झरा पडला कोरडा,शब्द ओस पडले,
विठुराया!कसे आणू कवितेला,तेच नडले...
भक्तीचा पडला कोरडा दुष्काळ या मनी,
करा हो उपाय आता यावर धावून कुणी...
कशी वीणा झाली,कोरडी ठणठणीत,
प्रेम ओलावा गेला उडून हृदय झाले रखरखीत...
अशानी या जिंदगीचा होईल सगळा सत्यानाश,
विठूरायाचा जर झाला,असा तिच्यावर रोष...
नको नको विठूराया,क्रोध असा तु करु,
तुझ्या भक्ती वीण ही जीवन नाव कशी तारु?...
तुझी कृपा आटता तडफडून मरेल ही वीणा,
मरणही नाही करणार दयेस पात्र तुझ्या मर्जी विना... #😇भक्ती स्टेट्स #🙏ध्यानी मनी विठ्ठल #🙏जय हरी विठू माउली🙏 #🎭Whatsapp status #🌺विठुमाऊली