@abhijeet2552
@abhijeet2552

Abhi

Life has no limitations, except the ones you make.

#

🙏जय श्रीराम

------------------------------------------ *रामायणातील ह्या १२ गोष्टींपैकी* *किती तुम्हाला माहिती आहेत?* -------------------------------------------- रामायण हिंदू धर्मातील दोन सर्वात महत्वाच्या ग्रंथांपैकी एक आहे. भगवान रामांच्या जीवनावर आधारित असलेल्या या ग्रंथामध्ये लोकांच्या खूप भावना जोडल्या गेल्या आहेत. वाल्मिकीने लिहिलेल्या या ग्रंथात खूप शिकण्यासारखे आहे, पण आम्ही तुम्हाला रामायणाविषयी काही अशी माहिती आज सांगणार आहोत जी तुम्हाला कदाचित माहित नसतील. १. वाल्मिकींनी सर्वात पहिल्यांदा रामायण लिहिले होते नंतर तुलसीदासांनी याचे रुपांतर रामचरितमानस मध्ये केले. २. सीता जनक राजाची नाही तर, भूदेवीची मुलगी होती, ती पृथ्वीवर देवी लक्ष्मीचा अवतार होती. ३. जेव्हा रावण शंकर देवांचे दर्शन घेण्यासाठी कैलाश पर्वतावर गेला. तेव्हा त्याला नंदीने दरवाजावर थांबवले त्यावेळी रावणाने त्याची मस्करी केली त्यामुळे रागात येऊन नंदी ने त्याला शाप दिला की, त्याच्या राज्याचा नाश एक माकड करेल. हा शाप तेव्हा पूर्ण झाला जेव्हा वानरसेनेने रावणाच्या साम्राज्याचा अंत केला. ४. लक्ष्मण आपल्या भावाच्या आणि वहिनीच्या सुरक्षेमध्ये एवढे मग्न होते की ते १४ वर्षाच्या वनवासामध्ये एकदाही झोपले नाहीत, झोपेची देवी निद्राने सांगितले की त्यांच्या जागेवर कोणालातरी दुसऱ्याला झोपावे लागेल, म्हणून लक्ष्मणाची बायकी उर्मिला १४ वर्षापर्यंत झोपली होती. मेघनादला वरदान मिळाले होते की, ज्याने झोपेवर प्रभुत्व मिळवले असेल तोच त्याला हरवू शकतो म्हणून लक्ष्मण त्याला हरवू शकला. ५. राम आणि त्यांच्या भावांच्या जन्मापूर्वी राजा दशरथाला कौशल्या कडून शांता नावाची मुलगी झाली होती. कौशल्याची मोठी बहिण वर्षिनी आणि तिचा नवरा राजा रोमपदला कोणतेही अपत्य नव्हते, म्हणून दशरथाने त्यांना आपली मुलगी दान केली. ६. शंकरदेवांना प्रसन्न करण्यासाठी रावणाने स्वतःच आपले शीर कापले होते,पण त्याचे शीर सारखे उगवत होते. त्याप्रकारे त्याने १० वेळा आपले मुंडके कापले. हेच १० शीर त्याला शंकरदेवांनी परत केले होते. ७. भगवान राम विष्णू देवांचा अवतार होते. भरत त्यांचा सुदर्शन चक्र होता आणि शत्रुघ्न त्यांचा शंख आणि लक्ष्मणला त्यांचा शेषनाग मानले जायचे. ८. एकदा भगवान राम यमाला भेटायला गेले होते, तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला बाहेर पहारा द्यायला सांगितले. यमाने त्यांच्यासमोर एक अट ठेवली की, दरम्यान जो कोणी आत येण्याचा प्रयत्न करेल त्याला मरावे लागेल. तेवढ्यात तिथे ऋषी दुर्वास आले, त्यांना थांबवल्याने त्यांनी अयोध्याला शाप देण्याचे ठरवले. त्यामुळे लक्ष्मणाला नाईलाजाने आतमध्ये जावे लागले. त्यानंतर लक्ष्मणाने सरयूला जाऊन आपला प्राण त्याग केला. ९. राम राजा बनल्यानंतर,एकदा त्यांच्या दरबारात नारदमुनींनी हनुमानाला विश्वमित्राला सोडून सगळ्या ऋषींना नमस्कार करायला सांगितले, कारण विश्वामित्र हे पूर्वी राजा होते. त्यानंतर नारदमुनींनी जाऊन विश्वामित्राला भडकावले, त्यांनी रामाला हनुमानाला शिक्षा द्यायला सांगितले. राम आपल्या गुरूचा शब्द मोडू शकत नव्हते, म्हणून त्यांनी हनुमानाला बाण मारले आणि त्याचवेळी हनुमानाने रामाचा जप सुरु केला आणि एकही बाण त्याला लागला नाही, त्यानंतर रामाने ब्रम्हास्त्राचा वापर केला परंतु तरीही हनुमानाला काही झाले नाही. अखेर नारदमुनींनी हे युद्ध थांबवले. १०. संपत्तीचे देव कुबेर हे रावणाचे सावत्र भाऊ. रावणाने त्यांना हरवून लंका काबीज केली होती. ११. जेव्हा रामसेतू बनवला जात होता तेव्हा एक खार सुद्धा रामसेतू बनवण्यासाठी आपले योगदान देऊ इच्छीत होती, तिने जेव्हा तीन छोटे दगड उचलून आणले तेव्हा काही माकडे तिच्यावर हसली. त्यामुळे दुःखी होऊन ती रामाजवळ बसली, तेव्हा श्री रामांनी तिच्यावरून प्रेमाने हात फिरवला त्या दिवसापासून खारींच्या पाठीवर त्या रेषा आहेत. १२. गायत्री मंत्राची २४ अक्षरे आहेत आणि रामायण मध्ये २४००० श्लोक आहेत. प्रत्येक १००० व्या श्लोकामधील पहिले अक्षर एकत्र केले तर गायत्रीमंत्र बनतो. ---------------------------------------------- *संकलन :- सतीश अलोणी @* ----------------------------------------------- #🙏जय श्रीराम
3.6k जणांनी पाहिले
14 तासांपूर्वी
#

🙏जय श्रीराम

*प्रभु श्रीरामांची वंशावळ* ०० - ब्रह्मा ०१ - ब्रह्माचा पुत्र मरीची. ०२ - मरीची चा पुत्र कश्यप. ०३ - कश्यप चा पुत्र विवस्वान. ०४ - विवस्वान चा पुत्र वैवस्वत मनु. (याच्याच काळात जलप्रलय झाला) ०५ - वैवस्वत मनुचा तिसरा पुत्र इक्ष्वाकु, १० पैकी. (याने अयोध्याला राजधानी व इक्ष्वाकु कुळाची स्थापना केली) ०६ - इक्ष्वाकुचा पुत्र कुक्षी. ०७ - कुक्षीचा पुत्र विकुक्षी. ०८ - विकुक्षीचा पुत्र बाण. ०९ - बाणचा पुत्र अनरण्य. १० - अनरण्यचा पुत्र पृथु. ११ - पृथुचा पुत्र त्रिशंकु. १२ - त्रिशंकुचा पुत्र धुंधुमार. १३ - धुंधुमारचा पुत्र युवनाश्व. १४ - युवनाश्वचा पुत्र मान्धाता. १५ - मान्धाताचा पुत्र सुसंधी. १६ - सुसंधीचे २: ध्रुवसंधी व प्रसेनजित. १७ - ध्रुवसंधी चा पुत्र भरत. १८ - भरतचा पुत्र असित. १९ - असितचा पुत्र सगर. २० - सगरचा पुत्र असमंज. २१ - असमंजचा पुत्र अंशुमान. २२ - अंशुमानचा पुत्र दिलीप. २३ - दिलीपचा पुत्र भगीरथ. (यानेच गंगा पृथ्वीवर आणली) २४ - भागीरथचा पुत्र ककुत्स्थ. २५ - ककुत्स्थचा पुत्र रघु. (अत्यंत तेजस्वी, न्यायनिपुण, पृथ्वीवरचा पहिला ज्ञात चक्रवर्ती. म्हणूनच इक्ष्वाकू कुळ हे *रघुकुळ* म्हणुन प्रसिद्ध झाले) २६ - रघुचा पुत्र प्रवृद्ध. २७ - प्रवृद्धचा पुत्र शंखण. २८ - शंखणचा पुत्र सुदर्शन. २९ - सुदर्शनचा पुत्र अग्निवर्ण. ३० - अग्निवर्णचा पुत्र शीघ्रग. ३१ - शीघ्रगचा पुत्र मरु. (याच्या सत्तेने आताचे अरबस्तान # मारुधर, मरुस्थान किंवा मरूभूमी म्हणून ओळखले जायचे) ३२ - मरुचा पुत्र प्रशुश्रुक. ३३ - प्रशुश्रुकचा पुत्र अम्बरीष. (राजाने कायम संन्यस्त असावे याचा परिपाठ यांनीच घातला) ३४ - अम्बरीषचा पुत्र नहुष. (यांच्यापासुन कुरुवंश सुरु होतो) ३५ - नहुषचा पुत्र ययाति. ३६ - ययातिचा पुत्र नाभाग. ३७ - नाभागचा पुत्र अज. ३८ - अजचा पुत्र दशरथ. ३९ - दशरथचे चार पुत्र *राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न.* ब्रह्माच्या *४०व्या पीढ़ीत* श्रीराम जन्मले. *चाळीस पिढ्यात* *असं झालं नाही, अस केलं नाही,* 👆चाळीस पिढ्या हे वाक् प्रचार यातुन जन्माला आले. अतिषय दुर्मिळ माहीती शेअर करित आहे ती वाचा नक्की आवडेल . ज्याने ही माहीती मिळवली त्याला माझे शतश: प्रणाम.... 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 #🙏जय श्रीराम
486 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..