@follow_monika
@follow_monika

Monika Patil ✔️

नमस्कार.. माझ्या पोस्ट बद्दल काही अडचण असेल तर मला कळवा.. #धन्यवाद

नवरा अंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो ... "हाय, गुड मॉर्निंग डियर" (मेसेज फ्रॉम बेबी) सहज म्हणून बायको तो मेसेज वाचते. विचारात पडते, ही "बेबी" कोण आता...? http://m.facebook.com/MarathiVichar9 नवरा बाथरूममधून आल्यावर बायको त्याला कुण्या बेबीचा मेसेज आल्याचे सांगते. नवरा हसतो. आणि मोबाईल घेऊन रिप्लाय करतो, "हाय बेबी, हाऊ आर यु ?" आणि आपल्या कामाला लागतो. तो रिप्लाय देखील बायको पाहते. मग दिवसभर डोक्यात विचार सुरू होतात, कोण असेल ही बेबी ? संध्याकाळी नवरा आल्यावर त्याला ती विचारते, "ही बेबी कोण आहे हो ?" नवरा केवळ हसतो आणि उत्तरं न देता आपल्या कामाला लागतो. असेच एक दोन दिवस जातात. पुन्हा एके सकाळी मेसेज येतो, "हाय, आज तरी भेटणार का ? खूप आठवण येतेय तुझी" (मेसेज फ्रॉम बेबी) हे वाचून मात्र बायकोच्या मनात संशय वाढू लागतो. अधून मधून अशाच प्रकारचे मेसेज यायचे, नवराही रिप्लाय द्यायचा आणि हे सगळे पाहून बायकोचा संशय वाढायचा. आणि एकेदिवशी नवऱ्याच्या खिशात सिनेमाची दोन तिकिटे तिला सापडतात. त्याचे रूपांतर शेवटी तिच्या प्रचंड रागात होते. दोघात कडाक्याचे भांडण होते. तिच्या मनात अढी बसलेली त्यात भांडण पेटलेले. त्या भरात बायको त्या दिवशी नवरा ऑफिसला गेल्यावर त्याच्यासाठी एक चिट्ठी ठेवते "मी घर सोडून माहेरी जातेय, कायमची" **** नवरा घरी आल्यावर चिट्ठी वाचून सुन्न होतो !! *** पंधरा दिवस जातात. आणि एकेदिवशी बायको आपल्या गावातच असलेल्या ज्या माहेरी राहत असते, त्या घराची बेल वाजते. बायकोच दार उघडते. दारात पाच वर्षाची एक अतिशय गोड मुलगी उभी !! ती विचारते, "अमुकच्या मिसेस तुम्हीच न ?" बायको "हो" म्हटल्यावर ती मुलगी तिच्या हातातले एक पत्र बायकोला देते. बायको पत्र वाचू लागते. **** "प्रिय सखी, ज्या "बेबी"वरून इतके वादळ उठले आणि तू घर सोडून गेलीस, तीच ही "बेबी" आहे. जिने आता तुला हे पत्र दिलेय. अनाथ आश्रमातील ही गोड मुलगी. हिच्याच सोबत मी बोलायचो, सिनेमाला जायचो. जेव्हा तू पहिल्यांदा विचारलेस कि "हे बेबी कोण आहे?" तेव्हा मुद्दाम सांगितले नाही. म्हटलं पाहूया, जरा गंमत करूया. मात्र तुझा "बेबी संशय" वाढतच गेला. आणि तिथेच विश्वासाला तडा गेला. तरीही शेवटी मी थेट बेबीशी तुझी भेट घडवणार होतो. पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस. आणि रागाच्या भरात निघून गेलीस" आणि हो, अजून एक, ही जी बेबी तुझ्या समोर उभी आहे न, ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच मुलगी आहे" थांब ! दचकू नकोस. शांतपणे पुढचे वाच !! आपलं लग्न व्हायच्या दोन वर्षे आधीची घटना. तू कॉलेजात लास्ट इयरला होतीस. तिथल्या एका प्राध्यापकाने नोट्स देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तुला कॉफीतून गुंगीचं औषध दिलेलं आणि नंतर "नको ते कृत्य" केलेलं. तुझी चूक नसतानाही निसर्गाने मात्र काम केले. नंतर प्रयत्न करूनही अबॉर्शन घडलं नाही. इभ्रतीचा बोभाटा नको म्हणून घरच्यांनी तुला सहा महिने घरातच झाकलेलं. तुझे वडीलच डॉक्टर असल्याने फारसा बोभाटा न होता "नको" ते बाळ जन्मल. पुढे तुझ्या वैवाहिक जीवनात अडसर ठरणारे हे बाळ तुझ्या वडलांनी गावातल्या अनाथ आश्रमात सोडून दिलेलं ! http://m.facebook.com/MarathiVichar9 तेच बाळ म्हणजे ही बेबी !! वाटल्यास तिच्या डाव्या खांद्यावरचा तीळ पाहून खात्री करून घे जो तू तिला पहिल्यांदा रडताना पाहिला असशील. किंवा थेट वडिलांकडून खात्री करून घे. *** (बायको पटकन त्या मुलीजवळ जाऊन खांद्यावरील तीळ पाहते. तीळ दिसताच ती मनातून कोसळते. डोळे भरून आलेले. पण पत्र अजून बाकी असतं. ती पुढे वाचायला सुरुवात करते ) ** "आता हे सगळं मला कस माहित ? तर तुझ्या पापभिरू वडिलांनीच न राहवून आपल्या लग्नाच्या एक महिना आधी मला भेटून हे सांगितलं व वाटल्यास अजूनही तुम्ही लग्न मोडू शकता, सुचवलं. तरीही मी तुला स्वीकारलं. कारण झाल्या प्रकारात तुझी चूक काहीच नव्हती. आणि आपले लग्न झाले. पण मीच अधून मधून त्या बेबीला जाऊन भेटायचो. तिच्या सहवासात छान वाटायचे. लळा लावला होता पोरीने. बास !! माझे सांगून संपलंय सगळं ! आता विचार कर आणि जर पुन्हा आपण एकत्र यायचा निर्णय झाला असला तर आणि तरच ग्यालरीत ये" सदैव तुझाच बायको ताडकन धावत धावत ग्यालरीत जाते. खाली रस्त्यावर नवरा उभा असतो शांतपणे हसतमुख !! आणि इकडे हिच्या डोळ्यात अश्रूचा महापूर !! कारण कोणतेही असो, दोघांमध्ये संशयाला कधीच थारा देऊ नका !! शांतपणे समोरासमोर बसून निरसन करून घेताना मनात मोकळेपणा ठेवा. कारण जगात "संशय" हा एकमेव असा रोग आहे, ज्यावर अद्याप औषध निघालेले नाही !! त्यावर औषध एकच ... #नात्यात_वाद_नको_संवाद_हवा. पोस्ट आवडली असेलच लवकर...नक्की शेयर करा..🤗 अश्याच सुंदर छान लेखसाठी चला पेज लाईक करा🤗
#

📝कविता / शायरी/ चारोळी

📝कविता / शायरी/ चारोळी - - 19 ) ಗ ತಿ - ShareChat
902 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
देवळात पळून जाऊन लग्न केलं आम्ही. माझ्या घरच्यांचा पहिल्यापासून लग्नाला विरोध. माझ्यावर लक्ष ठेवणं, सारखा मोबाईल चेक करणं.वैताग आला सगळ्याचा. तो खरच चांगला आहे हे समजावून समजावून राहिले पण कोणालाच पटलं नाही. उलट मला स्थळं बघायला सुरुवात केली. शेवटी आमचा नाईलाज झाला आणि पळून जायचं ठरवलं.देवळातले एक गुरुजी ओळखीचे होते. लग्न लावून द्यायला ते तयार झाले... मुलाकडच्यांना काहीचं अडचण नव्हती. त्याचं घर खेड्यातलं. दिरानेदेखील मदत केली लग्नासाठी. माझ्या घरी कळालं आणि सगळा कालवा झाला. भावाने बोलणं सोडून दिलं. कित्येक दिवस आईवडीलही बोलत नव्हते, आता थोडे थोडे बोलतात. सगळ्या गावात त्यांची छी थू झाली. नातेवाइकांनी येऊन आईलाच दोष दिला. घरात मी लाडकी, असलं काही करेल यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. पप्पांनीतर किती दिवस जेवणचं सोडलेलं. सगळ्यांनी मनवून मनवून त्यांना धीर दिला. भावाचे मित्र मला फोन करायचे. ताई तू चुकीचं केलं. असं पळून जायला नको होतं. घरच्यांची काय अवस्था झालीये माहितेय का तुला. तुझा भाऊ अक्षरशः रडला परवा... मला सगळं कळत होतं. पण मला याला गमवायचं नव्हतं. प्रेम करायचे मी मनापासून. घरच्यांना तो नाही आवडायचा. कधीच लग्न लावून नसतं दिलं आमचं. लग्नाआधी तसा शरीरसबंध नव्हता आलेला आमच्यात. किस झालेली. एकदा फिरायला गेलेलो तेव्हा त्याने सेक्स करण्याचा प्रयत्न केलेला पण मी तयार नव्हते. लग्न झाल्यानंतर सतत संभोग व्हायचा. सकाळी मी लवकर उठायचे, सगळ्यांसाठी चहा करणं, मग जेवणाची तयारी. कपडे धूणं, लोकांच येणं जाणं घरात त्यामुळे सतत भांडी घासायला पडायची. घरात आमच्या सहा माणसं. सासू सासरे, दीर, नणंद आणि आम्ही दोघं. लग्न झाल्यापासून सासूबाईंनी कामातून पूर्ण हात काढून घेतला आणि सगळी जबाबदारी माझ्यावर पडली... आज वर्ष होत आलं लग्नाला. पोटात लेकरू आहे. आंधळ्या डोळ्याने पाहिलेली सगळी स्वप्नं खोटी ठरलीयेत. आपली बारा एकर शेती आहे, सिटीमध्ये दोन फ्ल्याट भाड्याने दिलेत, स्वतःचं दुकान काढायचंय, लवकरच गाडी घेऊ अशी दाखवेली सगळी स्वप्नं एक एक करून खोटी ठरली. गावातलं राहतं घर आणि अडीच एकर रान सोडलं तर काहीच नाही. त्यात दिराचं आणि नणंदेच लग्न डोक्यावर. होतं ते दुकान कर्जात बुडालं. नवरा आता कंपनीत कामाला जातो. आठ हजार पडतात महिन्याचे हातात. कमवणारं तोंड एक आणि खाणारी सहा. नटण्या थटण्याची माझी सगळी हौस मरून गेलीये. आईवडिलांकडं कुठल्या तोंडाने जाऊ. एकदा आई आलेली भेटायला. जिद्दीने संसार कर म्हणाली. भाऊ तर अजूनही बोलत नाही. कुणासमोर मन हलकं करू कळत नाही. जरा काही घरात वाद झाले की नवरा हात उचलतो. उगाच लग्न केलं म्हणतो. तू आल्यापासून पणवती लागली. माझ्या डोळ्यात पाणी आलं तरी त्याला आता काही फरक पडत नाही. रात्री लगट करण्यापुरता जवळ ओढतो. प्रेम कुठं गेलं काही पत्ता नाही... लग्न करून फसले मी. आयुष्याची वाट लागली. चूक झाली. पश्चाताप होतो, पण काय करणार. आता माघारी वाट नाही. एकदा पाउल उचललं आता मलाचं हे निभवावं लागणार. जे नशिबी आलंय ते भोगावं लागणार. सगळं तोडून जावं तर कुठं जाणार. आलेला दिवस ढकलायचा... पोटातल्या लेकरासाठी. @शेअरचॅट मराठी
#

प्रेरणादायी संघर्षमय जीवन

प्रेरणादायी संघर्षमय जीवन - ShareChat
608 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..