मयताच्या टाळूवरील तेल खाणारी मिडिया 😡
आजच्या मीडियाकडे पाहिलं की प्रश्न पडतो — हे पत्रकार आहेत की टीआरपीचे दलाल? काल धर्मेंद्र यांच्या प्रकृतीवरून मीडियाने दाखवलेली बेफिकिरी पाहून अंगावर काटा येतो. माणूस अजून जिवंत असताना “धर्मेंद्र यांचे निधन” अशा मथळ्यांनी सगळ्या चॅनेल्सवर जणू उत्सवच सुरू झाला होता! कुठलाही अधिकृत स्रोत नाही, डॉक्टरांचा अहवाल नाही — पण तरीही स्पर्धा कोण आधी मृत्यूची बातमी झळकवणार याची!
हे पहिल्यांदाच नाही. कधी युद्धावर, कधी सेलिब्रिटीवर, कधी राजकारणावर — सत्यापेक्षा सनसनाटी महत्त्वाची अशी प्रवृत्ती मीडियाची झाली आहे. सिंदूर मिशनवेळी तर लाहोरपर्यंत भारतीय सैन्य पोहोचल्याची खोटी स्वप्नवत बातमीही पसरवली गेली. म्हणजेच सत्याचा गळा घोटून खोटी प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रकार सुरुच आहे.
मीडियाला “लोकशाहीचा चौथा स्तंभ” म्हणतात — पण आज तो स्तंभ नाही, लोकशाहीच्या शरीरात शिरलेली किड आहे.
जोपर्यंत ही किड लोकशाहीचा रस शोषत राहील, तोपर्यंत सत्य गप्प आणि खोटं जिवंत राहील. #😍Marathi Status King #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #🌐 देश- विदेश अपडेट्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🎭Whatsapp status