सुरु होता. गनिमी काव्याचा हा सागरावरील केलेला बहुदा हा पहिलाच प्रयोग असावा ! .इंग्रज या रोजच्याच उपद्व्यापामुळे जेरीस आले. केग्वीन या त्रासाने वैतागला आणि त्याने १ नोव्हेंबर १६७९ रोजी मुंबईला जे इतिहासप्रसिद्ध पत्र लिहिले त्याचा हा सारांश -*
*“नागाव नदीच्या मुखाशी नौका ठेवण्याच्या बेताविषयी गेल्या पत्रात आपल्याला कळवले होते त्याप्रमाणे दिवसा ते शक्य नाही आणि रात्री चंद्र मावळेपर्यंत गस्त देऊनही उपयोग नाही कारण शत्रूची गलबते उशिराने येतात व वल्ही मारण्यात त्यांची शिताफी अधिक असल्यामुळे त्या आमच्या हाती लागत नाहीत. आम्ही त्रस्त आहोत. त्यांना अडविण्याच्या बाबतीत आम्ही कसलीही कसूर होऊ देत नाही याची आपण शाश्वती बाळगावी परंतु त्या लहान सरपटणाऱ्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने चकवतात.आता आम्हाला असे वाटू लागले आहे की आमच्या कडेही तसल्या होड्या असतील तर आम्हाला कदाचित मदत होवू ही शकेल …”*
*ज्या इंग्रजांना अगोदर वाटले होती की मराठ्यांच्या लहान होड्या आपण काही मोठी गलबते नेवून आरामात बुडवून टाकू तेच इंग्रज आता वरील पत्र लिहीत होते या वरून मराठ्यांचा निग्रह, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी आणि त्यांची अनोखी युद्धनीती दिसून येते. गनिमी काव्याचा वापर करून ज्या मराठ्यांनी आजवर शत्रुसैन्याला डोंगर-दऱ्यांमधे जेरीस आणले होते त्यांनी तीच युद्धनीती सागरावर अवलंबून बलाढ्य सागरी सत्तेला जेरीस आणले होते.*
🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩
*२२ ऑक्टोबर १७६४*
*मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई. बक्सार बिहार प्रातांत पाटण्याच्या पश्चिमेस सु. १२० किमी. वर गंगा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे.*
🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩
*२२ ऑक्टोबर इ.स. १६६०*
*छत्रपती शिवराय पन्हाळ्यावर आले.*
🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩
*२२ ऑक्टोबर इ.स.१६६१*
*शिवरायांचा किल्ले शिवनेरी व पायथ्याच्या जुन्नर भागावर हल्ला.*
🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩शिवराय
#📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #⛳शिवरायांचे निष्ठावंत मावळे⛳
#🌷नरक चतुर्दशी🙏 #✨दिवाळी स्टेटस🪔 #🧘दिवाळी अभ्यंगस्नान #📖दिवाळीच्या पौराणिक कथा🙏
#📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩शिवराय
#📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर












