#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_डिसेंबर_१६६५ नेताजी पालकरांनी विजापूरकरांकडून ताथवडा उर्फ संतोषगड जिंकला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_डिसेंबर_१६७३ छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून बंकापूर जिंकून घेतले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_डिसेंबर_१६९९ औरंगजेब बादशाह अजिंक्यतारा घेण्यासाठी सरसावला. अजिंक्यताराचे किल्लेदार होते प्रयागजी प्रभू. ८ डिसेंबर १६९९ रोजी औरंगजेबाचे एकेक मातब्बर सरदार तरबियातखान, रहुल्लाखान, मुनिमखान, मीर आतिश, मन्सूरखान, खुदाबंदाखान आणि प्रत्यक्ष औरंगजेबाचा मुलगा शहजादे मुहम्मद आजम गडाला वेढा घालून बसले होते. खुद्द औरंगजेब करंज मुक्कामी राहून या सर्वावर देखरेख करत होता. गड घेण्यासाठी बादशाहचे प्रयत्न सुरु झाले. गडाच्या वाटेवर मोगल गस्त घालू लागले. मराठ्यांचे गडावर येणे जाणे कठीण होउन बसले. गडावर तोफांचा मारा सुरु झाला, औरंग्जेबास जास्तीत जास्त आठवडाभरात गड ताब्यात येइल, असे वाटत होते. पण महीने गेले तरी सुद्धा गडावरचे मराठे काही दाद देई नात. एकदा तर बादशाही सैन्याने गडावर सुलतानढावा सुद्धा केला पण मराठ्यांच्या तिखट प्रतिकारा समोर मोगली सैन्याला माघार घ्यावी लागली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_डिसेंबर_१७४० रेवदंडयाचा किल्ला मराठ्यांनी अखेर दिडवर्षाच्या लढाईनंतर पोर्तुगिझांकडून जिंकला. मानाजी आंग्रे आणि खंडोजी मानकर यांच्या नेतृत्वाखाली लढाई देत मराठी फौजांनी आणि आरमाराने विजय प्रस्थापित केला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ७ डिसेंबर इ.स.१६७२ बारदेशातील मिठावर जास्त जकात बसवण्यासाठी महाराजांनी नरहरी आनंदराव यांना लिहलेले पत्र - प्रति- नरहरी आनंदराव, सरसुभेदार, ता कुडाळ. ७ डिसेंबर १६७२ साहेबी प्रभावळी पासून कल्याण भिवंडी पावेतो जबर निरखाचा तह दिल्हा आहे. बरदेशात मीठ बंदरे आहेती. तेथून मीठ खरेदी करून उदमी नेत आहेत. हल्ली आपणाकडे मिठाचा पाड जबर झाला. हे गोष्टी ऐकोन उदमी सर्व बारदेशाकडे जातील. तरी तुम्ही घाटी जकाती जबर बैसवणे. संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडेल ऐसा जकातीचा तह देणे. 📜 ७ डिसेंबर इ.स.१७१५ मुसलमानांच्या तावडीतून आपले राज्य मोठ्या पराक्रमाने मिळवून, त्याची सीमा लाहोर आणि अमृतसरपर्यंत विस्तारण्यात बंदा बहादुरांना यश मिळाले होते. परंतु दुर्दैवाचा घालाच जणू बंदा बहादुरांवर कोसळला. मुघली सैन्याने बंदा बहादुरांना धारिवाल गावात, सन १७१५ च्या प्रारंभापासून जवळ जवळ १० महिने वेढून ठेवले होते. अन्नधान्य, पाणी इ. चा साठा जसा संपत आला तसे बंदा बहादूर आणि बरोबरीच्या ७९४ शीख सैनिकाना जगणे असह्य झाले. अखेर सर्वांनी ७ डिसेंबर १७१५ ला आत्मसमर्पण केले. त्या ७९४ शीख सैनिकांसह बंदा सिंह बहादुरांना फेब्रुवारी १७१६ च्या दरम्यान दिल्लीला आणण्यात आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ७ डिसेंबर इ.स.१७६० बळवंतराव मेहेंदळे पानिपतला ठार.#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩* 📜 ७ डिसेंबर इ.स.१६७२ बारदेशातील मिठावर जास्त जकात बसवण्यासाठी महाराजांनी नरहरी आनंदराव यांना लिहलेले पत्र - प्रति- नरहरी आनंदराव, सरसुभेदार, ता कुडाळ. ७ डिसेंबर १६७२ साहेबी प्रभावळी पासून कल्याण भिवंडी पावेतो जबर निरखाचा तह दिल्हा आहे. बरदेशात मीठ बंदरे आहेती. तेथून मीठ खरेदी करून उदमी नेत आहेत. हल्ली आपणाकडे मिठाचा पाड जबर झाला. हे गोष्टी ऐकोन उदमी सर्व बारदेशाकडे जातील. तरी तुम्ही घाटी जकाती जबर बैसवणे. संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडेल ऐसा जकातीचा तह देणे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ७ डिसेंबर इ.स.१७१५ मुसलमानांच्या तावडीतून आपले राज्य मोठ्या पराक्रमाने मिळवून, त्याची सीमा लाहोर आणि अमृतसरपर्यंत विस्तारण्यात बंदा बहादुरांना यश मिळाले होते. परंतु दुर्दैवाचा घालाच जणू बंदा बहादुरांवर कोसळला. मुघली सैन्याने बंदा बहादुरांना धारिवाल गावात, सन १७१५ च्या प्रारंभापासून जवळ जवळ १० महिने वेढून ठेवले होते. अन्नधान्य, पाणी इ. चा साठा जसा संपत आला तसे बंदा बहादूर आणि बरोबरीच्या ७९४ शीख सैनिकाना जगणे असह्य झाले. अखेर सर्वांनी ७ डिसेंबर १७१५ ला आत्मसमर्पण केले. त्या ७९४ शीख सैनिकांसह बंदा सिंह बहादुरांना फेब्रुवारी १#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ४ डिसेंबर इ.स.१६७९ शंभूराजे अखेर पन्हाळ्याला परतले औरंगजेबाने दिलेरखानाला गुप्तपणे निरोप पाठविला की , "शंभूराजेला कैद करुन दिल्लीला पाठवा !" अन् ही बातमी खुद्द संभाजीराजांना समजली ! संभाजीराजांनी ठरवलं इथून निसटायचं ... अखेर येसूबाईसाहेबांनी पुरुषाचा पोषाख केला आणि रात्रीच्या अंधारांतून शंभूराजे सहकुटुंब पळाले ( दि. २० नोव्हेँबर १६७९). त्यांनी तडख विजापूर गाठले . तिथून पुढे महाराजांकडून न्यायला आलेल्या मंडळींस येऊन सामील झाले ( दि. ३० नोव्हेंबर १६७९). तेथून तडक लांबच्या दौडी मारत दि. ४ डिसेंबर १६७९ ला शंभूराजे अखेर पन्हाळ्याला येऊन दाखल झाले . संभाजीराजे परत आलेले ऐकून महाराजांस अत्यंत आनंद झाला . ते युवराजांना भेटायला पन्हाळगडास निघाले . 📜 ४ डिसेंबर इ.स. १६८२ रणमस्तखानाने कल्याण काबीज केले. त्याच्याशी मुकाबला करण्याकरता छत्रपती संभाजी महाराजांनी रूपाजी भोसले आणि निळोपंत पेशवे यांना रवाना केले. त्यांच्याबरोबर १० हजार स्वार व १२ हजार पायदळ होते. दिनांक ४ डिसेंबर रोजी बहादूरखान व या सैन्यात लढाई झाली. कल्याण-भिवंडीपासून ५ मैलांवर असणाऱ्या मेहेंदळी गावात मराठयांच्या दोन हजार स्वारांनी मुघल ठाण्याची लुटालूट केली होती. त्यावेळी मुकर्रबखान मराठयांना तंबी देण्यासाठी धावला. मुकर्रबखान आणि मराठे यांच्याता मेहेंदळी गावाच्या अलीकडे ३० कोसांवर असलेल्या उरण#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 ⛳आजचे ऐतिहासिक शिवकालीन दिनविशेष⛳ 📜 ३ डिसेंबर इ.स. १६७९ सिद्धीस मूर्खात काढून मराठ्यांची दोन जहाज खांदेरीस पोहचले..!! १ डिसेंबर रोजी खांदेरीला मराठ्यांचा एक लहान मचवा काही रसद घेऊन गेला व सिद्दी आणि इंग्रज यांना तो अडवता आला नाही. पुढे ३ डिसेंबर रोजी एक चमत्कारिक घटना घडली. मराठ्यांची २ जहाजे बेटाकडे जाताना सिद्दयाला दिसली व त्याने ती अडवली असता ती थांबली. सिद्दयाच्या लोकांनी त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी आपण इंग्रज नौका दलातील असून त्यांनी आपल्या नाविक दलाच्या कॅप्टन आणि नौकेचा खलाशी यांचीही नावे त्वरित सांगितली आणि त्यांनी त्वरित जाऊ द्यावे, अशी मागणी केली. कारण आपण काही मराठी नौका दक्षिणेच्या बाजूने येताना पाहिल्या असून त्याची माहिती मिळवण्याकरिता जात असल्याचे सांगितले. सिद्दयाच्या त्या लोकांना खात्री पटली व त्यांनी मराठ्यांना जाऊ दिले व पुढे त्यांना दिसले की, ते खांदेरीच्या आखातात जाऊन तिथेच नांगरले. त्यावरून त्यांना समजले की, ते मराठेच होते व आपल्याला मूर्खात काढून ते पळून गेले. ही माहिती सिद्दयाच्या त्या जहाजावरील एका हशमाने इंग्रजांच्या सेवेतील एका मुसलमानाला दिली व त्यावरून ती इंग्रजांनी नमूद केली. ३ डिसेंबर रोजी सिद्दीच्या आरमाराचा मुख्य सिद्दी कासीम आणि केग्वीन यांची भेट झाली व कासीमने आता आपण बेटावर उतरून काय तो सोक्षमोक्ष लावूया, असे सांगितले असता केग्वीनने आपल्याला मुंबईहून आदेश येईल तसेच आपण वागू, असे सांगितले. यावेळी केग्वीनने सिद्दीच्या जहाजावर काही मराठी गुलाम मंडळी पाहिली व ही कुठून आली विचारले असता सिद्दीने सांगितले की, आपण मराठ्यांच्या मुलुखात शिरून जाळपोळ केली व काही गुलाम पकडून आणले. तसे केग्वीनने हे लिहून मुंबईला पाठवले.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २ डिसेंबर इ.स.१६६७ छत्रपती शिवाजी महाराज यांनी रामजी शेणवी यांसी पोर्तुगीज गव्हर्नकडे तहाचे पत्र घेऊन पाठवले..!! #शिवरायांचे बारदेशमध्ये आगमन व पोर्तुगीजांशी तह...!! शिवाजी महाराजाची स्वारी बारदेशवर होणार आहे याची बातमी पोर्तुगिजांना अगोदरच मिळाली होती. त्यामुळे पोर्तुगिजांनी बंडखोर देसायांना आग्वादच्या किल्ल्यात आश्रय दिला. तेव्हा बार्देशमध्ये कोलवाळ – थिवीचा सरळ लांब रेषेत तटबंदी असणारा किल्ला महाराजांच्या सैन्याने सहजपणे जिंकून घेतला. पोर्तुगिजांचेे सैन्य घाबरून लगेच आग्वाद किल्ल्याच्या आश्रयास पळून गेले. काही जुन्या गोव्यात आश्रयास जाऊन राहिले. कोणतेही पोर्तुगीज सैन्य शिवरायांचा सामना करण्यासाठी पुढे आले नाही. २२ नोव्हेंबर रोजी शिवाजीराजे बारदेशातून निघून डिचोलीस आले. त्यानंतर खासा विजरई बार्देश मध्ये आला. तोपर्यंत बार्देशमधील झालेला प्रकार पाहून शिवाजीराजांकडे आपला वकील रामजी शेणवी कोठारी यास डिचोली येथे तह करण्यासाठी पठविले. २ डिसेंबर १६६७ च्या दिवशी रामजी शेणवी हा शिवाजी महाराजांचे पत्र घेऊन गव्हर्नरकडे आला. पुढेे या तहाच्या वाटाघाटी ५ डिसेंबर पर्यंत चालल्या व ६ डिसेंबर रोजी तह झाला. बारदेशच्या मोहिमेच्या दरम्यान पुष्कळ ख्रिस्ती स्त्रिया आणि मुले पकडली गेली होती. त्यांना कोणताही त्रास न देता तसेच त्यांच्याकडून एक रूका (रुपया)ही न घेता शिवाजी महाराजांनी त्यांस सोडून दिले, असे पोर्तुगिजांनी शिवरायांविषयी आदरपूर्वक लिहून ठेवले आहे. ‘‘शिवाजी हा शत्रूंच्या बायकांस अत्यंत आदराने वागवी.’’ हे पोर्तुगिजांचा शिवाजी महाराजांचा चरित्रकार कॉस्मी-द-ग्वॉद त्यांच्या चरित्रात साक्ष देतो. शिवरायांच्या बारदेश स्वारीची धास्ती पोर्तुगिजांना चांगली बसली होती. पोर्तुगिजांना अशा प्रकारे आक्रमण करून धडा शिकविणारा हा पहिलाच भारतीय राजा होता.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 १ डिसेंबर इ.स.१६६१ छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन १ डिसेंबर १६६१ ला जव्हारचे पहिले विक्रमशहाराजे यांना भेटावयास आले होते. विक्रमशहा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेच दिला. ज्या ठिकाणी छत्रपतींना शिरपेच दिला. त्या ठिकाणाला 'शिरपामाळ' असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जव्हार भेटीच्या वार्तेने दिल्लीच्या सत्ताधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुरतेच्या या छाप्यानंतर दिल्लीच्या मोगलांमध्ये आणि जव्हारच्या संबंधांमध्ये वितुष्टता निर्माण झाली होती. 📜 १ डिसेंबर इ.स.१६६३ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा पाहुणचार खाल्लेला शाहिस्तेखान शिवछत्रपतींच्या भीतीने बंगालकडे रवाना...!! छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे येथील लाल महालात मुक्कामी असलेल्या शाहिस्तेखानावर योजकतेने हल्ला चढविला. पळून जाताना त्याची बोटे छाटली गेली. खानास त्यामुळे कायमची आठवण राहिली, असे रियासतकार सरदेसाई नमूद करतात. निवडक सैन्याच्या साहाय्याने मावळे लाल महालात घुसले आणि त्यांच्या नियोजनबद्ध कृतीने शाहिस्तेखानास जरब बसली. शाहिस्तेखानाचे सैन्य बळ आणि त्याची ताकत पाहता, हे आव्हान महाराजांनी स्वीकारले आणि त्यामध्ये अपूर्व विजय संपादन करण्याचा विक्रम केला. नियोजन, व्यवस्थापन आणि समन्वय यामुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली. एप्रिल १६६३ मधील लाल महालावरील हल्ल्याच्या वेळी शिवाजी महाराजांसोबत २०० निवडक मावळे होते. लग्नाच्या#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#📜इतिहास शिवरायांचा ⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 ३० नोव्हेंबर इ.स.१६५६ मुअज्जमने दिल्ली सोडली मुहम्मद आदिलशाहचा मृत्यू झाला त्याच दिवशी त्याचा मुलगा अली याला उत्तराधिकारी घोषित करुन बडी बेगम व वझीर मुहम्मद खानने गादीवर बसवला. त्यावेळी अली आदिलशाह फक्त आठरा वर्षांचा होता. आदिलशाही सरदारांमधे ह्या घटनेनंतर लगेच अंतर्गत कलह सुरु झाला. कर्नाटकातील छोट्या राजांनी ह्या संधीचा फायदा घेऊन हातून गेलेले काही प्रांत पुन्हा जिंकले. त्याचवेळी मुघलांनाही ह्यात त्यांची पोळी भाजून घ्यायची होती. ९ नोव्हेंबर १६५६ ला औरंगजेबला आदिलशाहच्या मृत्यूबद्दल सांगण्यात आले. त्याने हा निरोप शाहजहानला पाठविला व आदिलशाहीविरुद्ध कारवाईसाठी कुमक मागवली. २५ नोव्हेंबर १६५६ ला शाहजहानने त्याचा मुलगा मुअज्जम ह्याला वीस हजार सैन्यानिशी औरंगजेबकडे जायला सांगितले. ३० नोव्हेंबर १६५६ ला मुअज्जमने दिल्ली सोडली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३० नोव्हेंबर इ.स.१६५७ छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण बंदराजवळील दुर्गाडी कोटाचे बांधकाम सुरू केले...!! हा भाग निजामशाही (अहमदनगर) च्या अस्तानंतर आदिलशाही (विजापूर) च्या ताब्यात आला. इ.स. १६३६ नंतर आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या या प्रदेशाचा ताबा छत्रपती शिवाजी महाराजांनी २४ ऑक्टोबर इ. स. १६५७ मध्ये घेतला#🙏शिवदिनविशेष📜 #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 ⛳आजचे ऐतिहासिक शिवकालीन दिनविशेष⛳ 📜 २९ नोव्हेंबर इ.स.१६५९ ( मार्गशीर्ष वद्य दशमी, शके १५८१, संवत्सर विकारी, मंगळवार ) काल जिंकलेला किल्ले पन्हाळा बघायला शिवराय रात्रीच निघाले. कालच्या दिवशी स्वराज्यात दाखल झालेला किल्ले पन्हाळा पाहण्यासाठी, महाराज काही मावळ्यांसह पन्हाळगडावर हजर. प्रतापगडावर अफझलखान रुपी राक्षसाचा खात्मा करून राजांनी कोणतीही उसंत न घेता थेट वाई, कराड , सातारा आणि नंतर कोल्हापूर भाग स्वराज्यात दाखल करून घेतला त्यातच किल्ले पन्हाळगड स्वराज्यात दाखल करून राजे पन्हाळ्याला पोहोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २९ नोव्हेंबर इ.स.१६९४ व्हिसेरेई कौंट द व्हिलाव्हर्द हा पोर्तुगिजांकडील जुना मोगल वकिल शेख महंमद याला लिहीलेल्या पत्राची नोंद! "आपणाला माहिती आहेच की, छत्रपती शिवाजी महाराजांशी आमचे युद्ध झाले तेव्हा पासून त्यांचा आणि आमचा तह झालेला नाही. त्यांना आम्ही आमच्या बंदरात कधीच येऊ दिले नाही. इतकेच नव्हे, तर प्रत्येक ठिकाणी त्यांच्या आणि आमच्या चकमकी उडतात. मग त्या जमिनीवर असोत वा समुद्रावर असोत. गेल्या वर्षी त्यांनी आमच्या काही नौका आमच्या युद्ध नौका शिरल्या व त्यांनी तेथील अनेक नौका जाळून टाकल्या. पकडल्या म्हणून त्यांच्या १ बंदरात शिवाय त्यांचे १ खेडे आणि १ प्राचीन देऊळ त्यांनी जाळून टाक#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती



