@7933922
@7933922

किशोर डोईफोडे wsup 9867339184

लव गुरु

#

माझं गाव

खूप छान कविता वाचायला मिळाली… *भूतकाळात डोकावल्या शिवाय* *मजा काही मिळत नाही* *मागे वळून पाहिल्यावर* *हसावं का रडावं कळत नाही* *साऱ्याच गोष्टी मध्ये* *खूप खूप बदल झाले* *पहिल्या पेक्षा प्रत्येकाला* *नक्कीच बरे दिवस आले* *खरं वाटणार नाही पण* *एवढं सगळं बदललं* *निगरगट्ट माणूस सुद्धा* *मुळा सकट हादरलं* *शाळेतून घरी गेल्या गेल्या* *दप्तर कोनाड्यात जायचं* *दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना* *बाहेर काढल जायचं* *अहो दप्तर म्हणजे काय* *वायरची पिशवी असायची* *जुन्या फाटक्या पुस्तका सोबत* *फुटकी पाटी दिसायची* *अभ्यास कर म्हणून कुणी* *म्हणलंही नाही* *अन मार्क कमी पडले म्हणून* *हाणलंही नाही* *कोणताही ऋतू असो* *काळपट चहा असायचा*👌 *तडकलेल्या बशीवर* *कानतुटका कप दिसायचा* *बारा महिने अनवाणी पाय* *चप्पल म्हणजे श्रीमंती* *पायाला चटके बसायचे* *पण सगळ्या गावात हिंडायचे* *कुणाचं गुऱ्हाळ लागलं की* *चला रस प्यायला* *खळे दळे लागले की* *चालले शेतात झोपायला* *मरणाची गरिबी होती* *पण मजा मात्र खूप* *लग्ना कार्यात माणसं , नाती* *व्हायची एकरूप* *अमावस्येच्या दिवशी पोरं* *मारुतीच्या पारावर* *नारळाच्या टूकड्यासाठी* *एकमेकाच्या अंगावर* *ओ मामा द्या नं , ओ मामा द्या नं* *एकच गलका व्हायचा* *रेटा रेटी केल्यामुळं* *सदरा टरकून जायचा* *पाहुण्याला पाहुणचार म्हणून* *खिचडी भजे व्हायचे* *तेवढ्यातच सारयांचे* *डोळे भरून यायचे* *तेलच्या-गुळवणी आणि पापडांची* *काय मामलात होती* *तरीही त्या माणसां मधे* *माणुसकी होती* *रात्र रात्र गप्पा व्हायच्या* *डोळ्यात यायचं पाणी* *आडपडदा न ठेवता* *दुःखाची व्हायची गाणी* *कुठे गेला तो साधेपणा* *कुठे गेलं ते सुख ?* *खरं सांगा पहिल्या सारखी* *लागते का आता भूक ?* *इतकुसाक पेढ्याचा तुकडा* *मिडकू मिडकू खायचा* *कधी तरी कुणी तरी* *प्रसाद म्हणून द्यायचा* *सारं सारं संपून गेलं* *आता पैसा बोलत असतो* *माणूस मात्र भ्रमिष्टा सारखा* *खोटं खोटं डोलत असतो* *पेढ्याच्या बाॅक्स कडे* *ढुंकूनही कुणी पहात नाही* *एवढंच काय पहिल्या सारख्या* *मुंग्याही लागत नाही* *सुखाचं बोट कधी सुटलं* *आपल्या लक्षात आलं नाही* *श्रीमंतीत सुख मिळेल वाटलं* *तसं काही झालं नाहीे* *ते सुख आणि वैभव* *पुन्हा घरात येईल का ?* *चिरेबंदी वाड्या मधून* *हसण्याचा आवाज येईल का?😌😔😊* गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी 😔😔 *🌳🌳🌳 माझं गाव🌾🌾🌾*
7.2k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
💕कुणावर प्रेम कराव तर असं💕 एक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण त्यापेक्षाही सुंदर तिची आपल्या नवऱ्यावर प्रेम करण्याची पद्धत होती. . जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात असे तेव्हा तेव्हा ती रोज एक गुलाबाचे फुल आपल्या नवऱ्याला पाठवत असे, . आणि जाणवून देत असे की मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळच आहे. . ती दुसरीकडे असताना तिच्या रोज येणाऱ्या गुलाबाच्या फुलाची सवय तिच्या नवऱ्याला झाली होती. . पण, कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे सुंदर प्रेम देवाला ही आवडले असावे म्हणून की काय देवाने तिला आपल्याकडे बोलावून घेतले, . ती ज्या विमानात होती त्या विमानाचा अपघात झाला आणि बिचारी आपले प्राण गमावून बसली. . ही बातमी ऐकून तिचा नवरा एवढा रडला की तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके कोणी एवढे रडले नसेल, . पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते तर आता सुरु झाले होते, . तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते. . हे बघून तिचा नवरा आश्चर्य चकीत झाला व ह्या मागाचे कारण शोधण्यासाठी त्याने रोज फुल घेऊन येणाऱ्या मुलास विचारले . “तुला हे फुल कोण देत नक्की, माझी बायको मरून १५ दिवस झाले तरी तू रोज फुल आणून देत आहेस, . नक्की प्रकार काय आहे?” मुलगा म्हणतो, “साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूप प्रेम करते, . तिची विचारशक्ती खूप पुढची होती, म्हणून तिने आधीच विचार करून ठेवला होता की, . "जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल पण प्रेमाला कधी संपवायचे नाही" . आणि ह्या विचाराने तिने मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले आहेत जेणे करून आयुष्यभर ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल. . आणि तिचे नसणे सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव करून देईल.”
#

तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला - ShareChat
1.3k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..