@8060378
@8060378

komal

मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌

#

मैत्री😘

Rupali kalokhe
#मैत्री😘 खरेतर मैत्री म्हणजे खूप मोठे काव्य नाही किंवा कादंबरीही नाही..तर ही एक गोड commitment आहे कुठल्याही नात्याचे लेबल नसलेली. रक्ताची नाती तर जन्मतः च आपल्याला मिळतात पण त्याव्यतिरिक्त आपण जिथे रमतो ती म्हणजे आपली एक्सटेंडेड फॅमिली "मैत्री". बरं ही मैत्री अशी कुणाशीही होत नाही बरं का..त्यासाठी मनाचे सूर जुळावे लागतात... एकदा का ते जुळले की ही मैत्री आपल्या मनाच्या कप्प्यात हळुवारपणे जपली जाते. मैत्रीला कुठल्याही विशेषणाची गरज नसते गरीब श्रीमंत,जात पात,गुण रूप..या सगळ्यांवर मात करून जी बनते ती ही मैत्री.... मैत्रीला एक वय असतं आणि ती वयानुरूप परिपक्व होत जाते.बालपणी भातुकली मध्ये रमणारी मैत्री, नाक फुगऊन कट्टी फू घेणारी मैत्री, हळूच डब्ब्यातील घासातल घास मैत्रिणी साठी काढून ठेवते ते कळतही नाही....पुढे लाजरी बावरी मैत्री कॉलेज मध्ये हळूच मनातलं गुपीत शेअर करते ते सुद्धा अगदी सहज बरं का..! मनातली चिडचिड, राग, नकार किंवा अल्लडपणा तर कधीकधी नको तेवढा शहाणपणा हक्काने मांडणारी जागा म्हणजे ही extended family.कधी मैत्रिणीच्या लग्नात हळवी होऊन आपल्या मनाचा कप्पा कुणीतरी काढून नेतोय या भावनेने व्याकूळ होते ती मैत्री.त्यानंतर मैत्रिणींच्या घोळक्यात त्यांच्या मुलांची मावशी म्हणून मिरवते ती मज्जा औरच.... केवळ मज्जाच नाही बरं का.. मैत्रिणीचा फोन येऊन गेल्यावर तिच्या स्वरातील चढ उतारावरून तिचा मूड समजून घेते ती मैत्रीचं...कधी आई होऊन तर कधी बहीण होऊन पाठीशी उभी राहते ती पण मैत्रीचं बरं का...!! उतारवयात कातरवेळी मनाला सतत तेवत ठेऊन positive energy देते ही आपली extended family.जुने दिवस आठवले की आठवते ती मैत्री...चहाची पार्टी, कॉलेज समोरील समोसा वडापाव, छत्री असूनही पावसात भिजलेले ते क्षण, मैत्रिणीचा अाभ्यास झालं नाही म्हणून तिच्यासोबत आपणही शाळेला मारलेली दांडी पासून ते तिच्या मुलांच्या लग्नात नथं घालून वरमाय म्हणून मिरवलेले आपण असा हा प्रवास चालूच राहतो...... रुसवे फुगवे ही होतात बरं का या मैत्रीत पण ते क्षणिक असतात कारण त्यांना कुठल्याच नात्याच लेबल नसतं..! खरेतर फ्रेंडशिप डे मला भारी आवडतो, त्यानिमित्ताने का होईना दूर गेलेली मैत्री परत एकत्र येते... व्हॉट्स ऍप ग्रुप वर जुने फोटो शेअर केले जातात.. गेट टुगेदर चं प्लॅनिंग केलं जातं... थोडीफार का होईना आपापल्या विश्वात व्यस्त असलेली ही आपली extended family पुन्हा जवळ येऊ लागते. तर मैत्रिणींनो ही extended family शेवटपर्यंत जपा कारण आपल्या मनाच्या विसाव्याच हे हक्काचं ठिकाण आहे...! #मैत्री😘 #🌹🌹मैत्री 🌹🌹
253 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

🌹🌹मैत्री 🌹🌹

Rupali kalokhe
#🌹🌹मैत्री 🌹🌹 *मैत्री म्हणजे कुंडली न पाहता,* *ज्योतिषाला न विचारता,* *किती गुण जमतात याचा विचार न करता,* *साध्य असाध्य न बघता* *अजीवनअबाधित राहणारे अतुट बंधन होय*😍😍👭😍😍 #🌹🌹मैत्री 🌹🌹 #मैत्री😘
161 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

🙏प्रेरणादायक / सुविचार

181 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
#

👩🏻‍🎤Girls नौटंकी

270 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..