@dwalsepatil
@dwalsepatil

Dilip Walse Patil

Welcome to my official Page. Thanks for all your support. Be in touch with me.

रोषणाई, उल्हास, उत्सवाचा आणि मानवतेने भरलेला दिवाळी उत्सव सर्वांना दिव्याप्रमाणे ज्ञानाचे तेज देवो आणि कर्तृत्वाच्या रोषणाईने सर्वांचे आयुष्य दिव्यत्वाने दिपून जावो हीच सदिच्छा. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. #दिपावली
00:57 / 5.8 MB
हा फक्त विजयाचा गुलाल नाही तर आंबेगाव शिरूर च्या उज्ज्वल भवितव्याचा, शाश्वत विकासाचा गुलाल आहे... #victory #Ambegaon #Shirur #MaharashtraElections2019 #⏱राष्ट्रवादी
पुन्हा एकदा महाविजय आंबेगाव शिरूर जनतेचे प्रेम, आशीर्वाद, सहकार्यामुळे तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या मेहनतीला यश मिळाले. आपणा सर्वांचे प्रेम, सहकार्य आणि आशिर्वाद माझ्या पाठीशी सदैव असू द्या. #MaharashtraAssemblyPolls #Ambegaon #Shirur #Maharashtra #ncp #⏱राष्ट्रवादी
आंबेगाव - शिरूर मतदारसंघातील बहुसंख्य नागरिकांनी आज सकाळपासूनच मतदानासाठी उत्साहाने हजेरी लावली. आजचे तरुण, नोकरदार वर्ग, महिला, वृद्ध, दिव्यांग नागरिक या सर्वांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला याबद्दल मी सर्वांचे जाहीर आभार मानतो. आपली लोकशाही बळकट करण्यात तुमचा वाटा सर्वात मोठा आहे. धन्यवाद. #MaharashtraAssemblyPolls #Ambegaon #Shirur #Maharashtra #⏱राष्ट्रवादी
01:15 / 5.3 MB
जुन्नर आंबेगाव शिरूर च्या परिसरामध्ये असलेला दुष्काळ हटविण्यासाठी पाणी साठवणे गरजेचे होते. विविध प्रकल्पांचे निर्माण झाले आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाणी खेळू लागलं, शेती बागायती झाली. कालवे, बंधारे झाले, विजेचे प्रश्न सुटले, शेतकऱ्यांनी कष्ट केले आणि आर्थिक परिवर्तन झाले. #Maharashtra #NCP #DilipWalsePatil #Ambegaon #Shirur #⏱राष्ट्रवादी
प्रचंड गर्दी, तरुणांची उल्लेखनीय उपस्थिती, महिला भगिनी यांच्या उस्फुर्त घोषणाबाजी या सर्व गोष्टींनी आजची महाविजय निर्धार सभा संपन्न झाली. मंचर शहरातून निघालेली पदयात्रा छत्रपती शिवाजी चौकात येऊन विसावली. ढोल ताशांच्या गजरात हजारोंच्या जनसमुदाय अक्षरशः ताल धरत पाठिंबा देत होते. ही सभा म्हणजे विजयाची सभा असल्याचे सर्वांच्या उपस्थितीने जाणवले. नक्कीच हा महाविजयचा संकल्प सप्तरंगा 🌈 मध्ये रूपांतर होणार आहे यावर शिक्कामोर्तब झाले. #महाविजय #निर्धार #Maharashtra #NCP #DilipWalsePatil #Ambegaon #Shirur #⏱राष्ट्रवादी
01:34 / 6.5 MB
पारगाव येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उभारणी केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना, कामगारांना, ऊस तोडणी कामगारांना रोजगार व आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आहे. उत्तम नियोजन आणि उत्तम कारभार केल्यामुळे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. #Maharashtra #NCP #DilipWalsePatil #Ambegaon #Shirur #⏱राष्ट्रवादी