@bharatiyaayurved
@bharatiyaayurved

🌿🌴भारतीय🌵 आयुर्वेद🌱🍀

।।ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।। -ऋग्वेद

घरच्या घरी मिळवा गोरी आणि तजेलदार त्वचा...  त्वचेचा रंग उजळवण्यासाठी जास्त मेहनत आणि पैसे खर्च करण्याची गरज नाही. काही साध्या आणि सोपे घरगुती उपाय करून तुम्ही मिळवू शकता गोरी त्वचा.... यासाठी, अगदी सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टींचा म्हणजेच बेकिंग सोडा, पिकलेली केळी, आंब्याच्या साली यांचा वापर तुम्ही करू शकता.  पाहा, काही साधे आणि सोप्पे उपाय...  ●बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घ्या. चेहरा स्वच्छ धुवून ती पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटे लावावी. फरक तुम्हाला दिसेल.  ●त्याप्रमाणे पिकलेली केळी थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यावी. ते मिश्रण चेहऱ्यावर लावून २०-२५ मिनिटे ठेवावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.  ●त्वचा उजळण्यासाठी गुलाब पाणी दुधात मिक्स करून लावावे.  ●अॅलोव्हेरा जेलचा म्हणजेच कोरफडीचा वापर केल्याने चेहरा गोरा, स्वच्छ आणि ओलसर राहील. किमान अर्धा तास जेल चेहऱ्यावर लावावे.  ●तसेच सूर्यफुलाच्या बीया रात्रभर भिजत ठेवून सकाळी हळद आणि केसर टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. ती पेस्ट २० मिनिटे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल. ●आंब्याच्या साली बारीक करून दुधात मिक्स करून पेस्ट तयार करावी. ती पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावावी. त्याने सूर्यप्रकाशामुळे काळी पडलेली त्वचा उजळेल आणि चेहरा साफ होईल. ●साखरेला लिंबाच्या रसात मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब करावं. त्याने चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल.  ●नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सूरकुत्या कमी होण्यास मदत होईल.  ●पपईचा एक तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. एक तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर ठेवावी. त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग नक्की उजळेल. #⚕️आरोग्य
#

⚕️आरोग्य

⚕️आरोग्य - ShareChat
371 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
मधुमेही रुग्णांनी साखरेऐवजी गुळाचा वापर करणे फायदेशीर  साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला!  भारतीय लोक शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते. साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते. हे कसे का घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊया... - साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला! - गंधक हा अत्यंत जड धातू असून एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही. - साखर ही कोलेस्टेरॉल वाढवते. कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. - साखरेमुळे शरीराचे वजन वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो. - साखर ही रक्तदाब वाढवते. - साखर ही मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे. - साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत. - साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तेवीस हानिकारक रसायने वापरली जातात. - मधुमेह होण्याचे साखर हे एक मुख्य कारण आहे. - साखरेमुळे पोटात जळजळ होते. - साखर ही शरीरातील ट्राय ग्लिसरॉइड वाढवते. - साखर हे पॅरालिसिसचा झटका अथवा लकवा होण्याचे एक मुख्य कारण आहे. - आपणास जितके शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर करणे सुरू करा. #⚕️आरोग्य
#

⚕️आरोग्य

⚕️आरोग्य - ShareChat
10.7k जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
डेंग्यूच्या उपचारामध्ये फायदेशीर असते बकरीचे दूध इम्यून सिस्टम सुधारण्याचे काम करते बकरीचे दूध ●एंटरटेन्मेंट डेस्क :  हेल्दी लाइफस्टाइलमध्ये दूध खूप महत्ववंगी भूमिका बजावते. कारण दूध कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम विटॅमिन डी चे एक प्रमुख स्रोत आहे. जास्तीत जास्त भारतीय लोक गाय किंवा म्हशीचे दूध पसंत करत आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात त्याचा उपयोगही करतात. पण कदाचितच कुणाला माही असेल की, बकरीचे दूधदेखील तब्येतीसाठी फायदेशीर असते. हे केवळ इम्यून सिस्टम आणि मेटाबॉलिझम वाढवण्याचेच काम करत नाही तर डेंग्यूच्या उपचारासाठीही हे प्रभावी असते. चला जाणून घेऊयात बकरीच्या दुधाचे फायदे... ●डेंग्यूसाठी खूप उपयुक्त असते बकरीचे दूध... पावसाळ्यात डेंग्यू खूप जास्त पसरतो. तसे डेंग्यूपासून वाचण्यासाठी प्रत्येकानेच सावध राहिले पाहिजे, पण तरीही कुणाला डेंग्यू झाला तर बकरीचे दूध त्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. डेंग्यूच्या तापीमध्ये ब्लड प्लेटलेट कमी होतात, अशामध्ये बकरीचे दूध एक सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. कारण बकरीच्या दुधामध्ये सेलेनियम असते जे शरीरात ब्लड प्लेटलेट काउंट वाढवते. ●इम्यून सिस्टम सुधारण्याचे काम करते बकरीचे दूध... शरीरातील इम्यून सिस्टम ठीक झाल्यावर आजार तुमच्यापासून खूप दूर राहतात. अशात तुम्हाला अशा आहाराचे सेवन करावे लागते जे तुमची इम्युनिटी वाढवण्यात तुमची मदत करते. बकरीचे दूध त्यांपैकीच एक आहे. ज्यामध्ये सेलेनियम नावाचा एक समृद्ध स्रोत असतो. जो इम्यून सिस्टीम किंवा रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मदत करते. ●मेटाबॉलिझम वाढवावे... जर तुमच्या शरीराचे मेटाबॉलिझम सुस्थितीत असेल तर तुम्ही उत्तम प्रकारे काम करू शकता. बकरीचे दूध अनेक प्रकारच्या पोषक तत्वांनी भरपूर असते. यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, फॉस्फरस आणि पोटॅशिअम असते. सोबतच हे दूध आयर्न आणि कॉपरच्या गुणांनीदेखील समृद्ध असते, जे तुमचे मेटाबॉलिझम सुधारण्यात मदत करते. ●हाडांना मजबूती मिळते... हाडे कमजोर होणे आजकाल एक मोठी समस्या बनली आहे, जी वृद्धपणापर्यंत खूप वाढते. त्यामुळे हाडे मजबूत ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्हालाही तुमची हाडे मजबूत ठेवायची असतील तर बकरीचे दूध यामध्ये तुमची मदत करू शकते. कॅल्शियमने भरपूर असल्यामुळे याचा कोणताही दुष्परिणाम नसतो. कॅल्शियमसोबतच बकरीचे दूध अमिनो अॅसिड ट्रिप्टोफेन यानेदेखील समृद्ध आहे, जे आपली हाडे आणि दातांना मजबूत बनवते. ●क्रूडयासाठी असते फायदेशीर... खराब जीवनशैलीमुळे हृदयाचे विकार असणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे खाणे पिणे योग्य असणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये बकरीच्या दुधाचे सेवन केले तर हृदयाच्या आजारांपासून दूर राहाल. कारण यामध्ये योग्य प्रमाणात फॅटी अॅसिड असते, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात. ●अँटी इंफ्लामेंटरी गुणांनी भरपूर असते बकरीचे दूध... बकरीचे दूध अँटी इंफ्लामेंटरी गुणांनी भरपूर असते, जे सूज कमी करण्यात मदत करते. जर तुम्ही बकरीचे दूध पिता. तर पोटातील सूज कमी करण्यात मदत होते. #⚕️आरोग्य
#

⚕️आरोग्य

⚕️आरोग्य - भारतीय आयुर्वेद - ShareChat
431 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
या पाच तेलांमध्ये शिजवलेल्या अन्नपदार्थांचे करा सेवन, राहाल निरोगी  जाणून घ्या कोणत्या तेलामध्ये शिजवलेल्या अन्न पदार्थांचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते आणि शरीराला पोषणही मिळते. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. हाय कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगासारख्या समस्यांचे एक कारण म्हणजे योग्य खाद्य तेलाचा वापर न करणेदेखील आहे. जाणून घेऊया कोणत्या तेलामध्ये शिजवलेल्या अन्न पदार्थांचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते आणि शरीराला पोषणही मिळते. 1. नारळाचे तेल यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. रक्तदाब आणि हृदयरोग्यांसाठी नारळाचे तेल अत्यंत उपयुक्त आहे. कारण यात पोटॅशियमचे अधिक प्रमाण असते. त्यामुळे हृदयाचे कार्य योग्य पद्धतीने चालते आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठीही पोटॅशियम उपयुक्त आहे. याशिवाय हे तेल कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यामध्येही मदत करते. त्यामुळे हृदयरोग होण्याचा धोकाही कमी राहतो. 2. ऑलिव्ह ऑइल यात असलेले फॅटी अॅसिडचे पुरेसे प्रमाण हृदयरोगाचे धोके कमी करते. सोबतच या तेलामध्ये अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी असते. यामुळे शरीरात कोलेस्टेरॉलचे संतुलन कायम राहते. सोबतच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकादेखील कमी होतो. यामध्ये अँटिऑक्सिडंटही मोठ्या प्रमाणात असल्याने याला आरोग्यवर्धक खाद्य तेल म्हटले जाते. 3. तिळाचे तेल काळ्या आणि पांढऱ्या तिळांपासून हे तेल काढले जाते. हे तेल मॅग्नेशियम, कॅल्शियम, प्रोटीन आणि फाॅस्फरसचा खूप चांगला स्रोत आहे. तिळाचे तेल आरोग्यासाठी खूप गुणकारी असते. याच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यामध्ये मदत होते. सोबतच कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राखण्यासाठीही याची मदत होते. त्यामुळे हृदयविकार असलेल्यांनी तिळाच्या तेलाचा वापर करावा, असा सल्ला नेहमीच दिला जातो. 4. बदामाचे तेल  बदामाच्या तेलाचा दररोज वापर केल्याने आपले शरीर फिट राहण्यास मदत मिळते. बदाम खाल्ल्याने मेंदू निरोगी राहतो. एका संशोधनानुसार बदामाच्या तेलाचा दररोज वापर करणे बुद्धी आणि धमण्यांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे पोटाचे विकार बरे होण्यासोबतच आतड्यांच्या कॅन्सरपासूनही बचाव होतो. बदामाच्या तेलाचे नियमित सेवन केल्याने कोलेस्टेरॉल कमी होते. 5. मोहरीचे तेल  मोहरी संशोधन तथा संवर्धन कन्सोर्शियम (एमआरपीसी) च्या मते, मोहरीचे तेल हृदयविकारांची जोखीम ७० टक्क्यांपर्यंत कमी करते आणि संतुलित आवश्यक फॅटी अॅसिड गुणोत्तराने जीवनाची गुणवत्ता वाढते. याचा वापर केल्याने रोगप्रतिकारक क्षमतादेखील वाढते. तसेच शरीर अनेक प्रकारच्या संसर्गांपासून दूर राहण्यास मदत मिळते.  #⚕️आरोग्य
#

⚕️आरोग्य

⚕️आरोग्य - भारतीय आयुर्वेद PHOTOGRID - ShareChat
10.9k जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
निरोगी शरीरासाठी लक्षात ठेवा पाणी पिण्याशी संबंधित ही चाणक्य नीती आचार्य चाणक्यांनी एका नीतीमध्ये सांगितले आहे की, चुकीच्या वेळी पाणी पिणे आरोग्यासाठी कशाप्रकारे नुकसानदायक ठरू शकते... पाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि शरीरात पाण्याच्या योग्य स्तरामुळे पाचन तंत्र व्यवस्थित राहण्यास मदत होते. पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु काही परिस्थितींमध्ये पाण्यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. जेवण करण्याच्या ठीक आगोदर पाणी प्यायल्यास पाचन शक्ती कमजोर होऊ शकते. आचार्य चाणक्यांनी एका नीतीमध्ये सांगितले आहे की, चुकीच्या वेळी पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. आचार्य चाणक्य सांगतात की... अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम्: भोजने चाऽमृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्:: - या श्लोकामध्ये आचार्यांनी सांगितले आहे, की जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. जेवण केल्यानंतर जोपर्यंत अन्न पचत नाही तोपर्यंत पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. - जर एखादा व्यक्ती जेवण केल्यानंतर लगेच जास्त पाणी पीत असेल तर त्याच्या पाचन तंत्राला अन्न पचवण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. अन्न योग्यरीत्या पचले नाही तर शरीराला पाहिजे तेवढी उर्जा प्राप्त होऊ शकणार नाही. - अपचनाच्या स्थितीमुळे पोटाचे आजार होण्याची शक्यता वाढते. जेवण केल्यानंतर लगेच भरपूर पाणी प्यायल्यास ते विषाप्रमाणे कार्य करते. आपण जेवणाच्या मध्ये थोडे-थोडे पाणी पिऊ शकतो. परंतु भरपूर पाणी पिणे नुकसानदायक ठरू शकते. #⚕️आरोग्य
#

⚕️आरोग्य

⚕️आरोग्य - ShareChat
11k जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..