#@_shetkari..❤️🔝 #🎭Whatsapp status
तो पडतोय🌧️ पण बाप माझा जळतोय...!🥺
कपड्याच्या एका दुकानातला ड्रेस पाहून तिने बापाला थांबवलं "आबा ह्या वेळेस मी हेच कापड घेणार ह्यावेळेस मी नाही हं ऐकून घेणार दरवेळेस ची परिस्तिथी आबा आपली ह्यावेळी तरी मला हा कापड घेऊन देणार ना आबा?"... बाप पाहत होता तिच्याकड मनातच विचार करू लागला "ह्यावेळेस पिक जरा बरं दिसतय वाटल तर बनियान शिवून घालेल पण लेकराला कापड घेऊन देईल"... 😇 असं विचार करत असताना त्यानी फक्त होकारार्थी मान डोलावली रानात पीक मान वर काढून डोकावतच होत की एक भयंकर वादळ यावं आणी सर्व स्वप्नांची राखरांगोळी व्हावी तस पावसानं थैमान घातलं... अहो तो पाऊस तर कोसळून मोकळा झाला पण त्यामुळे माझ्या शेतकरी बापाची झालेली अवस्था 🥺 कुणाची गुरे वाहून गेली, आलेलं डोलदार पिकानी खाली मान टाकली, कोणाची घरे वाहून गेली तर अगदी कोणाची जिवाभावाची माणसंही ह्या पावसाने खाल्ली ह्या पावसामुळं जस शेतात पाणीच पाणी झालं तस माझ्या बळीराजाच्या साऱ्या स्वप्नांचं त्याच्या सगळ्या अपेक्षाच पाणी पाणी झालं आता कस घेऊन देणार तो चिमुकलीला कापड अन कस भरणार तुच्या शाळेचं पैकं? अहो तो आता खाणार काय? आणी जगणार कस? पिकाला मिळालेला कमी भाव, त्याच्यावर झालेलं सावकारच कर्ज, तर पैश्यामुळे आणी परिस्थितीमुळे त्याच्या अनेक स्वप्नांचा घोटलेला जीव हे काय कमी होत त्याला छळायला की निसर्गानेही त्याला छळण सोडल नाही... तुम्हाला फक्त खिडकीतून पडणारा पाऊस दिसतो ओ पण आम्हाला आमच्या स्वप्नांवर पडणारा जाळ दिसतो आम्हाला दिसतो आमचा बाप रडताना रोज🥺 आम्हाला दिसतो तो रोज हरताना आणी परिस्तिथीशी झुंजतांना तर कधी... तर कधी... झाडाला गळफास घेऊन जीवन संपवताना..... 🥺🥺
माझे शब्द कमी पडतील इतका त्याचा त्रास आहे माझ्या भावना कमी पडतील इतका त्याच्या स्वप्नांची झालेली राख आहे खरचं तो जे सहन करतोय त्याच्यापायी सार काही निशब्दच आहे...!🥹#माझा शेतकरी बाप...🥹
...✍️