#😱पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू😭दार्जिलिंगमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. मिरिक परिसरातील दुडिया लोखंडी पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. हा पूल मिरिक आणि आसपासच्या परिसराला सिलिगुडी - कुर्सियांगला जोडण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळला. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. पूर, भूस्खलन आणि पूराच्या धोक्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडथळे येत आहेत
स्थानिक प्रशासनाने सांगितले की, पावसामुळे हा पूल अचानक कोसळला. मिरिकमध्ये झालेल्या या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सौरानीमधील ३ नागरिक, मिरिकमधील २ नागरिक आणि विष्णू गावातील एका नागरिकाचा समावेश आहे. स्थानिक प्रशासनाने बचावकार्य वेगाने केले. पण भूस्खलन आणि पूरामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
मुसळधार पावसामुळे दिलाराम गावात एक मोठं झाड कोसळलं आणि हुसैन खोलामध्ये भूस्खलन झाले. यामुळे दार्जिलिंगला जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. आता कुर्सियांग आणि दार्जिलिंगला पोहचण्यासाठी फक्त पंखाबाडी आणि एनएच ११० वरून जावे लागेल. तर कुर्सियांग ते दार्जिलिंगपर्यंत प्रवास करण्यासाठी डाउनहिल रोडचा वापर करावा लागेल. त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे.