@9520280
@9520280

🔴⭕🔴⭕🔴

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

#

⚕️आरोग्य

🔴👉 'पित्याचे' धूम्रपान "बाळासाठी घातक". 25 March 2019. पिता धूम्रपान करीत असेल, तर ते आईच्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी धोकादायक ठरू शकते. पित्याच्या धूम्रपानामुळे आईचा धुराशी संपर्क येतो. त्यामुळे गर्भावस्थेतील बाळामध्ये जन्म जात हृदय दोष तयार होऊ शकतो. बाळाचा गर्भावस्थेतच मृत्यू होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. जगभरातील आकडेवारी लक्षात घेतली असता, बाळात जन्मजात हृदय दोष निर्माण होण्याचे प्रमाण एक हजारात आठ असे आहे. शल्य चिकित्सेतील आधुनिक शोधांमुळे उपचार आणि जीवनमान सुधारत असले तरी जन्मजात हृदय दोषाचे दुष्परिणाम जीवनभर सहन करावे लागतात. हे दुष्परिणाम लक्षात घेता, घरात पाळणा हलणार असेल, तर पित्याने आपली धूम्रपानाची सवय सोडून दिली पाहिजे, असे ‘युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेन्टिव्ह कार्डिओलॉजी’ या पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात. या बाबत, चीन मधील सेंट्रल - साऊथ विद्यापीठाचे जियाबी क्विन म्हणाले की, ‘‘गर्भवती महिलांचा पती जर धूम्रपान करीत असेल, तर त्याच्या या सवयीमुळे ही महिला मोठया प्रमाणावर धुराच्या संपर्कात येते. त्यातही ही महिला सुद्धा धूम्रपान करीत असेल, तर गर्भावस्थेतली बाळासाठी हे अधिकच धोकादायक असते.’’ ‘‘धूम्रपान हे व्यंग जनक असते. याचाच अर्थ ते गर्भाच्या विकासाच्या प्रक्रियेत दोष निर्माण करू शकते. प्रजननाच्या वयातील महिला - पुरुषांमधील धूम्रपानाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, बाळाला गर्भावस्थेत जन्मजात हृदय दोष जडण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे,’’ असे क्विन यांनी स्पष्ट केले. या बाबत झालेल्या विविध १२५ अभ्यासांचे विश्लेषण करून संशोधकांनी हे निष्कर्ष काढले आहेत. यात जन्म जात हृदय दोष असलेल्या एक लाख ३७ हजार ५७४ बाळांची आणि ८० लाख पालकांची माहिती तपासण्यात आली.
115 views
56 minutes ago
#

🗞26 मार्च '19 न्यूज

🔴👉 ‘डिलिव्हरी बॉय’लाही घ्यावा लागणार "एफडीए" कडूून परवाना.! 26 March 2019...मुंबई. सध्या खाद्य पदार्थ आॅनलाइन मागविण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. त्यामुळे आॅनलाइन खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये विलक्षण वाढ झाली आहे. या कंपन्या नव नव्या आॅफर्स काढत ग्राहकांना आकर्षित करण्याचा नेहमीच प्रयत्न करताना दिसतात. त्या तुलनेत खाद्य पदार्थ पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला मात्र अन्न पदार्थ हाताळणे आणि अन्न सुरक्षे बाबतचे प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे ग्राहका पर्यंत सुरक्षित आणि सदोष अन्न पोहोचेल याची खात्री नसते. या गोष्टींचा विचार करीत डिलिव्हरी बॉयला एफडीए कडून (अन्न व औषध सुरक्षा प्रशासन) परवाना घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. परवाना सक्ती करण्यात आल्यामुळे आॅनलाइन फूड विक्री कंपन्या मध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयची प्राथमिक माहिती आणि आरोग्याच्या तपशिलाची नोंद अन्न व औषध प्रशासनाकडे राहणार आहे. आॅनलाइन नोंदणी करताना १०० रुपयांचा अर्ज भरावा लागेल. अर्जात सगळी प्राथमिक माहिती भरून द्यावी लागते. परवान्याचा कालावधी वर्ष भरासाठी असेल. डिलिव्हरी बॉयने अन्नाची विक्री / डिलिव्हरी करताना परवाना स्वत:कडे बाळगणे अनिवार्य आहे. ⭕ जंतू संसर्ग होण्याचीही शक्यता.! अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी या बाबत सांगितले की, मोबाइल फूड वेंडर मार्फत डिलिव्हरी बॉय अन्न विक्री करत असताना कळत - नकळत अन्ना सोबत त्यांचा संपर्क येत असतो. त्यामुळे डिलिव्हरी बॉयने अन्न व औषध प्रशासनाकडे नाव नोंदणी करणे किंवा परवाना घेणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करून घेणे गरजेचे आहे. फूड कंपन्यांकडे प्राथमिक उपचार उपलब्ध नसतील तर एखाद्या डिलिव्हरी बॉयला आजार उद्भवल्यास तो अन्नातून पसरण्याची भीती असते. म्हणून दोन नियमांचे पालन आॅनलाइन फूड कंपन्यांनी करावे, अशी अपेक्षा आहे. काही आॅनलाइन फूड कंपन्या एफडीएचे नियम पाळताना दिसतात. परंतु काही कडून नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. त्यांनी लवकरच नाव नोंदणी आणि परवाना घ्यावा, अन्यथा त्यांच्यावर एफडीए कारवाईचा बडगा उगारेल.
180 views
59 minutes ago
#

# पंढरपुरातील रंग पंचमी.

🔴👉 'रंगात रंगला' श्रीरंग.! पंढरपुरात "रंग पंचमी जल्लोषात" साजरी. 25 Mar 2019...पंढरपूर. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व यमाई तलाव येथे रंग पंचमी जल्लोषात साजरी करण्यात आली. विठू माऊलीच्या अंगावर नैसर्गिक रंगांची उधळण करुन तरुणाईने विविध गाण्यांवर तालावर ठेका धरला. रंग पंचमी सणाचे औचित्य साधून यमाई तलाव येथे प्रति वर्षी प्रमाणे सुप्रभात मित्र मंडळाच्या वतीने रंगोत्सवाचे आयोजन केले जाते. शेकडो अबाल वृद्ध या रंगोत्सवात सहभागी होऊन कोरड्या नैसर्गिक रंगांची मुक्त उधळण करतात. श्री विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते श्रीकृष्णाचा मूर्तीचे पूजन करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार मंदिर समितीचे व्यवस्थापनक बालाजी पुडलवाड उपस्थित होते. या प्रसंगी वृक्ष संवर्धनासाठी सेवा भावी वृत्तीने काम केल्या बद्दल कॅप्टन विठ्ठल करंडे, दिपक थिटे, यमाई तलावावर नित्य नेमाने चालण्यास येऊन 55 किलो वजन कमी करणाऱ्या सुवर्णा भंडारे आणि एकशे दहा वेळा रक्तदान करणारे रविंद्र भिंगे यांचा श्री ढोले यांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला.
139 views
3 hours ago
#

# संत एकनाथ महाराज.

🔴👉 'भारुडातून' लोक शिक्षण करणारे "क्रांतिकारक संत". 26 Mar 2019. लोक शिक्षणासाठी नाथांनी स्वतः कृती करून दाखविली. आदर्श घालून दिला. आपण माणूस आहोत ही जाणीवही विसरलेल्या समाजाच्या एका मोठया घटकाला नाथांनी जवळ केले. नाथांनी महाराष्ट्राच्या लोक परंपरा लोक शिक्षणातून समृद्ध केल्या. किती तरी रूपकांच्या माध्यमांतून नाथांनी समाजाला जागे केले. म्हणूनच तळा गाळातल्या लोकांना संत एकनाथ आपले वाटले. संत एकनाथांनी अनेक भारुडांतून समाजाला जाग आणली. जाती - भेदांचे जोखड लोकांच्या माने वरून काढण्याचा प्रयत्न केला. ‘शब्दा हून आचार मोठा’ असलेले संत श्रेष्ठ एकनाथ महाराज मानव संस्कृतीचा लखलखता अलंकार आहेत. नाथांच्या चरित्रात आणि चारित्र्यात काय आहे यापेक्षा काय नाही.? हा प्रश्न पडतो. आदर्श गृहस्था श्रमी, प्रपंच - परमार्थ दोन्हीत श्रेष्ठ आणि श्रेष्ठ समाज सुधारक, पद दलितांचे उद्धारक, महान कवी, उत्तम टीकाकार, थोर तत्त्वज्ञ, श्रेष्ठ संत, अत्युच्च कोटीचे कीर्तनकार, सर्वोत्तम प्रवचनकार, आदर्श शिष्य, क्रती सद्गुरू, माय मराठीचे सुपुत्र, संस्कृतचे गाढे अभ्यासक, शांती दया तर प्रत्येकावर किती करावी.? हा प्रश्नच उभा राहतो. चांगला साधक, गृहस्थाश्रमी साधकांचा दीप स्तंभ, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समाजाचे सत्त्व राखणारा श्रेष्ठ सत्त्वस्थ.! संत एकनाथ क्रांतिकारक संत म्हणावे लागतील. कोणताही बोल घेवडेपणा न करता त्यांनी अंगिकारलेले अस्पृश्योद्धाराचे ‘व्रत’ थक्क करणारे आहे. नाथांनी ‘अद्वैत’ तत्त्वज्ञान व्यवहार्य केले. लोक परंपरा संस्कृतीला समृद्ध करतात हे नाथांना चांगले कळले होते. रूपके आणि भारुडांच्या माध्यमातून नाथांनी अवघड तत्त्व ज्ञान सोपे करून लोक भाषेतून जन सामान्या पर्यंत पोचविले. लोक परंपरेचे एक भव्य व्यासपीठ नाथांनी जन सामान्यांच्याच सहकार्याने निर्माण केले. अनेक लोकोत्तर गुणांचा संगम नाथा जवळ होता. सन्मार्ग दाखविणे खूप सोपे असते, पण स्वतः तो आचरणात आणणे खूप अवघड असते. ‘बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले।’ या तुकारामाच्या वचना सारखेच एकनाथ होते. संत एकनाथांच्या काळातील समाज हा अधःपतित समाज होता. अशा समाजात माणसे खूपच स्वार्थी असतात. अशा समाजात शब्दा प्रमाणे वागणारे नाथ खरंच अलौकिक होते. जनार्दन स्वामींच्या कृपेमुळे वारकरी संप्रदायाचा अभ्यास आणि दृष्टी नाथांना लाभलेली होती. समाजा मध्ये वावरताना या किंवा कोणत्याही परंपरेचा आग्रह असा नाथांनी धरला नव्हता. ‘अधिकार तैसा करू उपदेश।’ या न्यायांने नाथांनी समाजाला शिकविले. लोक शिक्षणासाठी त्यांनी अगदी सोपे मार्ग सांगितले. मरगळलेल्या, आक्रमणांनी घेरलेल्या समाजाला क्रांतीचा विचार पेलतोच असं नाही. लोक शिक्षणासाठी नाथांनी स्वतः कृती करून दाखविली. आदर्श घालून दिला. त्या काळा प्रमाणे दलितांची सावली सुद्धा कोणी स्वीकारत नव्हते तेव्हा नाथांनी त्यांना आलिंगन दिले. असं कार्य द्रष्टा महा पुरुष करू शकतो. आपण माणूस आहोत ही जाणीवही विसरलेल्या समाजाच्या एका मोठया घटकाला नाथांनी जवळ केले. त्यांचे हरवलेले व्यक्तिमत्त्व त्यांना दाखवून दिले. त्यांच्या बोली भाषेतूनच त्यांनी त्यांना शिकविले. त्या बहुजन समाजाशी संवाद केला. बहिष्कृत झालेल्या समाजाला त्यामुळे संजीवनच मिळाले. नाथांनी महाराष्ट्राच्या लोक परंपरा लोक शिक्षणातून समृद्ध केल्या. जोशी, वासुदेव, आंधळा, पांगळा, बहिरा, मुका, पिसा, खेळिया, सरोदा, दिवटा, डोंबारी, कैकाई, माळी, जंगम, भुत्या, वाघ्या संन्यासी, चोपदार, शंखीण, सौरी, कान्होबा, पाखरू, पिंगळा, वटवाघूळ, टिटवी, पोपट, सर्प, विंचू, बैल, गाय, एडका, कुत्रे, बाजार, व्यापार, कहाणी, नीती, पाळणा, चौघडा, रहाट, नवलाई, जागर, धावा, शिमगा, होळी, जोगवा, गारुडी, फुगडी, दरवेशी, वैदू अशा किती तरी रूपकांच्या माध्यमांतून नाथांनी समाजाला जागे केले. त्यांचं निरीक्षण या वरूनच कळून येतं. म्हणूनच तळा गाळातल्या लोकांना संत एकनाथ आपले वाटले. संत एकनाथांचा काळ यवनांच्या आक्रमणांनी भरलेला होता. त्यामुळे समाज स्थिर नव्हताच. अशा समाजाला जागृती आणण्याचा आणि कर्म कांडामध्ये न अडकता समाज कसा सुधारता येईल हाच नाथांनी विचार केला. लोक भाषेतील जेवढया परंपरा लोक रीती नुसार ‘बहु रूढ’ त्यांना भारूड म्हणतात. नाथांची भारुडे लोक शिक्षणासाठी, जन जागृतीसाठीच उपयोगी आहेत. भारुडाचा वाच्यार्थ गौण (महत्त्वाचा नाही), पण पारमार्थिक अर्थ खूप महत्त्वाचा आहे. नाथांचा ‘ज्योतिषी’ संत संगतीने जन्म - मरण फेरा चुकविण्याचा उपदेश करतो. ‘वासुदेव’ दुर्गुण टाकून सद्गुणांसंगे – ‘‘सुख - दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ / ज्ञानाचा ज्ञानाचा उद्बोध भक्ति प्रेमाचा कल्लोळ।’ अशी स्थित प्रज्ञता अंगी बाणविण्यास सांगतो. मोह भ्रांतीचा अंधार सोडून गुरु संगतीत राहण्याचे ‘आंधळा’ सांगतो. भ्रमात अडकल्याने कल्पनेच्या भ्रांतीची दैन्यावस्था सांगून असले पांगुळपण विवेकाने दूर करण्याचा मार्ग ‘पांगळा’ चालून दाखवितो. हरि कीर्तन न ऐकता बहिरा झालेला एका जनार्दनी कृपेने श्रवणास लागतो आणि ‘मुका’ बोलका तत्त्वज्ञ होतो. ‘खेळिया’ जाती पातीची बंधने तोडून ‘सर्वं खल्विदं ब्रह्म’चा साक्षात्कार घडवितो. ‘सरोदा’ ढोलके वाजवून सत्त्व भूमिकेतून परमार्थ हाती कसा येतो याचा उपदेश करतो. ज्ञानाच्या मशाली पेटवून भक्ती पेठा वसविण्याचे काम ‘दिवटा’ करतो. ‘कैकाई’ जिवा शिवाची एक मिठी कशी असते याचे मार्गदर्शन करते. ‘मान भाव’ शेंदरी - हेंदरी दैवते बाजूला सारून सात्त्विक दैवतांना पूजतो. लोकांकडून पुजवितो. हरिनामाच्या माळा गळयात घालून ‘जंगम’ आत्मलिंगाची पूजा बांधतो. अविनाशी ‘बायला’ अठरा मुलांना जन्म देतो म्हणजे अठरा पुराणांनाच जन्म देतो. एका जनार्दना प्रमाणे समरसता आली तर प्रपंच सुखाचा होण्याची भाषा ‘दादला’ करतो. बोधाची परडी आणि ज्ञानाची संबळ घेऊन ‘भुत्या’ नाचतो. ‘शंखीण - उंखीण’ म्हणजे माया - ममता. त्या घरात आल्या म्हणजे घरची ‘शांती’ बाईल घरा बाहेर जाते. नाथांचे ‘पाखरू’ म्हणजे परमात्मा कृष्ण माय बाप विन म्हणजे निर्गुण, निराकार परब्रह्मच आहे. ‘पिंगळा’ प्रबोध करतो. समाजातील भेदांचे प्रतीक म्हणजे ‘वट वाघूळ’ आहे. पंच महाभूतांच्या पिंजऱ्यात विषयाचा जीव ‘पोपट’ गुंतला आहे. माणसाला बेभान करणारा काम क्रोधाचा ‘विंचू’ सावधानतेचा इशारा देतो. नाथांची बहुगुणी ‘गाय’ पंढरीत भक्तांच्या कल्याणासाठी उभी आहे. मदन रूपी ‘एडका’ विवेक, वैराग्याची वेसण घालून आवरता येतो. ‘बाजार’ हे संसाराचे प्रतीक आहे. संत संगाशिवाय त्यातून सुटका नाही. विवेकाचा अंकुश नसलेली बुद्धी म्हणजे ‘थट्टा’ होय. भोवतालचे अवघे मायामय विश्व म्हणजे ‘स्वप्न’ होय. चित्त उन्मनी हरवतो तो ‘पाळणा’ आहे. असंख्य भक्तांचा उद्धार करणारा नाथांचा ‘चौघडा’ हरिनामाचा आहे. ज्ञानाग्नीत घालून जाळण्यासाठी देह चतुष्टयाची ‘होळी’ आहे. बोधाचे कुंकू कपाळी, भक्तीची काठी हाती अशी नाथांची ‘नवलाई’ आहे. ‘जागर’ हरिनामाचा आहे. ‘किल्ला’ हे नर देहाचे अप्रतिम रूपक होय. नाथांचा ‘जागल्या’ ईश्वर रूपी मालका जवळ जाऊन जन्म - मरणाची खेप चुकवितो. संत एकनाथांनी अशा अनेक भारुडांतून समाजाला जाग आणली. जाती - भेदांचे जोखड लोकांच्या माने वरून काढण्याचा प्रयत्न केला. त्या काळा प्रमाणे त्यांनी भारुडातून लोक शिक्षण दिले. त्यांचं अफाट कार्य पाहायला आपल्या जवळ ज्ञानाचे डोळे हवेत.
161 views
5 hours ago
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post
Share on other apps
Facebook
WhatsApp
Unfollow
Copy Link
Report
Block
I want to report because