#🚩शिवराय केवळ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हणून चालणार नाही. स्वप्नांमागे धावत असताना ती प्रत्यक्षात उतरविण्याची प्रेरणा स्वराज्य स्थापनेतून मिळते. नैतिकतेचे अधिष्ठान असलेले स्वराज्य शिवछत्रपतींनी निर्माण केले. त्या भूमीत आपला जन्म झाला, हे आपले भाग्य आहे. शिवछत्रपतींनी सांगितलेली तत्त्वे युवकांनी अंगीकारल्यास महाराज आजही आपल्यासोबत आहेत, याची प्रचिती येईल.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. मराठी माती, मातृभूमीचा ते अभिमान आहेत. आपली पूर्व जन्मीची पुण्याई म्हणून आपण शिवछत्रपती ज्या भूमीत वावरले त्यात जन्माला आलो. युवकांनी कायम भान ठेवावे; की शिवछत्रपतींबद्दल अभिमान जरूर असावा, परंतु अभिनिवेश कदापिही ठेवू नका. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा डोक्यावर घेऊन मिरविणे वेगळे, मात्र ती कायमस्वरूपी डोक्यात भिनवून घेणे ही बाब भिन्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जाज्वल्य आणि असीम चैतन्य. युवकांनी ही बाब प्राधान्याने लक्षात घेतली पाहिजे. शिवछत्रपतींचे कार्य केवळ काही प्रसंगपुरते मर्यादित नाही. म्हणजे रायरेश्वराची शपथ, अफजलखानाचा वध, शाइस्तेखानावरील छापा, पन्हाळ्याहून सुटका, आग्र्याहून सुटका, सुरतेची लूट या पुरतेच त्यांचे कार्य नव्हते. त्या पलीकडेही कार्यकर्तृत्व होते. शिवछत्रपती मर्त्य मानव म्हणून जन्माला आले असले, तरी कर्तृत्वाने देवत्वाला पोचता येते याचे अद्वितीय उदाहरण आहे. #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपति शिवाजी महाराज #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩