#👆 करंट_अफेअर्स
🔰महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'गरुड दृष्टी' प्रणाली सुरू केली.
🔹उद्घाटक: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'गरुड दृष्टी' या अत्याधुनिक प्रणालीचे उद्घाटन केले आहे.
🔸मुख्य उद्देश: सोशल मीडियावरील गुन्हेगारी, जसे की जातीय द्वेष पसरवणे, दंगली घडवणे, 'हेट स्पीच' आणि 'फेक न्यूज' (बनावट बातम्या) यांवर नियंत्रण ठेवणे.
🔹सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण: ही प्रणाली आर्थिक फसवणूक आणि इतर सायबर गुन्हे शोधण्यात मदत करेल, ज्यामुळे गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करता येईल.
🔸जागरूकता: मुख्यमंत्र्यांनी जनतेला सोशल मीडियावरील आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
🔹मदत क्रमांक: आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी नागरिकांना '1930' आणि '1945' या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🔸पैसे परत: या कार्यक्रमात, सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेल्या व्यक्तींना तब्बल 10 कोटी रुपयांची रक्कम परत देण्यात आली.