आपल्याला लहानपणापासूनच 'मुक्या प्राण्यांवर प्रेम करा' ही शिकवणी दिली जाते. अनेक साधू-संतांनीही आपल्या वाणीतून भूतदयेविषयी जनजागृती केली आहे. 'सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. परंतु गेल्या काही दशकांत आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. फक्त आपल्याकडेच नाही; तर जगात अनेक ठिकाणी सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. वास्तविक माणूस आणि इतर प्राण्यांची मैत्री जुनीच आहे, परंतु हे संबध आता अनेक कारणांनी ताणले जाऊ लागले आहेत.
प्राण्यांचेही पर्यावरणासोबतच संरक्षण व्हावे यासाठी १९३१ मध्ये इटली देशातील फ्लाॅरेन्स शहरात एक पर्यावरण परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेत लोकांमध्ये प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी ४ ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक प्राणी दिवस' म्हणून पाळला जावा, असे ठरवण्यात आले.
जागतिक प्राणी दिनानिमित्त सर्व प्राणीप्रेमी व प्राणीमित्र संघटना यांना मनःपूर्वक शुभेच्छा... 🌹🙏
#जागतिक_प्राणी_दिवस #हार्दिक #शुभेच्छा
#WorldAnimalDay #Hardik #Shubhechha
#📢4 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अध्वर्यू स्वामी रामानंद तीर्थ
यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन... 💐🙏
स्वामी रामानंद तीर्थ यांनी आपल्या कणखर नेतृत्वाने मराठवाडा मुक्ती संग्रामाला दिशा दिली. मराठवाड्यासह हैदराबादच्याही मुक्ती संग्रामात त्यांनी मोठी कामगिरी केली. हैदराबाद संस्थानातील जनतेत स्वातंत्र्याची संकल्पना रुजविण्यात आणि ती प्रत्यक्षात आणण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा, भूदान चळवळ यातील त्यांचे योगदान व त्यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचा वारसा देशाला कायम प्रेरणा देत राहील.
#स्वामी_रामानंद_तीर्थ #जयंती #विनम्र #अभिवादन
#SwamiRamanandTirth #Jayanti #Vinamra #Abhiwadan
#📢3 ऑक्टोबर अपडेट्स🔴 ##जयंती /श्रध्दांजली /स्मृतीदिन/ पुण्यतिथी /बर्थडे #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
दहन दुर्गुणांचं...
स्मरण सरस्वतीचं...
सीमा ओलांडूनी आव्हानांच्या
गाठू शिखर यशाचं...
विजयादशमी दसरा निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा... 🌹🙏
#विजयादशमी #दसरा #हार्दिक #शुभेच्छा
#Vijayadashami #Dasara #dashehra #Hardik #Shubhechha
#🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #📢2 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
विजयादशमी, दसरा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... ☘️🌹🙏
हा दसरा तुम्हाला आनंदाचा, भरभराटीचा, वैभवाचा, आरोग्याचा आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... 🙏
#विजयादशमी #दसरा #हार्दिक #शुभेच्छा
#Vijayadashami #Dasara #dashehra #Hardik #Shubhechha
#🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #📢2 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
थोर साहित्यिक व आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏
गदिमा म्हणजे विलक्षण काव्यप्रतिभा लाभलेले अजोड व्यक्तिमत्त्व. आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक गदिमा यांनी गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत अभूतपूर्व कामगिरी केली आहे. साक्षात सरस्वतीच्या वरदहस्तामुळे मिळालेल्या असामान्य प्रतिभेच्या बळावर एकाहून एक सरस काव्यं आणि गीतं त्यांनी रचली.
त्यांच्या गीतरामायणाने अखिल महाराष्ट्राला भक्तिमय करून टाकले तर त्यांच्या इतर काव्य व साहित्य लेखनाने मराठी माणसाला समृद्ध बनवले.
आजही त्यांच्या असंख्य गाण्यांतून, साहित्यातून, चित्रपटातून, गीतरामायणातून गदिमा मराठी रसिकांच्या ह्रदयात विराजमान आहेत.
#ग_दि_माडगूळकर #गदिमाडगूळकर #गदिमा #जयंती #विनम्र #अभिवादन
#GDMadgulkar #Jayanti #Vinamra #Abhiwadan
#📢1 ऑक्टोबर अपडेट्स🔴 ##जयंती /श्रध्दांजली /स्मृतीदिन/ पुण्यतिथी /बर्थडे #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
सातासमुद्रा पार मालवणी भाषेची गोडी पोहचवणारे मच्छिंद्र कांबळी उर्फ तात्या सरपंच यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏
#मच्छिंद्र_कांबळी #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन
#MachindraKambali #Punyatithi #Smrutidin #Vinamra #Abhiwadan
#📢30 सप्टेंबर अपडेट्स🔴 ##जयंती /श्रध्दांजली /स्मृतीदिन/ पुण्यतिथी /बर्थडे #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
सुदढ आणि निरोगी हृदयासाठी हृदयाची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. हे महत्त्व सर्वांना कळावे व हृदयरोगाविषयी जनजागृतीसाठी यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन ❤ म्हणून साजरा केला जातो.
दररोजची धावपळ, चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अयोग्य व अनिश्चित आहार यामुळे अनेकांना आजकाल ह्रदयाच्या समस्या जाणवतात.
आज जागतिक हृदय दिनानिमित्ताने आपले हृदय सुदृढ ठेवण्यासाठी रोज व्यायाम करा, रोज किमान तीस मिनिटे चालणे, अथवा पळणे हा व्यायाम हृदयासाठी महत्त्वाचा आहे. आहारात कडधान्ये व फळभाज्या खाणे उपयुक्त आहे आपले हृदय सांभाळा आयुष्य आनंदी घालवा.
जागतिक हृदय दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 🌹🙏
#जागतिक_हृदय_दिन #जागतिक_हृदय_दिवस #हार्दिक #शुभेच्छा
#WorldHeartDay #Hardik #Shubhechha
#❤️जागतिक हृदय दिन❤️ #📢29 सप्टेंबर अपडेट्स🔴 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
२९ सप्टेंबर, आंतरराष्ट्रीय अन्न नुकसान जागृती दिवस...
अन्न हे पूर्णब्रह्म आहे. अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी प्रयत्न करू आणि जागरूक होऊ... 🙏
#आंतरराष्ट्रीय_अन्न_नुकसान_जागृती_दिवस
#📢29 सप्टेंबर अपडेट्स🔴 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
आज २८ सप्टेंबर, जागतिक रेबीज दिन... 🐶🦊🐵
रेबीजची पहिली प्रभावी लस शोधणारे फ्रान्सचे प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा २८ सप्टेंबर हा स्मृतिदिन; त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ हाच दिवस दरवर्षी जागतिक रेबीज दिन म्हणून पाळला जातो.
जागतिक रेबीज दिन ही आंतरराष्ट्रीय जागरूकता मोहीम ग्लोबल अलायन्स फॉर रेबीज कंट्रोल या संस्थेने सुरु केली.
रेबीजने बाधित कुत्रा, मांजर, माकड आदी रेबीज पसरविण्यास कारणीभूत ठरतात. जागतिक रेबीज दिनाचा उद्देश मानव आणि प्राण्यांवर रेबीजच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता वाढविणे, धोकादायक रोग कसा रोखता येईल याविषयी माहिती आणि सल्ला प्रदान करणे आणि रेबीज नियंत्रणातील वाढीव प्रयत्नांसाठी उपाय, सल्ल्यांचे समर्थन करणे हे आहे.
जागतिक रेबीज दिनानिमित्ताने रेबीज नियंत्रणाबाबत जागरूक होऊ या...
#जागतिक_रेबीज_दिन #रेबीज #लुई_पाश्चर #स्मृतिदिन
#WorldRabiesDay #Rabies #RabiesAwareness #LuiPaschar #DeathAnniversary
#📢28 सप्टेंबर अपडेट्स🆕 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
जगभरात पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी व विचारांची देवाणघेवाण व्हावी या हेतूने २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये पर्यटन आणि त्याच्याबद्दल असणारे सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक आणि आर्थिक महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करणे हे या दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
सध्याच्या कोरोना संकटात पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. पर्यटन क्षेत्रावर आलेले हे मळभ दूर व्हावे आणि ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारून पर्यटन क्षेत्र पूर्ववत होवो, याच या दिनानिमित्ताने सदिच्छा... 🌹🙏
पर्यटनाची आवड असणाऱ्या सर्वांना जागतिक पर्यटन दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा... 🌹🙏
#जागतिक_पर्यटन_दिन #हार्दिक #शुभेच्छा
#WorldTourismDay #Hardik #Shubhechha
#📅जागतिक पर्यटन दिन🛩️ #📢27 सप्टेंबर अपडेट्स🔴 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट