#😱मॉलच्या आगीत 60 जणांचा होरपळून मृत्यू
Breaking News: इराकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अल-कुट शहरात एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागल्याने किमान 60 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 11 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहेत..
पूर्व इराकमधील अल-कुट शहरात एका हायपरमार्केटमध्ये लागलेल्या भीषण आग लागली आहे. या आगीत 60 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
आगीच्या मोठ्या ज्वाळा...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये एका पाच मजली इमारतीतून रात्रीभर आगीच्या मोठ्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत होत्या आणि अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे.
मॉलच्या मालकाविरुद्ध गुन्हा
रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, या आगीच्या घटनेच्या तपासाचा प्राथमिक अहवाल 48 तासांच्या आत जाहीर केला जाईल. संबंधित इमारत आणि मॉलच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गव्हर्नर अल-मियाही यांनी दिली आहे.
मॉलला आग लागली त्यावेळी लोक मोठ्या त्यांच्या कुटुंबासोबत शॉपिंग करत होते. काही जण कॅफेमध्ये जेवण करत होते. या घटनेमुळे मोठी आपत्ती कोसळली असल्याचे गव्हर्नर अल-मियाही यांनी सांगितले आहे.
अनेकांना वाचवण्यात यश
अल-कुट हे शहर बगदादपासून सुमारे 160 किलोमीटर दक्षिण-पूर्वेस आहे. अग्निशमन कर्मचाऱ्यांना अनेक नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे. अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. अनेक नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींची संख्या जास्त असल्यामुळे आरोग्य सेवेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. हॉस्पिटलमध्ये खाटा अपूर्ण पडत आहेत.