नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला स्फूर्ती दिली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे ध्येय समोर ठेवून अविश्रांत परिश्रम घेतले. उत्तम संघटक, धाडसी नेतृत्व, महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! #नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती💐
*थोर समाजसुधारक आणि विचारवंत महादेव गोविंद रानडे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!*
आधुनिक भारताच्या सामाजिक व वैचारिक परिवर्तनाचे अग्रदूत असलेल्या न्यायमूर्ती रानडे यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, सामाजिक समता आणि राष्ट्रनिर्मिती या विषयांवर आयुष्यभर निर्भीडपणे विचार मांडले.
रूढी-परंपरांच्या चौकटीपलीकडे जाऊन समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी त्यांनी कायम संघर्ष केला. जयंती निमित्त त्यांना शतशः नमन...
#थोर समाजसुधारक विचारवंत महादेव गोविंद रानडे जयंती💐
आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांती हा उत्सव जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकरसंक्रांत साजरा केला जातो. हा उत्सव वेगवेगळ्या नावाने भारतातील विविध प्रांतात साजरा केला जातो. संक्रांतीचा सण हा आरोग्याशी निगडीत आहे. चांगलेचुंगले, पौष्टिक खा, शारीरिक-मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवा. एकमेकांशी गोड बोला असा संदेश या सणातर्फे दिला जातो. भूतकाळातील कडू आठवणीना विसरून जाऊन त्यात तीळ आणि गुळ यांचा गोडवा भरायचा असतो.मकरसंक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा ! #मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा💐
*सबंध महाराष्ट्राचे प्रेरणास्थान, ज्ञानरूपी महासागर आणि संस्काररूपी वात्सल्याचा झरा, जगातील एकमेव अद्वितीय माता जिच्या संस्कारातून दोन तेजस्वी, ओजस्वी प्रजापतिपालक असे छत्रपती घडले, अशा राजमाता, राष्ट्रमाता, स्वराज्यसंकल्पिका आऊसाहेब जिजाऊ माँसाहेबांच्या ४२६ व्या जन्मोत्सवानिमित्त लक्ष लक्ष शिवशुभेच्छा..!! 🌹* #राजमाता जिजाऊ जयंती💐
भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज, ३ जानेवारी जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या १९५व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! #क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती💐
कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे थोर समाजसेवक, पद्मभूषण बाबा आमटे यांची आज जयंती. 'ज्वाला आणि फुले' आणि 'उज्ज्वल उद्यासाठी' असे काव्यसंग्रह रचून त्यांनी मराठी साहित्यात देखील मोलाची भर घातली. थोर समाजसेवक बाबा आमटे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #थोर समाजसेवक बाबा आमटे जयंती💐
आपल्या अमूल्य विचार,कुशल नेतृत्व आणि उत्कृष्ट राजकीय धोरणामुळे आपल्या देशात विकास आणि सुशासनाची सुरुवात करणारे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती.
भारतीय राजकारणात आपली अविस्मरणीय छाप सोडणारे भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. #अटल बिहारी वाजपेयी जयंती💐
खरा तो एकची धर्म.... जगाला प्रेम अर्पावे.....
अशी मायेची शिकवण देणारे पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी)यांची जयंती...
अध्यापण कार्य,समाजसेवा, स्वातंत्र्ययुध्द अशा बहुविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमहत्व म्हणजे 'साने गुरुजी' मातृभूमीच्या सेवेसाठी नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्यसमरात त्यानी स्वताला झोकून दिले आणि अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सुखासाठी झटत राहिले.समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी ,एकता निर्माण व्हावी,शेतकरी-कामकरी वर्गाचे दैन्य-दारिद्रय दूर व्हावे व सर्वत्र समाजवादाची स्थापना व्हावी या हेतूने ते सर्वत्र जनजागृती करत राहिले.लहान
मुले,स्त्रीया,तरुण,दीन-दलित याना स्वत्त्वाची जाणीव व्हावी व उत्तमोत्तम विचाराची देणगी मिळावी यासाठी अत्यंत संस्कारक्षम साहित्य त्यानी निर्माण केले.आज साने गुरुजीसारखे उदात्त व्यक्तिमत्त्व आपल्यामध्ये नसले तरीही त्याचा साहित्यरुपी अनमोल ठेवा आपल्याकडे आहे.
साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...! #साने गुरुजी जयंती💐
भारत हा शेतीप्रधान देश आहे. तसेच 'शेती' हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी शेती पिकवून संपूर्ण देशातील जनतेची भूक भागवतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा वाढदिवस (23 डिसेंबर) 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जातो. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंह यांनी भरीव कामगिरी केली आहे. चरण सिंग यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना केली. अटल बिहारी वाजापेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. #राष्ट्रीय शेतकरी दिवस
संत मालिकेतील पहिले संत ज्ञानेश्वर होत. संत मालिकेचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवांनी त्याचा भारतभर विस्तार केला. नाथांनी त्यावर इमारत बांधली व तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. उरलेले कार्य गाडगेबाबांनी सिध्दीस नेले. म्हणूनच संत गाडगेबाबा हे संत मालिकेतील ‘शिरोमणी‘ म्हणून ओळखले जातात. मागील संतानी जो मार्ग दाखविला, त्यावर चालण्याचे काम गाडगेबाबांनी केले, समाजात धर्माच्या नावाखाली होत असलेला अन्याय, अत्याचार, अनीती दूर करण्यासाठी ते जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झगडले. त्यांनी ५०-६० वर्षे महाराष्ट्राची निस्वार्थ बुध्दीने सेवा केली
संत शिरोमणी गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन !समाजातील प्रत्येकांचे आयुष्य दाही दिशांनी उजळून काढण्यासाठी आपलं आयुष्य वाहून घेणारे संत गाडगेबाबा महाराज यांच्या ६९ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन ! #श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी💐













