@ankush_bhoir
@ankush_bhoir

अंकुश भोईर

मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌

*अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय लोक हिंद गौरव पुरस्कार येत्या 28 जुलैला शहापूर येथे पार पडणार आहे,या लोक हिंद पुरस्कारासाठी संपूर्ण राज्यातून आपल्या कामगिरीच्या फाइल्स मागवण्यात आल्या होत्या, त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात फाइल्स लोक हिंद कार्यालयात जमा झाल्या होत्या,या फाइल्सची छाननी करून त्यातून कुणाला पुरस्कार द्यायचे याची संपूर्ण जबाबदारी काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या लोक हिंद पुरस्कार निवड समितीची होती, त्याप्रमाणे आज लोक हिंद कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली या बैठकीत सर्व फाइल्सची पाहणी करून निवड समितीने कुणाला पुरस्कार मिळायला हवा याची चाचपणी केली व काही नावांवर शिक्कामोर्तब ही झाले,येत्या दोन दिवसांत निवड समितीने जाहीर केलेल्या या नावांची घोषणा संपादक महेश धानके अधिकृतरित्या जाहीर करणार आहेत,आज झालेल्या या निवड समितीच्या बैठकीला गोपाळ वेखंडे, काशिनाथ भोईर,चिंतामण वेखंडे,विजय पाटील, कमलाकर शेलार,सुनीता बोरसे, नवनाथ पवार हे विविध स्थरातील मान्यवर व संपादक महेश धानके,सहसंपादक जगदीश पताळे,उपसंपादक अंकुश भोईर आदी उपस्थित होते*
#

🗞ब्रेकिंग न्यूज

🗞ब्रेकिंग न्यूज - ShareChat
271 जणांनी पाहिले
9 दिवसांपूर्वी
*आदरणीय महेशजी धानके साहेब(भावोजी) आणि संगीता ताई धानके..............* *प्रथमतः तुम्हाला माझ्याकडून लग्नाच्या 18 व्या वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा* 🎂💐💐💐🎂 *संसार आला म्हणजे तिथे संघर्ष आलाच पण हाच संघर्ष तुमच्या एकमेकांवरील प्रेमाची जाणीव करून देत असतो.* *संसाराचा गाडा हकळताना धानके साहेब व संगीता ताई तुमच्या सांसारिक जीवनात अनेक अडचणी आल्या असतील पण त्या अडचणींवर मात कशी करायची आणि काही झालंच नाही या निर्मळ भावनेने तुम्ही 18 वर्ष अगदी आनंदात घालवली.* *समाजात फिरत असताना अनेक प्रकारच्या जीवनसाथीचे अनुभव मी पाहतो ,ऐकतो, पण मला भावलेलं कोणतं सांसारिक जोडपं(साथी) असतील तर ते म्हणजे आदरणीय महेशजी धानके साहेब व माझी बहिण संगीता ताई धानकेच होय.* *धानके साहेब व संगीता ताई यांच्याशी बातचीत, संबंध येत नाही असा क्वचितच एखादा दिवस उगवत असेल आणि त्याच अनुभवावरून त्यांच्यातील सामंजस्य-त्यांच्यातील निरागस प्रेमाचा अनुभव मला वेळोवेळी येत असतो.* *दोन जीव पण एक मन,घट्ट विणले गेलेले जाळे म्हणजे माझे साहेब व माझी ताई* *मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी आशा आदर्श लक्ष्मी-नारायणाच्या सानिध्यात राहतो.* *दिवस भरातील सुख-दुःखाचा कोणताही चांगला-वाईट, प्रसंग-घटना असो ह्या दोन साथी पैकी एक तरी मला ती गोष्ट सांगणारच.* *या दोन्ही ही व्यक्तीचा स्वभाव म्हणजे खूपच मितभाषी-प्रेमळ, एखाद्या लहान मुलासारखा गोंडस, शतदा प्रेम करावा असाच आहे, त्यांच्या सहवासात खूप गोष्टी नेहमीच शिकायला मिळतात.* *या जीवनसाथी विषयी बोलावे, लिहावे तेवढे कमीच* *खूप काही आहे सांगण्यासारखे, तुमच्या कडून शिकण्या सारखे,पाहिजे तेवढं लिहू शकतो पण जास्त न लिहता मी माझ्या आदरणीय साहेबांना व ताईला लग्नाच्या 18 व्या वाढदिवसाच्या माझ्या तोडक्या शब्दात मनःपूर्वक हार्दिक-हार्दिक शुभेच्छा देतो.* *उत्तरोत्तर तुमचा संसार सुखाचा होवो हीच साई बाबा चरणी प्रार्थना करतो.* 💐💐🌹💐💐🌹💐💐🌹💐💐 *तुमच्या सुखी संसाराच्या वाटचालीतील एक प्रमुख साक्षीदार* *अंकुश भोईर*
#

✨मंगळवार

✨मंगळवार - ShareChat
445 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..