@feyfxhjoo88
@feyfxhjoo88

S@^^

*_😘जास्त नाही थोडे* *जगायचय आहे* *पण* *सगळ्यांचा आठवणीत राहील* *अस जगायचं आहे😘_* *❤❤* *SAMIR...😘😘😘

#

🤘मैत्री

चोरी "सर, ओळखलंत मला? मी विश्वास,तुमचा विद्यार्थी, ४० वर्षांपूर्वीचा." "नाही रे, नीट दिसत नाही आजकाल आणि स्मृतीही दगा देऊ लागली आहे. बरं ते जाऊ दे, तू बोल, काय करतोस आजकाल ?" "सर, मी पण तुमच्या सारखाच शिक्षक झालोय." "अरे वा, हो का? पण काय रे, शिक्षकांचे पगार एवढे कमी, तुला का रे वाटलं शिक्षक व्हावंसं ?" " सर, तुम्हाला मी आठवेन बघा. मी सातवीत असतांना आपल्या वर्गात एक घटना घडली होती आणि मला तुम्ही त्यातून वाचवलं होतं. खरं तर तेव्हाच मी ठरवलं होतं कि तुमच्या सारखंच शिक्षक व्हायचं. "असं काय बरं झालं होतं तेंव्हा वर्गात?" "सर, आपल्या वर्गात एक अक्षय नावाचा श्रीमंत मुलगा होता. एक दिवस तो हाताचं घड्याळ लावून आला. आमच्या कुणाकडेच तेव्हा घड्याळ नव्हतं. ते घड्याळ चोरायची माझी इच्छा झाली. आणि खेळाच्या तासाला जेव्हा मी पाहिलं कि त्याने घड्याळ कंपास पेटीत काढून ठेवलंय, मी योग्य संधी साधून ते माझ्या खिशात घातलं. पुढचा तास तुमचा होता. तुम्ही वर्गात येताच अक्षयने तुमच्या जवळ घड्याळ चोरीची तक्रार केली. तुम्ही आधी वर्गाचं दार आतून लावून घेतलंत. म्हणालात," ज्याने कोणी घड्याळ घेतले असेल, त्याने ते परत करावे, मी शिक्षा करणार नाही." माझी हिम्मत होईना कारण मी ते परत केले असते तर आयुष्यभर माझी सर्वांनी "चोर" म्हणून हेटाळणी केली असती. पुढे तुम्ही म्हणालात," उभे रहा सारे एका लाइनीत आणि बंद करा आपले डोळे. मी सर्वांचे खिसे तपासणार आहे. मात्र सर्वांचे खिसे तपासणे होईपर्यन्त कुणीही डोळे उघडायचे नाहीत." तुम्ही एक एक करत सर्वांचे खिसे तपासत माझ्या जवळ आलात, माझी छाती धडधडत होती. तुम्ही माझ्या खिशातून ते घड्याळ काढलंत पण तरीही उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खिसे तपासलेत आणि ते झाल्यावर आम्हाला डोळे उघडायला सांगितलं. तुम्ही अक्षयला ते घड्याळ देऊन म्हणालात," बाळा,पुन्हा घड्याळ घालून वर्गात येऊ नकोस आणि ज्याने कोणी ते घेतलं होतं, त्यानं असं गैरकृत्य पुन्हा करायचं नाही " आणि नेहमी प्रमाणे तुम्ही शिकवायला सुरुवात केलीत. तेव्हाच काय पण पुढे मी शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन शाळा सोडली तरी तुम्ही माझ्या चोरीची ना कधी वाच्यता केली, ना कधी मला ते दर्शवलंत. सर, आजही माझे डोळे पाणावले ते आठवून. सर, मी तेव्हाच ठरवलं होतं की मी पण तुमच्याच सारखा शिक्षक होणार आणि मी झालोही. " "अरे, हो, हो, मला आठवते आहे ती घटना. पण मला या घटकेपर्यंत माहीत नव्हतं कि ते घड्याळ मी तुझ्या खिशातून काढलं होतं, कारण.... कारण तुमचे खिसे तपासून होईपर्यंत मी पण आपले डोळे बंद ठेवले होते. #🤘मैत्री
226 जणांनी पाहिले
11 दिवसांपूर्वी
#

मोदीसरकार

*7 वर्ष झाली हो, काय झाले खालील पैकी* - 1)ना शिवस्मारक तयार झाले 2) ना वाड्रा जेलमध्ये गेला 3) ना राममंदिर झालं 4) ना विश्वगुरु झालो 5) ना 15 लाख मिळाले 6) ना काळे धन परत आले 7) ना दाऊद व माल्यास फरफटत आणले 8) ना रोजगार मिळाले 9) ना गंगा स्वच्छ झाली 10) ना स्त्रियांवर अत्याचार थांबले 11) ना स्मार्ट सिटी झाल्या 12) ना बुलेट ट्रेन धावली 13) ना दहशतवाद थांबला 14) ना महागाई कमी झाली 15) ना पेट्रोल स्वस्त झालं 16) ना शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळाला 17) ना काश्मिरी पंडित घरी परतले 18) ना स्टार्टअप इंडिया झाला 19) ना मेक इन इंडिया झाला 20) ना स्किल इंडिया झाला 21) ना डिजिटल इंडिया झाला 22) ना अच्छे दिन आले 23) ना चीन घाबरला 24) ना डॉलर घसरला 25) ना धनगर आरक्षण मिळाले 26)ना बाबासाहेब यांचे स्मारक तयार झाले *१८-२०-२४ तास काम करून स्वयंघोषित चौकीदार करत तरी काय होता नेमकं?* खरंच विचार करायला लावणारा मेसेज [8:36AM, 27/09/2019] +91 93723 14532: *अच्छेदिन वाले सरकारचे ४ वर्षातील कामे* ▪आधार कार्ड बनवा. ▪आधार क्रमांक बँक खात्याला जोडा ▪आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा. ▪आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा ▪एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा ▪जुलैच्या अगोदर रिटर्न भरा. ▪नोट बदलून घ्या. ▪बदलेल्या नोटांचा हिशोब दया. ▪गैस सब्सिडी सरेंडर करा. ▪एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका. ▪एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा ▪बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा. ▪बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब दया.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा. ▪सामान(Goods) वर टॅक्स भरा ▪सर्विस वर टॅक्स भरा ▪कफन वर टैक्स भरा. ▪सर्व पैसे बँकेतच ठेवा खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही. ▪आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश ▪उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका गोव्यात मजेत खाऊ शकतात. ▪शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय. ▪जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका. फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते. ▪पेट्रोल/डिझेल सह सगळ्या अत्यावश्यक वस्तुंच्या किमतीत भरमसाठ वाढ पण दुधाचे भाव बिसलरी पाण्यापेक्षा कमी. ▪कुठेही काहीही खरेदी करा. पण शासनाला जी.एस.टी. सह वेगवेगळे कर भरावेच लागतात. ▪आवश्यकता नसताना अब्जावधी रूपये खर्च करून मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचा हट्ट पूर्ण केला..पण सर्वसामान्यांना भिकेला लावले.. ▪भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. *शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत.* तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय? ▪६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला. ७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला *आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का?* "अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते. हे तुम्हाला माहीत नाही का?" 😌 खरे भारतीय नागरीक असेल तर सर्वाना शेयर करा #मोदीसरकार
119 जणांनी पाहिले
12 दिवसांपूर्वी
#

मुलगी

ज्यांना मुली आहेत त्यांनी ही कविता नक्कीच वाचावी, आणि मुलींनी पण वाचावी. . 🍦 My Sweet 🍧 ❤ My Heart ❤ 👤 *पुरुषांनाही रडण्यासारखी एक कविता* 🙎 || *लेक माझी* || 🙎 ................................................. 🙎 अशी कशी लेक, देवा, माझ्या पोटी येते नाव सुद्धा माझं ती इथेच ठेऊन जाते।।🙎 . 🙎 पहिला घास, देवा, ती माझ्या कडून खाते माझाच हात धरुन ती पहिलं पाऊल टाकते।। 🙎 . 🙎 माझ्याकडूनच ती पहिलं अक्षर शिकते तिच्यासाठी सुद्धा मी रात्र रात्र जागतो।।🙎 . 🙎 कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती गाल फुगवुन बसते मी आणलेला फ्रॉक घालून घर भर नाचते।।🙎 . 🙎 अशी कशी लेक, देवा, माझ्या पोटी येते असे कसे वेगळे हे तिचे माझे नाते।। 🙎 . 🙎 एक दिवस अचानक, ती, मोठी होऊन जाते बाबा , तूम्ही दमला का, ? हळूच मला विचारते॥ 🙎 . 🙎 माझ्या साठी कपडे, चप्पल, खाऊ घेऊन येते नव्या जगातील नविन गोष्टी मलाच ती शिकवते।। 🙎 . 🙎 तिच्या दूर जाण्याने कातर मी होतो हळूच हसून मला ती कुशीत घेऊन बसते।।🙎 . 🙎 कळत नाही मला, देवा, असे कसे होते कधी जागा बदलून ती माझीच आई होते।।🙎 . 🙎 देव म्हणाला, ऐक, पोरी तुझे, तिचे नाते विश्वाच्या ह्या साखळीची एक कडी असते।। 🙎 . 🙎🙎 तुझ्या दारी फुलण्यासाठी हे रोप दिले असते सावली आणि सुगंधाशी तर तुझेच नाते असते।।🙎🙎 . 🙎🙎 वाहत्या प्रवाहाला, कोणी, मुठीत कधी, का, धरते ? मार्ग आहे ज्याचा, त्याचा पुढेच असते जायचे।।🙎 . 🙎 तुझ्या अंगणातली धारा ही "जीवनदात्री" होते आणि वाहती राहण्यासाठीच "गंगा" ''सागराला" मिळते। एक तरी मुलगी असावी उमलताना बघावी नाजूक नखरे करताना न्याहाळायला मिळावी 🙎🙎 . 🙎 एक तरी मुलगी असावी साजिरी गोजिरी दिसावी नाना मागण्या पुरवताना तारांबळ माझी उडावी 🙎🙎 . 🙎 एक तरी मुलगी असावी मैचींग करताना बघावी नटता नटता आईला तिने नात्यातली गंमत शिकवावी 🙎🙎 . 🙎🙎 एक तरी मुलगी असावी जवळ येऊन बसावी मनातली गुपितं तिने हळूच कानात सांगावी 🙎🙎 . 😊😊एक तरी मुलगी असावी गालातल्या गालात हसावी कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी......! 🙎 *एक तरी मुलगी असावी* 🙎 dedicated to all beautiful daughters 😊 *खरच ज्यांना मुलगी आहे ते खुप भाग्यवान आहे...* 1 share for girls.... #मुलगी
586 जणांनी पाहिले
16 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..