
Devendra Fadnavis
@devendrafadnavis
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, रामसेवक । कारसेवक |
🔸 महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. जनसेवा, नेतृत्व आणि समर्पणाने परिपूर्ण असलेले त्यांचे जीवन महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि समाजासाठी एक अमूल्य वारसा आहे. त्यांचे योगदान सदैव स्मरणीय राहील आणि त्यांच्या स्मृती आमच्या हृदयात कायम जिवंत राहतील.
ॐ शांति 🙏
#🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'भाजपा मुंबई’ बैठक!
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार अमीत साटम, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते.
🕖 संध्या. ६.४५ वा. | २७-१-२०२६ मुंबई.
#मुंबई #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
माजी मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे नुकतेच निधन झाले. आज मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देत राज पुरोहित यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
(📍मुंबई | 26-1-2026)
#महाराष्ट्र
समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक जीवन आणि सामान्य माणसाला प्रतिबिंबित करणारे ख्यातनाम व्यंगचित्रकार
पद्मविभूषण आर. के. लक्ष्मण यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन…!
#महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
जय हिंद! 🇮🇳
🇮🇳 प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थान, मुंबई येथे अभिमानाने राष्ट्रध्वजवंदन
#देवेंद्र फडणवीस #महाराष्ट्र 🕣 8.30am | 26-1-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ८.३० वा. | २६-१-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
चला, भारतीय संविधानिक मूल्यांचा सन्मान करूया, राष्ट्रीय एकता व एकात्मता जपूया आणि आपली लोकशाही अधिक बळकट करूया!
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! समस्त देशवासीयांना भारतीय गणराज्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
#देवेंद्र फडणवीस #महाराष्ट्र
श्री श्री श्री १००८ भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी केदार जगद्गुरू यांच्या नांदेड येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली व त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले. त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे मन कृतार्थ झाले!
#महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस #दर्शन
🔸नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले. गुरुद्वारातील पवित्र वातावरणात मन प्रसन्न झाले.
🕒 दु. २.४५ वा. | २५-१-२०२६📍नांदेड.
#महाराष्ट्र #नांदेड
'मतदान' हा आपला संविधानिक अधिकार आहे; लोकशाही मार्गाने नवभारताच्या निर्मितीत त्याचा हातभार आहे!
राष्ट्रीय मतदार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#मतदान #राष्ट्रीय मतदार दिन #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
संस्कृती, इतिहास व निसर्गसौंदर्याचा अद्वितीय संगम; आपल्या महाराष्ट्राची वैविध्यपूर्ण अशी पर्यटनभूमी!
चला, महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांचे संवर्धन करुया, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटनाला प्रोत्साहन देऊया!
#महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस











