सुनबाई लिपस्टीक ठीक करत आरशात बघत म्हणाली...“आई, तुम्ही तुमचं जेवण करून घ्या हं… आम्हाला आज पार्टीला जायचंय! 😌💄”
माऊली शांतपणे म्हणाली...
“बाई, मला गॅसची चूल पेटवायला येत नाही गं… 😔”
तेवढ्यात मुलगा म्हणाला..
“आई, आज मंदिरात भंडारा आहे, तु तिथे जा ना. मग जेवण बनवायची गरजच नाही पडणार… 🙄”
आई शांतपणे चप्पल घालून मंदिराच्या दिशेने चालू लागली…
👵🚶♀️
हे सगळं 10 वर्षांचा रोहन ऐकत होता.
पार्टीला जाताना रोहन म्हणाला—
“पप्पा, मी मोठा झालो ना, तर मी माझं घर मंदिराजवळच बांधणार… 🙁”
बापाने विचारलं— “का रे?”
रोहन म्हणाला—
“कारण कधीतरी मला सुद्धा पार्टीला जावं लागलं तर तुम्ही पण मंदिरात भंडाऱ्याचं जेवण खायला जाऊ शकाल… आणि मला हे नकोये की तुम्हाला लांबच्या मंदिरात जावं लागावं… 😢💔”
हे ऐकून बापाच्या डोळ्यात पाणी आलं… दोघांनी ठरवलं..
“घरी जाऊन लगेच आईचे पाय धरून माफी मागायची.” ❤️
कार पार्क करून दोघे वर गेले.
पण… घरातून मोठ्या आवाजात म्युझिक, हशा, गप्पांचा आवाज येत होता! 🎶😂
दरवाज्याची बेल वाजवली.
आतून आवाज—
“शारदा, दार उघड! आज पिझ्झा लवकर आला वाटतं!” 🍕😄
दार उघडलं तर शारदा काकू उभ्या.
आत बघितलं तर…
आई जीन्स आणि पिवळा टॉप घालून मस्त फिरत होती! 👖💛
बिल्डिंगमधल्या तिच्याच वयोगटातील मंडळी जमा झाली होती.
हातात पेप्सीचे ग्लास 🥤
आणि स्पीकरवर “पानी पानी…” गाण्यावर सगळे थिरकत होते! 💃🕺🎶
आई थोडी दचकल्यासारखी झाली, पण लगेच हसून म्हणाली..
“काय रे, तुमची पार्टी कॅन्सल झाली का?
काही हरकत नाही, आमच्या पार्टीत जॉईन व्हा!
मी अजून तीन पिझ्झा ऑर्डर करते! 😄🍕🎉”
---
बोध- बिध काही नाही! 😎
आजचे ज्येष्ठ कमजोर नाहीत, लाचार नाहीत.
तुम्ही ज्या शाळेत शिकताय,
त्या शाळेचे ते कधीकाळी हेडमास्तर होते! 🎓🔥
तेही मस्त मजा करतात, हसतात, नाचतात…
आणि “लोक काय म्हणतील? मुलं काय म्हणतील?”
हे सगळं त्यांनी कधीच मागे टाकलंय! 😉
जीवन मस्त जगा…
आनंद साजरा करा…
आणि स्वतःला कधीच कमी लेखू नका! #🙏प्रेरणादायक / सुविचार