@5620844
@5620844

SANDY

[©®✒✍️अध्यक्ष - आखिल भारतीय युवा जर्नालिस्ट अॕसोशिएशन..✒✍]

तर आमचं लग्न म्हणजे तस लव करून मग लवकरच अरेँज च्या ट्रेक वर टाकलेलं 'लवरेंज मेरेज. सासर माहेर म्हणजे मराठवाड्याची दोन टोकं, एक पश्चिम महाराष्ट्राला अगदी खेटुन बसलेलं तर दुसरं अगदी विदर्भ सीमेला टेकलेलं ! ही दोन टोकं सांधता सांधता माझं डोकं ठिकाणावर राहील की नाही याचा विचार सुद्धा डोक्यात येऊ नये अस माझं डोकं ! लग्नाआधी हे समजलं होतं की यांची जॉईन फॅमिली आहे , पण फॅमिलीला एवढी जन जॉईन असतील असं वाटलंच नव्हतं!! आई वडील अन् भावंडं अशा छोट्या कुटूंबात वाढलेली मी जेंव्हा त्या फॅमिलीत वेढली गेले तेंव्हा त्या फॅमिलीच्या गोतावळ्यात माझी गत जाम , जामच झाली. माझ्या सासूबाई म्हणजे त्या एवढ्या मोठ्या कुटुंबातल्या सगळ्यांत प्रमुख, त्यांचा दराराच एवढा की ईतरांचं सोडा साधं शिक्षण पण कधी त्यांच्या वाटेला गेलं नव्हतं !!!!!! आईच्या रुबाबाविषयी अन् स्वभावाविषयी पतीदेवांनी आधीच कल्पना देवून स्वतःची बाजू सेफ करून घेतली होतीच. सासरी गेल्यावर मी त्यांना आई म्हणणार हे मी आधीच ठरवलं होतं , पण 'A' आई अन् 'O'आई मध्ये खुप फरक असतो हे तिथे गेल्यावर लगेचच लक्षात आलं !! तो सासरी माझा पहिलाच दिवस , हातभर हिरवा चुडा , भरजरी साड़ी अन् दागदागिने अन् वरून पुन्हा मेकअप अशा अवस्थेत डोक्यावरचा पदर खाली पडू न देण्याची कसरत!! माझं शिक्षणातील फेमिनिझमचं स्पेशलायझेशन आठवून पदर बंड करून मध्ये मध्ये डोक्यावरून खाली घसरायचा प्रयत्न करायचा पण सासूबाई दिसल्या की गुमान डोक्यावर जाऊन बसायचा ! सुनमुख पहायला येणाऱ्या बायकांसमोर मी मात्र मूक मुख घेऊन बसले होते.' सुन लय शिकलेली हाय , परध्यापक हाय' हे सांगताना तिचं शिक्षण ' येमे , यमफेल , बेड ,नीटशीट अन् आता पेचडी' (अर्थात M.A. M.Phil , B.Ed. NET , SET , Ph.D) सुरू हाय हे सांगायला त्या अजिबात वीसरायच्या नाहीत.(पीएचडी ची तेंव्हा डिग्रीच काय विचार पण डोक्यात नव्हता हे वेगळे ) पाहता पाहता साऱ्या गावातल्या पोरासोरांसहित माझ्या डिग्र्या तोंडपाठच नाही तर पार सपाट झाल्या. पाठराखीन म्हणुन माझी धाकटी बहीण सोबतीला , अन् गंमत म्हणजे तिचा स्वभाव प्रचंड विनोदी, मग काय पदर सावरत हसू आवरायचं म्हणजे माझी पूरी वाट !!! बायकांचं येणं , जाणं अन् पहाणं जरा कमी झाल्यावर एक मोकळा श्वास घेऊन मी बाजेवर बसले. स्वयंपाकघरात स्वयंपाकाची लगबग सुरू होती,धुरांन भरलेल्या त्या चुलीपुढं आता स्वयंपाकाला बसवतात की काय म्हणुन मनात धाकधुक होतीच अन् तितक्यात सासूबाईचा आवाज आला... " सुनीताssss व....हिंग.......!" मी बसल्या जागी अक्षरशः उडालेच ! आता मी कालच घरात पाऊल ठेवलंय अन् मला कसं माहिती असणार यांच्या घरात हिंग कुठं ठेवलं ते ? पण तरीही घाबरत घाबरत आता गेले...अन् धूरानं डोळे भरले म्हणुन तशीच मागे फिरले. आमच्या ह्यांच्या मामी समोर होत्या त्यांना सांगितलं सासूबाई हिंग मागतायेत , त्या आत गेल्या अन् परत सासूबाई चा आवाज.... "सुनीता......... हिंग........." आता यांना हिंग दिल्याशिवाय आपली सुटका नाही , मग काय घरात जाऊन धूरात हिंग शोधण्यापेक्षा दुकानातून आणण्याची शक्क्ल लढवली. शेजारीच खेळत असलेल्या एका पोराला हाताने खूण करून जवळ बोलावले अन् वीस रुपयांची नोट देतं म्हंटलं "जा दुकानातून हिंग......आन " पोरगं प्रचंड खुश झालं अन् उड्या मारतच दुकानात गेलं. माझ्या 'यमे , येमफेल , नीटशीट , पेचडी , बेड ' अशा डीग्र्याधारी डोक्यातून निघालेल्या या आयडीयाचं कौतुक करून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायला हात उचलत होते तोच ते पोरगं पळत आलं , बघते तर काय हातात पार्लेजी चे पुडे , खिशात खिसा भरुन चॉकलेट अन् तोंडातही चॉकलेटचा बोकना !! मला त्याचा प्रचंड राग आला पण पोरगं तर नवीन मामी वर जाम खुश दिसलं. आता काय करायच ? प्रश्न पडला पण 'येमफेल' झालेलं डोकं असं लगेचच कसं फेल होईल ? बहीण म्हणाली दुकान समोरच दिसतय आपणच जाऊन घेऊन येऊ , नवी नवरी त्यात प्राध्यापिका अन् वरून एवढ्या डिग्र्या !!! साधं हिंग आणायला स्वतः दुकानात जायचं ? मला काही पटेना.... पण कुणास ठावूक कदाचित ही नवीन नवरीची परीक्षा बीरीक्षा घ्यायची प्रथा असावी. डोक्यावरचा पदर सावरत मी बहिणीच्या सोबत दुकानाकडे निघाले तर सारेच आमच्याकड आश्चर्याने पहात होते. दुकानातला तरुण दुकानदार तर एकदम चमकून उठलाच. वीस रुपयांची नोट त्याच्यापुढं करत बहीण म्हणाली "हिंग...." दुकानदार अगदी लाजून आमच्या जवळ येऊन प्रश्नार्थक नजरेनं उभा राहिला. काय कळायचंच बंद झालं.... बहीण म्हणाली " अहो दादा.... हिंग हवाय " दोन पावलं मागं जात संकोचुन तो हसला अन् म्हणाला "नाही.." परत घरी आलो. माघापासून मी एवढी संकटात सापडलेय आणि मला इथं घेऊन येणारा माणुस कुठं गायब आहे काही कळायला मार्ग नव्हता. त्या दिवशी मला पहिल्यांदा शोध लागला की , जेंव्हा खुप राग येतो अन् रागवाव असं कुणी सापडत नाही तेंव्हा रागवन्यासाठी नवरा नावाचा प्राणी, समाजाने अगदी वाजत गाजत नाचत अन् वरून पोटभर जेवून खावून कायदेशिर पणे आपणास उपलब्ध करून दिलेला आहे!! हा विलक्षण शोध लागताच मी मघाच्याच त्या छोट्या पोराला पिटाळल अन् सांगितलं " जा तुझ्या मामाला बोलवून आन..." समोरच्या दारातून पाहिलं तर महाशय बाहेर पारावर मित्रांच्या घोळक्यात मस्त हसत बसलेले. पोराने त्यांना निरोप दिला असावा उत्तरादाखल काही वेळाने त्या घोळक्यातून प्रचंड मोठा हास्याचा आवज मात्र आला. बाहेर जाऊन इशारा करून बोलवाव तर तेही अवघड. आपल्या स्वतः च्या नवऱ्याला साधा कामा निमित्त इशारा करण्यास देखील घाबराव लागत असेल तर काय ? माझा फेमिनिस्ट मेंदू जरा कुरबुर् करायला लागला. सासूबाईचा तिसरा कॉल यायच्या आत हिंगाची काहीतरी जुळनी करून पहिलीच परीक्षा पास होणे माझ्यासाठी अगदी अटीतटीचे बनले होते. काय सांगावं सासूबाई रागवल्या तर ? शेवटी बहिणीने यांना बोलावलंच दुसरा पर्याय नव्हताच . " काय झालं ?" या घरात मी पाऊल ठेवल्या नंतर तब्बल सोळा तासांनी ते विचारत होते , काय झालं म्हणून ? राग तर आला पण पहिल्याच दिवशी रागाचं उद्घाटन नको म्हणून मग राग आवरत म्हणाले " आताच्या आता हिंग कुठं ठेवलाय ते शोधून द्या नसेल तर विकत आणुन द्या " "तुला कशाला हवाय हिंग ?" " मला नाही तुमच्या आईला हवाय , दोन वेळा मागितला आता तिसऱ्यादा मागण्या आधी पटकन आणुन द्या. नाहीतर म्हणतील सुन कामाची दिसत नाही. उगीच पहिल्याच दिवशी गैरसमज नको " माझं बोलणं संपण न यांच मोठ्यान हसणं दोन्ही सोबतच! बघता बघता यांची अक्खी जॉईन फॅमिली यांच्या हसन्यात जॉईन झाली ! माझं तर डोकं बंद पडायचीच वेळ आली होती. सासूबाई पदराला हात पुसत बाहेर आल्या अन् यांनी त्यांना काय सांगितलं काय माहिती , त्याही जोर जोरात हसायला लागल्या , शेवटी हे हसतच म्हणाले " अग आईनं तुला हिंग नव्हता मागितला......हिंगssssअसं म्हणाली होती ! हिंगssssss म्हणजे .... इकडं ये !!!!" मग माझ्या लक्षात आलं अन् माझ्याही चेहऱ्यावर मघाच पासून मुक्काम ठोकून बसलेली गंभीरता चुटकीसरशी पळून गेली . झालेल्या फजीतीन माझ्या ' येमे , यमफेल , बेड ,नीटशीट अन् पेचडी ' अशा साऱ्याच डीग्र्याची हसून हसून मूरकुंडी वळाली होती !!!! नव्या नवरीची ही फजीती दिवसभर हसायला साऱ्याना पुरली.संध्याकाळी जरा निवांत बसले तर आमच्या यांनी आसपास पहात हळुच माझ्याकड एक चोरटा कटाक्ष टाकत म्हंटल.... " सोनू.....हिंग....." मग खऱ्या अर्थानं समजला हिंगचा अर्थ अन् मी ही नकळत लाजून ...अस्सल सांगली स्टाईलन.....म्हंटल.... " जावा...... तिकडं......" अन् त्याच दिवशी अजुन एक शोध लागला...... डिग्री कितीही मोठी असो नवरीला लाजण्यासाठी मात्र कोणत्याच डिग्रीची गरज नसते......जावा तिकडं.......!!!!! 🙏✒✍sandy🖎 #✒✍सॕडीच्या लेखणीतुन...
#

✒✍सॕडीच्या लेखणीतुन...

✒✍सॕडीच्या लेखणीतुन... - ShareChat
178 जणांनी पाहिले
3 तासांपूर्वी
।। हर हर नर्मदे ।। *घरात मोठं कुणीतरी पाहिजे हो...!* उद्या ह्याच पायरीवर तुम्ही असणार आहात...! पूर्वी घरांत उंबरठे आणि मोठी माणसं असायची. त्यामुळे घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा...! कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा करण्याआधी घरातील जेष्ठ मंडळीचा सल्ला घेतला जायचा. त्यांच्या अनुभवाचे सर्व विचार करायचे. त्यामुळे घरातील देवघरा नंतर महत्वाचे स्थान म्हणजे घरातील वयस्करांचे होते...! आताची वास्तविकता पार वेगळी आहे. काळानुसार घरात गुळगुळीत फरश्या बसल्या आणि घरातील सदस्य घराच्या मर्यादा आपआपल्या सोयीने ठरवू लागले. स्वयंपाकघर काय अन् देवघर काय.. सगळीकडे घरभर चपला घालून फिरायला सुरुवात झाली...! मोठी माणसं नाहीशी होत आहेत त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली आहे. मर्यादा, धाक , शिस्त , संस्कृती इत्यादि प्रकारच्या या गोष्टी हल्ली व्हॉट्स ऍप वर सकाळी सकाळी वाचण्यापुरत्या राहिल्या आहेत...! पूर्वी ह्याच गोष्टी, चालीरीती घरातील मोठी माणसे सांगायची. म्हणून घरात मोठी वयस्कर माणसे पाहिजेत. संध्याकाळी दिवे लावणीला शुभंकरोति - रामरक्षा- आरतीचे स्वर कानावर पडायलाच पाहीजेत. रात्री घरी उशिरा आल्यानंतर काळजीपोटी प्रश्नोउत्तरे झालीच पाहिजेत...! रात्रीचं उरलेलं अन्न टाकून देण्याऐवजी त्याला फोडणी -तडका देऊन आणखी चविष्ट व चटपटीत बनवून सकाळच्या न्याहरीत वाढणारं कुणीतरी पाहिजे... मोजून-मापून खर्च कसा करायचा याचे धडे शिकवणारं... चुकलं तिथे रागवायला व कधीतरी तोंड भरून कौतुक करायला...! *घरात कुणीतरी मोठं पाहिजे हो...!* एकाच छताखाली सर्वांना एकत्र पद्धतीत बांधून ठेवणारं, टिव्ही बंद ठेवून सर्वांनी सोबत जेवण कां करावं यामागचं कारण उत्तमरित्या पटवून देणारं, घराबाहेर पडतांना देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारं, आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं, तर संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवाला पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणारं... *खरंच घरात कुणीतरी मोठ पाहिजेच...!* पिकलेले पांढरे केस असू देत की अंधुक झालेली नजर.. आशीर्वाद देताना थरथरणारे हाथ असू देत की सुरकुत्या पडलेलं शरीर.. लिंबू-मिरचीला मानणारे विचार असू देत की कावळ्याच्या शापाला घाबरणारे मन.. एक गोष्ट चार-चार वेळा सांगणारं बडबडं मुख असू दे की कमी ऐकू येणारे कान.. कसं कां असेना पण सांगसवर करणारं ... *घरात कुणीतरी मोठं पाहिजेच...!* ज्या झाडाला फळं-फुलं येत नाही त्या झाड़ाला आपण बिनकामी झाड म्हणतो. परंतु ते झाड़ फळ-फुलं जरी देत नसलं तरी निदान सावली तरी देतं.. त्या सावलीसारखीच घरातील मोठी-वयस्कर माणसं असतात...! त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो. त्यांचे अस्तित्व आपल्यासाठी खुप मोलाचे असते. घरातून बाहेर पडतांना डोकं ठेवून नमस्कार करण्यासाठी घरात ते अनुभवी पाय पाहिजेतंच...!🙏 ✒🙏✍sandy🖎 #✒✍सॕडीच्या लेखणीतुन...
#

✒✍सॕडीच्या लेखणीतुन...

✒✍सॕडीच्या लेखणीतुन... - पतीदेवी , बेळगांव परमपु - ShareChat
361 जणांनी पाहिले
10 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..