मॅडम ,
तुम्ही फार छान दिसता....
जितक्या छान दिसता ,
त्यापेक्षाही छान
तुम्ही हसता मॅडम...! ?
तुमचंही एक घर असेल ,
नवरा असेल , सासू असेल ,
सासरा असेल , दीर असेल ,
घरात सारखी पिरपिर असेल
जाऊ बाई जोरात असतील
नणंद बाई तोऱ्यात असतील
तुम्हाला छोटी छोटी
मुलं असतील ,
तुमच्या बागेत फुलं असतील
सर्वांसाठी तुम्ही
अहोरात्र झिजता ,
आणि तरीही ,
मॅडम तुम्ही फार छान दिसता
जितक्या छान दिसता ,
त्यापेक्षाही छान तुम्ही हसता ..... ! ?
तुमच्याही घरात
भांड्याला भांडे लागत असणारच ,
कुणी आपुलकीने
तर कुणी द्वेषाने वागणारच !
कुणी रुसणार ,
कुणी फुगणार ,
कुणी रागवणार ,
कुणी जागवणार ,
कुणी भरवणार ,
कुणी जिरवणार ,
मन मारून तुम्ही --
सगळ्यांचच मन राखता !
आणि तरीही ,
मॅडम तुम्ही
फार छान दिसता ,
जितक्या छान दिसता --
त्यापेक्षाही छान
तुम्ही हसता....!?
सासऱ्याची एकादशी
सासूचा प्रदोष ,
नवरा म्हणतो कर --
त्याचा काय दोष ?
दीर म्हणतो गरम वाढा ,
नणंद म्हणते उष्टी काढा ,
आजेसासूची गोळीची वेळ ,
मुलं म्हणती आमच्याशी खेळ
नवऱ्याचाही असतो थाट ,
नखरे त्याचे सतराशे साठ .
आल्या गेल्याचही तुम्ही
किती बेवार बघता ,
आणि तरीही ,
मॅडम तुम्ही
किती छान दिसता ,
जितक्या छान दिसता --
त्यापेक्षाही छान
तुम्ही हसता...! ?
तुम्हालाही मन आहे
कोण जाणतं ?
तुम्हालाही भावना आहे
कोण जाणतं ?
तुम्हीही माणूस आहात
कोण मानतं ?
त्यांना तुमचं काम हवं ,
कमावून आणलेलं दाम हवं ,
तुमची माया हवी ,
तुमची अख्खी काया हवी ,
विनातक्रार तुम्ही सारं
कसं काय सोसता ?
पण जाऊद्या ,
मॅडम तुम्ही फार
छान दिसता ,
जितक्या छान दिसता --
त्यापेक्षाही
छान तुम्ही हसता..... ! ?
??? ??
ग्रुपमधल्या सर्व
छान छानमॅडम्स साठी!
??????
#🎭Whatsapp status