[13/10, 1:17 pm] Vaishali Thakur: मी निडर आहे...कारण मी आता स्वतःला इतरांच्या सावल्यांमध्ये शोधणं थांबवलंय.मी तीच आहे जी स्वतःच्या विचारांवर ठाम उभी राहते,जिला आता कुणाच्या मान्यतेची गरज नाही.हो, मी वेगळी आहे…गर्दीत मिसळणारी नाही,
तर स्वतःचा रंग टिकवण्याची हिंमत ठेवणारी आहे.आणि बहुतेक याच वेगळेपणातच माझी खरी ओळख दडली आहे....💯🌹🤝✍️✅
[13/10, 1:19 pm] Vaishali Thakur: मी सौंदर्याच्या मापदंडांत बसत नाही,
कारण मी बनावट नाही.माझ्या चेहऱ्यावर कुठलाच मुखवटा नाही,माझं हसू उधारीचं नाही,माझी शांतताही माझी स्वतःची आहे.मी तीच आहे जी मनापासून जाणवते,आणि तेवढंच बोलते जे खरं असतं.मी समाधानी आहे...कारण मी स्वतःला स्वीकारलंय माझ्या चुका,माझा कमकुवतपणा, माझ्या अपूर्णतेसकट.याच अपूर्णतेतच मला माझी पूर्णता सापडली आहे.मी ‘मी’ आहे…कुणाच्याही सावलीतली नाही,कुणाचं उधार रूप नाही.मी तीच आहे जी प्रत्येक पडझडीनंतर
पुन्हा एकदा उभी राहते सरळ, मजबूत आणि खरी. #👍लाईफ कोट्स #🙂Motivation #🙂सत्य वचन #💭माझे विचार #meri jindagi