#आजच्या घडामोडी
ताज्या बातम्या...
रविवार दि.१२ ऑक्टोबर२०२५.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
🔘इतिहासातील सर्वात मोठी थाप फडणवीसांनी मारली,
संभाजीनगरमधील हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल,
म्हणाले, राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिलं,
मला फक्त बाळासाहेब ब्रँड माहिती, इतर कोणताही ब्रँड माहिती नाही, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका,
म्हणाले, घराचा उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडताहेत.
🔘कबुतरामुळं महायुतीचं सरकार जाईल,
जैन साधू निलेश मुनींचा इशारा,
जन कल्याण पार्टीची स्थापना, कबुतर राहणार पक्षाचं चिन्ह, डॉक्टर मूर्ख,
कबूतर शांतता प्रिय प्राणी,
एक-दोन जण मेल्यानं काय होतं?
जैन मुनी कैवल्य रत्न यांचं वादग्रस्त वक्तव्य,
तुम्ही इतरांना ज्ञान देता तर मग तुमच्या मंदिराला लावलेल्या जाळ्या काढून टाका, मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांची जैन मुनींवर टीका.
🔘संग्राम जगतापांची मुस्लिमविरोधी भूमिका मान्य नाही,
कारणे दाखवा नोटीस पाठवणार;
वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा दम.
🔘कोणत्याही पक्षाचा असला तरी गुन्हेगारांना राजाश्रय देणाऱ्यांना मोडून काढा,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाशिक पोलीस आयुक्तांना निर्देश,
आगामी निवडणूक महायुतीतच लढवायची,
पण काही जण आमच्याशी छळ कपट करतात,
मंत्री संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य.
🔘पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट,
३५ हजार ४४० कोटींच्या दोन नवीन योजनांची घोषणा,
मोजणीचा अर्ज मिळाल्यानंतर ३० दिवसात मोजणी होणार,
राज्यात खासगी भूमापक येणार,
मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा.
🔘सुधीर मुनगंटीवारांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट,
ही भेट मंत्रीपदासाठी नसून राज्यातील प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी,
मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण,
राज ठाकरेही मविआच्या नेत्यांसोबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार;
खासदार संजय राऊतांची माहिती,
फडणवीसांसह शिंदेंनाही निमंत्रण.
🔘मी मदत केली म्हणूनच तुम्ही आमदार झालात,
मंत्री जयकुमार गोरेंचा शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांना टोला,
शहाजीबापूंचा गेम भाजपनेच केल्याची चर्चा,
बीडमध्ये यायचं असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच यावं,
छगन भुजबळांना मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंचा इशारा,
महाएल्गार सभेला विरोध.
🔘सलग पाचव्या दिवशी गो गॅसच्या नागपुरातील कार्यालयसह गोदामावर आयकर विभागाची छापेमारी;
कोट्यवधींचं घबाड सापडल्याची माहिती,
लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला,
नंतर एकाला मारहाण करत जबरी चोरी;
सोलापुरात मध्यरात्री दरोड्याचा थरार,
मिरजमध्ये हवालदाराच्या चहाच्या दुकानात छापल्या एक कोटींच्या नोटा,
आरोपींकडून १ कोटी ११ लाख रुपयांचा ऐवज जप्त.
🔘उद्योगपती अनिल अंबानींना मोठा धक्का,
रिलायन्स पॉवरच्या मुख्य वित्तीय अधिकारी अशोक कुमार पालला अटक,
ईडीची कारवाई,
चांदीच्या दरानं गाठला नवा विक्रम,
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बाजारपेठेत दर पावनेदोन लाखाच्या पुढे.
🔘वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताचा धमाका,
यशस्वीनंतर गिलनेही ठोकले शतक,
५१८ धावांवर डाव घोषीत,
वेस्ट इंडिजचा डाव गडगडला,
बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हासमुळे सेहवागच्या खासगी आयुष्यात वादळ?
पत्नीसोबतचा फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■