Rahul
ShareChat
click to see wallet page
@86490441
86490441
Rahul
@86490441
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#थोडं विचार करा #💓थोडं मनातलं 💓
थोडं विचार करा - पुरूष इतना आज़ाद ೯ की चाहकरशी नौकरी नहीं छोड़ सकता HR महिला इतनी बॅंदिश में है की नौकरी को आज़ादी समझने लगी। @calligraphybypoohl पुरूष इतना आज़ाद ೯ की चाहकरशी नौकरी नहीं छोड़ सकता HR महिला इतनी बॅंदिश में है की नौकरी को आज़ादी समझने लगी। @calligraphybypoohl - ShareChat
#जय गुरू देव दत्त #दत्त जयंती #दत्त जयंती
जय गुरू देव दत्त - ShareChat
00:54
#🤣फनी डायलॉग व्हिडीओज🎥 #😆हास्य व्हिडीओज🎥 #😊Feeling happy #🤘टाईमपास😝 #🤣मीम्स लव्हर😍
🤣फनी डायलॉग व्हिडीओज🎥 - ShareChat
01:54
*🙏🏻नेमकं जगावं कसं ? तर शाळेतल्या शिक्षकासारखं...!* *⚡तासन् तास उभं राहून शिकवायची लाज नाही आणि राष्ट्रपती, पंतप्रधान यांनाही मी घडवलय याचा माज नाही....!* *⚡अख्खा वर्ग मुलांनी भरलेला असतो; परंतु त्यातल एकही मूल आपलं नाही... आपण फक्त शिकण्यास प्रवृत्त करणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची...!* *⚡निकालासाठी एखाद्या वेळी दुसऱ्यांशी वाद होणारच.... परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं मानून दुसऱ्यांशी बोलत राहायचं....,!* *⚡"पुढे चला... खूप शिका...." असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस....* *⚡खचाखच भरलेल्या वर्गामधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच...* *पण कुणावर विशेष लोभ नाही...* *कोणावर राग तर मुळीच नाही...* *कुणाचा द्वेष नाही...* *कुणाचा तिरस्कार नाही...* *आपला संबंध फक्त शिकवण्यापुरता... !* *⚡कुणी मध्येच शाळा सोडून गेला तर त्याचे दुःख सोसायच...* *कुणी मध्येच शाळेत आला तर त्याचं कौतुक करायच...* *दोघांसाठी नेहमीच वर्गाच दार उघडायचं...* *येईल तो येऊ दे.... जाईल तो जाऊ दे...* *⚡दहावी-बारावीला पोहोचायच्या आधी त्याला पैलू पाडत राहायचे....* *प्रत्येक वर्गात थोडावेळ थांबायच ....* *आळोखे पिळोखे देत, आपलंच वर्ग आहे, असं समजून थोडावेळ रेंगाळायचं....* *पण त्या वर्गात भावनिक गुंतायच नाही....* *आपण इथे थांबता कामा नये, हे स्वतःशी बजावत, पुन्हा दुसऱ्या वर्गात पुढच्या "तासिकेला" जायचं....* *⚡"सिंगल" बेल मारली ,की शिकवण थांबावायचं... "डबल"बेल मारली की दुसर्‍या वर्गात निघायचं.... बास, इतके साधे नियम पाळायचे....* *आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही...!* *⚡दहावी - बारावीचा टप्पा म्हणजे शेवटचा स्टॉप आहे....सगळ्यांनी चांगले कौशल्य प्राप्त करून घ्यावे.... असं सर्वांना बजावत स्वतःच निरोप द्यायचा आणि परीक्षा संपल्या की "मुक्या मनानेच" इतर विद्यार्थ्यां सोबत अध्यापनात रमण्यासाठी निघून जायचं.... !* *⚡उद्या कोणत्या वर्गात जायचं ? कधी निघायचं ? कुठल्या मजल्यावर जायचं ? वर्ग कोणता असेल.... ? हे ठरवणारा वेगळाच असतो...* *⚡उद्या कोणत्या तासिकेचे निरीक्षण असेल याची माहिती नाही... निरीक्षक कोण असेल याचीही खात्री नाही.... सोबत विद्यार्थी कोण असतील याची शाश्वती नाही...* *💫शाश्वत एकच आहे... ते म्हणजे अध्यापन...!* *⚡आपण असू तरी, आणि आपण नसू तरीही... अध्यापन कोणाच ना कोणाच तरी सुरू राहणारच आहे.... निरंतर आणि चिरंतन...!* *⚡आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही... अधयापन मात्र सुरूच राहणार आहे.... निरंतर आणि निरंतर...!* 🙏🏻 *✒️ एक शिक्षक* #शिक्षक #शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
*जय जय राम कृष्ण हरि...!!* ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️ !! विचार पुष्प !! दहा चांगल्या लोकांना जवळ नाही केले तरी तुमचे कांही बिघडणार नाही...पण एका चुकीच्या माणसाला आयुष्यात जागा दिली तर तुमच्या आयुष्यात मोठा बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही.. कोणी प्रशंसा करो या कोणी निंदा तरी काही हरकत नाही कारण प्रशंसा केली तर प्रेरणा मिळते आणि निंदा केली तर सुधारण्याची संधी.,!! बुद्धीच्या जीवावर श्रीमंत होता येतं परंतु श्रीमंतीच्या जीवावर बुद्धिमान होता येत नाही... जलद गतीने मिळणारी यश हे अहंकार निर्माण करते तर उशिरा मिळणारी यश आपलं व्यक्तिमत्व तयार करते.!! हे जग जाने बनवले त्याला ते कसं चालवायचं हे चांगलं माहित आहे म्हणून जगातली सर्वात मोठी शक्ती म्हणजे *"विश्वास"* तो कधीच ढळू देऊ नका. वाट दाखवणार्याची कधीच वाट लावायची नसते नाहीतर स्वतःचीच वाट लागते वेळ आल्यावर..!! *जिंदगी को ठंड और घमंड से बचाकर रखना चाहिए, क्योंकि दोनो ही परिस्थितीने इंसान अकड जाता है.!!*. ज्या व्यक्तीला आपण केलेला अपराध साधी चूक सदा वाटत नाही त्या माणसाला आपण कधीच सुधारु शकत नाही, त्याला सुधारण्याच्या नादात तुम्हाला खूप त्रास होईल म्हणून त्याला त्याच्या कर्मावर सोडून द्यावे. जपायचा प्रयत्न त्यांचाच करावा ज्यांना खरंच आपली किंमत वाटते.. मनात समाधानाचा आकाश कंदील लावताना तर रोजच सुखाची दिवाळी साजरी होते. माणसांमध्ये फक्त दोन कारणामुळे बदल होतो... एक तर खूप शिकल्यामुळे किंवा खूप सहन केल्यामुळे.!! *सोच का प्रभाव मन पर होता है.. मन का प्रभाव तन पर होता है... तन मन दोनो का प्रभाव जीवन पर होता है.. इसलिये सदा अच्छा सोचे और खुश रहे.!!* *. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये एवढे प्रभावी बना की तुम्ही असला तरी किंवा नसला तरी परिस्थिती बदलली पाहिजे.!!* खरी संपत्ती दवाखान्यात गेल्यावरच कळते.. पैसा गाडी बंगला सर्व शून्य आहे... खरी संपत्ती तर आपलं शरीरच आहे. आपला आजचा दिवस आनंदात जावो. राम कृष्ण हरि 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 #शुभ सकाळ #शुभ सकाळ
बाळंतपणानंतर डिलिव्हरी रूममधून बाहेर येऊन तासभर झाला होता... आणि बाईसाहेब नुकत्याच शुद्धीवर आल्या होत्या! शरीरात अजिबात ताकद नव्हती... कूस बदलणं तर दूरच, थोडंसं हलणंसुद्धा जड जात होतं... मोठ्या कष्टाने उजवा हात हलवण्याचा प्रयत्न केला, काही सापडलं नाही... मग डावा हात हलवून पाहिला,तरी काहीच हाताला लागलं नाही... घाबरायला लागली. क्षणात विचार आला – "खाली तर नाही पडला?" देवा रे! थोडीशी ताकद एकवटून अंथरुणाखाली पाहिलं… तिथेही नव्हता… मग तर घशाला कोरड पडली..... पोटात भीतीनं कळ उठली… कपाळावर घामाच्या धारा वाहायला लागल्या. दूर उभ्या असलेल्या नर्सला इशाऱ्याने बोलवायचा प्रयत्न केला… ओठ हलले पण शब्दच निघाले नाहीत… नर्सने तिची घबराहट ओळखली, तिच्याही डोळ्यांत पाणी आलं… शेवटी तीही "आई"च होती, आईचं व्याकुळ मन ती कसं नाही ओळखणार? धावत जाऊन इन्क्युबेटर रूममधून नवजात बाळाला घेऊन आली आणि त्या माऊलीच्या हातात दिलं… आणि म्हणाली, “ समजतंय ग बाई मला … मन भरून पाहा तुझं लेकरू!” त्या बाईने सर्व ताकद एकवटली, कपाळ पुसलं आणि म्हणाली… *“अगं धन्यवाद हो… पण मी तर मोबाईल शोधत होते…* फेसबुकवर स्टेटस टाकायचंय – *‘आई झाले’!* *खरंच…* *या जगाचं काही खरं नाही आता…!!!* 🤦‍♀️ #😊Feeling happy #🤘टाईमपास😝 #🤣मीम्स लव्हर😍
*🌼 *देवपूजा का करावी?* – एक अध्यात्मिक संवाद माझ्या भाच्याशी चर्चा करीत असताना त्याने विचारले, *मामा, तुम्ही रोज देवपूजा का करता??”* त्याचा प्रश्न ऐकून मी काही क्षण शांत झालो व त्या क्षणी मला जाणवलं.... काही प्रश्न लहान असतात, पण त्यांची उत्तरं जीवन बदलतात. मी त्याला जवळ बसवलं आणि म्हणालो, “बाळा, मामा,रोज देवपूजा करतो कारण पूजा म्हणजे देवाला खुश ठेवणं नाही, तर स्वतःला देवत्वात जागं करणं आहे.” तो म्हणाला, “देव आपल्यात असतो का मामा?” मी हसून उत्तर दिलं, “हो, देव आपल्या आत आहे, पण आपण जगाच्या गडबडीत त्याला विसरतो. रोजची पूजा म्हणजे त्या विस्मरणावरचा उपाय आहे.” मी त्याला समजावलं “आपण जेव्हा दीप लावतो, तेव्हा तो केवळ देव्हाऱ्यातील प्रकाश नसतो, तो आपल्या मनातील अंधारावर विजय मिळवण्याचं प्रतीक असतो. धूप देतो म्हणजे आपले विचार शुद्ध होतात. घंटा वाजवतो म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर होते; पुष्प अर्पण करतो म्हणजे आपल्या भावनातील प्रेम आणि कृतज्ञता देवाला अर्पण करतो. ही सर्व क्रिया बाह्य नाही, तो अंतर्मुख प्रवास आहे.” मी पुढे सांगितलं, “पूजा म्हणजे देवाशी संवाद नव्हे, तो आत्म्याशी संवाद आहे. जेव्हा आपण देवासमोर बसतो, तेव्हा काही क्षण आपण जगाच्या गोंधळापासून दूर जातो. त्या शांततेतून आपण स्वतःला समजायला लागतो. पूजा म्हणजे ध्यानाची पहिली पायरी.” भाचा, मोठ्या लक्षपूर्वपणे ऐकत होता. मग त्याने विचारले, “मामा, रोज पूजा केल्याने देव काही देतो का?” मी म्हणालो, “देव देतो पण तो वस्तू देत नाही तो शांती, धैर्य, संयम आणि समाधान देतो. तेच खरे प्रसाद आहेत.” मी त्याला सांगितलं की रोजची देवपूजा ही एक ऊर्जा शुद्धी प्रक्रिया आहे. पूजेच्या वेळी उच्चारले जाणारे मंत्र आणि ध्वनी कंपनं आपल्या शरीरात, मनात आणि घरात सात्त्विक स्पंदनं निर्माण करतात. त्यामुळे घरात प्रेम, शांतता आणि सहकार्य वाढतं. ज्या घरात रोज देवपूजा होते, तिथे देव स्वतः वास्तव्य करतो. मी म्हटलं, “मी रोज पूजा करतो कारण मला देव बाहेर पाहायचा नाही मला माझ्यातला देव जाणवावा म्हणून करतो.” त्याचे निरागस प्रश्न पाहून मला जाणवलं...आज मी त्याला उत्तर दिलं नाही, तर त्यानेच मला खरा अर्थ शिकवला. देवपूजा का करावी याचं उत्तर आता मला स्पष्ट झालं. “देवपूजा म्हणजे देवाला भेटणं नाही" तर स्वतःतील देवत्वाला जागं करणं.” *देवपूजा ही भक्ती नव्हे, ती आत्मज्ञानाची साधना आहे.* *रोजची देवपूजा अंतर्मनाचा* *प्रकाश जागवते.*🙏🙏🌹🌹 #माझ्या मनातील विचार 👍👍 #मनातील विचार