श्री तुळजाभवानी मातेचा सिमोल्लंघन सोहळा.
तुळजाभवानी मातेचा सीमोल्लं मोक्षा 2025 विजयादशमी दसरा 2 ऑक्टोंबर च्या पहाटे श्री तुळजाभवानी मातेचा सिमोल्लंघन सोहळा आई राजा उदो उदो च्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला.
त्यापूर्वी पहाटे श्री तुळजाभवानी मातेचे पंचामृत अभिषेक होऊन देवीस 108 साड्या परिधान करण्यात आल्या .
नगर व भिंगार येथून आलेल्या पलंग पालखीची शहरातून सवाद्य निघालेली मिरवणूक ही तुळजाभवानी मंदिरात पोहचल्यानंतर मातेचा सीमोल्लंघन सोहळा थाटामाटात पार पडला.
प्रथेप्रमाणे पारंपारिक पध्दतीने आई राजा उदो उदोचा जयघोष आणि पारंपरिक वाद्य संबळाच्या साथीने सर्व विधी करण्यात आले,तुळजाभवानी देवीजिंची मुख्य मूर्ती ही चल मूर्ती असल्याने ती मूर्ती मंदिराच्या आवारात आणून भिंगार येथून आलेल्या पालखीमध्ये ठेवून मंदिरास प्रदक्षिणा मारली जाते. त्यानंतर नगर येथून आलेल्या लाकडी पलंगावर आई भवानी श्रम निद्रेस जातात. महिषासुर सोबत झालेल्या युद्धामुळे थकलेल्या असल्याने जगदंबा देवी 5 दिवसीय श्रम निद्रेस जातात अशी आख्यायिका आहे .
पौर्णिमा मंगळवार 7 ऑक्टोबर 2025 च्या पहाटे श्री तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापणा होईल. 🚩🙏🏻🚩
#आई तुळजाभवानी