@ajitpawarspeaks
@ajitpawarspeaks

Ajit Pawar

Ajit Pawar, in the socio-political realm of Maharashtra is a dynamic and inspiring personality with excellent administrative strengths. In the current political scenario he is acknowledged as the most energetic and promising leader. He has a vast experience and formidable command on the varying layers of administration. He is very well accustomed with the trends and patterns of the working of the bureaucratic system. Ajit Pawar belongs to a farmer’s family; which makes him a sensitive and responsive political leader. He has a sound background of agriculture, due to which he finds it easy to relate himself with the problems and concerns of all farmers. Ajit Pawar has been actively associated with politics in Maharashtra for an impressively long period of time. His political career in its truest sense commenced in the year 1982; when he was elected to a sugar co-operative body. There was no looking back hence after. He was elected chairman of the Pune District Co-operative Bank in 1991 and remained on this prestigious position for the next 16 years. He held offices of various renowned institutes as a director/chairman. These institutes are Vidya Pratishthan, Baramati, Chhatrapati Shikshan Sanstha, Chhatrapati Co-op. sugar factory, Maharashtra Co-op. Milk Federation Mumbai. In 1991, he contested Lok Sabha election from the Baramati constituency. He later resigned from the post and was elected and successfully became a member of Maharashtra legislative Assembly from Baramati constituency. From June 1991 to November 1992 he successfully held the post of Minister of State for Soil Conservation, Power and Planning. In 1999, when Sharad Pawar announced Congress-NCP coalition to come into power, Ajit Pawar was promoted to a cabinet minister initially in the Irrigation department (from October 1999 to December 2003) in the Vilasrao Deshmukh’s government and later in the Rural Development Department (November 2004 to October 2009) in the Sushil kumar Shinde’s government. In 2004, when the NCP- Congress alliance came to power; he retained the portfolio in Vilasrao Deshmuk’s government and later in Ashok Chavan’s government. He is also the Guardian Minister of Pune District since 2004. The words that can effectively describe Mr Ajit Pawar’s persona are sincere, dedicated, transparent, strait forward individual with an impeccable understanding of the socio-political realities.

'कोरोना' संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगानं पुणे येथील विधान भवनच्या 'झुंबर हॉल'मध्ये माझ्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, तसंच या रुग्णालयांशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा, असे निर्देश दिले. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणं व दुसरीकडे सार्वजनिक व्यवहार सुरळीत करून अर्थचक्राला गती आणणं, हे आपल्यासमोरचं आव्हान आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करून हळूहळू अर्थचक्राला गती देणं आवश्यक आहे. याकामी नागरिकांनी शिस्त पाळणं आवश्यक आहे. बेशिस्तीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक कारवाया नियमितपणे करून शिस्त निर्माण करणं गरजेचं आहे. लॉकडाऊन संदर्भातील नियम, केंद्र व राज्य शासनाकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचना तसंच पुणे जिल्हा व शहरातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन सुरक्षिततेसाठी नियोजन करण्याचं अधिकाऱ्यांना सूचित केलं. लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रांतील उद्योग, व्यवसाय यांचं नुकसान झालं आहे. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्यात यावं, यासाठी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उद्योग, व्यवसाय सुरू करताना सुरक्षितताही सांभाळली पाहिजे, अशा सूचना केल्या. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून आणि निश्चित कार्यपद्धती ठरवून शाळा कशा व केव्हा सुरू करता येतील, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. शैक्षणिक नुकसान टळावं, यासाठी प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेण्यात येईल. ससून रुग्णालयासाठी मनुष्यबळ तसंच तातडीच्या साधनसामुग्रीच्या दृष्टीनं मंत्रालय स्तरावर असलेल्या प्रस्तावाना मंजुरी देण्यात येईल. राज्य शासनाकडून आवश्यक निधी तातडीनं देण्यात येईल, असं यंत्रणांना स्पष्ट केलं. यासोबतच स्त्राव तपासणी क्षमता, पॉझिटिव्ह रुग्ण संख्या स्थिती, वॉर्डनिहाय रुग्ण संख्या, कंन्टेनमेंट झोननिहाय स्थिती, संस्थात्मक क्वारंटाईन क्षमता, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, शाळा सुरू करण्यापूर्वी तसंच शाळा सुरू झाल्यानंतरची काळजी, उपचार सुविधा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेतला. #⏱राष्ट्रवादी
आज, पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये 'शिवराज्याभिषेक दिना'निमित्त युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन केलं. सर्वांना #शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा! #🚩शिवराज्याभिषेक सोहळा
चक्रीवादळामुळे बाधित पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यातल्या करंजविहीरे, शिवे, वहागाव, धामणे आदी गावांना भेट देऊन पडझड झालेली घरे, शाळा यांच्या नुकसानीची पाहणी केली. बाधित शेतकरी, नागरिक, गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना धीर दिला. #🔴निसर्ग चक्रीवादळ
मावळ तालुक्यातल्या भोयरे व पवळेवाडी येथे भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. रायगड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांत #CycloneNisarga मुळे मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून त्यासाठी पाहणी दौरा आयोजित केला आहे. योग्य ते निर्णय घेऊन लवकरच मदत केली जाईल. #🔴निसर्ग चक्रीवादळ
महाराष्ट्रातील तमाम जनतेला 'शिवराज्याभिषेक दिना'च्या हार्दिक शुभेच्छा! महाराजांनी रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या न्यायानं राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही ओळख त्यांनी निर्माण केली. राजनीती, युद्धनीती, अर्थकारण, मानवतावाद, पर्यावरण संवर्धन कुशलतेसह भविष्याचा वेध घेण्याचं द्रष्टेपण असलेले ते राजे होते. त्यांनी गाजवलेलं शौर्य, केलेला पराक्रम, घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श सदैव प्रेरणा देत राहील; मार्गदर्शन करीत राहील. त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जागवली. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना, अठरापगड जातींना एकत्र करून त्यांच्या मनात, स्वाभिमानाचं, स्वराज्याचं बीज रूजवलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आपलं वाटेल, जिथं सर्वांना न्याय मिळेल, असं स्वराज्य निर्माण केलं. शेतकऱ्यांना न्याय दिला. कष्टकऱ्यांना स्वाभिमान दिला. या विशेष दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, 'युगपुरुष' छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला स्मरून त्यांना त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा! महाराजांच्या विचारांना आदर्श मानून, त्यांनी दाखवलेल्या मार्गानं चालण्याचा निर्धार करूया! #🚩शिवराज्याभिषेक सोहळा
महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी ऊसतोडणी मजुरांसाठी जीवनभर संघर्ष करणारे माजी उपमुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! त्यांच्या रूपानं महाराष्ट्राला संघर्षशील लोकनेता, दिलदार विरोधी पक्षनेता लाभला. सत्तेत किंवा विरोधी पक्षात असताना त्यांनी नेहमी राज्याच्या हिताची भूमिका घेतली. आज, महाराष्ट्र 'कोरोना' संकटाशी लढत असताना त्यांची उणीव निश्चित भासत आहे. कष्टकरी, सामान्य जनतेसाठी त्यांनी दिलेलं योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. संघर्ष नायकाला विनम्र अभिवादन! #💐गोपीनाथ मुंडे पुण्यतिथी
आज, 'जागतिक तंबाखूविरोधी दिन'! यानिमित्तानं आपण सर्वांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचा ठाम निर्धार करूया! आपले नातेवाईक, मित्र परिवारानं सुद्धा तंबाखूपासून दूर राहण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प करुया! तंबाखूपासून दूर राहूया, आरोग्यदायी जीवन जगूया! Today, on World No Tobacco Day, let us resolve to stay away from tobacco & tobacco products. Also, encourage our friends & family to do the same & pledge to help spread awareness all around. Stay away from Tobacco, live a healthy life! #❌जागतिक तंबाखू विरोध दिवस